जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

28 March 2019

आपण शिवरायांचे वंशज एकदा पाऊल टाकले की परत मागे नाही :उर्मिला मातोंडकर


28/03/2019  

टीम थोडक्यात


मुंबई |  आपण शिवरायांचे वंशज एकदा पाऊल टाकले की परत मागे नाही, असं प्रतिपादन नुकताच काँग्रेस प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.
काल काँग्रेसचे नेते रणदिप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी नवी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताक्षणी त्यांनी भाजपवर आसूड ओढायला सुरूवात केली आहे.
मला धर्म आणि देशभक्ती शिकविणारे भाजपवाले कोण? असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणाऱ्या साने गुरूजींचा धर्म पाळते, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

17 March 2019

⚡ *ब्रेकिंग!! गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन*

गोवा:-गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले आहे.आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.

👉 मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती. गेल्या, कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

13 March 2019

अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेची बिलोली तालुका कार्यकारणी जाहीर


बिलोली : तालुका प्रतिनिधी
अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी, सचिव मार्तंड जेठे,कार्याध्यक्षपदी सुर्यकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष टी. एम वाघमारे यांनी घोषित केले आहेत.
ययावेळी जिल्हा सचिव बी.पी.गायकवाड,नायगावचे तालुका अध्यक्ष पी.एम.काेतेवार
यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर परिषदेची बैठक मंगळवार दि. १२ मार्च राेजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष टी. एम.वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका केंद्र बिलोली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेच्या नियम व अटी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक नायगाव तालुका अध्यक्ष पी. एम.काेतेवार यांनी केले. सखोल चर्चेअंती बी. पी.गायकवाड यांनी सुचविल्याप्रमाणे अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी तर सचिवपदी मार्तंड जेथे, कार्याध्यक्ष पदी गायकवाड एस.एन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आभार प्रदर्शन नवनियुक्त तालुका अध्यक्ष कुलदीप सुर्यवंशी यांनी केले

08 March 2019

*मोबाईल खरेदीत पंकजा मुंडेंचा १०६ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडेंचा खळबळजनक आरोप*

महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.


पंकजा मुंडे मंत्री असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यातील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रासाठी सुमारे लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा यांच्या विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग (आयसीटी-आरटीएम) योजनेसाठी स्मार्टफोन्स खरेदी करण्यात येत आहेत. याबाबतचा सरकारी अध्यादेश (जीआर) २८ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आला असून, त्यात हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे २२०० रूपये जास्तीची रक्कम देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा १७ या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना ८ हजार ७७७ रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण विभागाने एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून आणखी ५ हजार १०० मोबाईल अतिरिक्त खरेदी केले आहेत.

या मोबाईल खरेदीत सुमारे १०६ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, अशी मोठी खरेदी (बल्क क्वांटिटी) करण्यापूर्वी कंपनीची पडताळणी करायला हवी होती. या कंपनीचा पत्ताही निविदा कागदपत्रात दाखविण्यात आला नाही. तसेच सरकारने या मोबाईलची खरेदी करताना किंमत कमी करण्याबाबत बोलणी करायला हवी होती. हेच मॉडेल जर ६ हजार ४९९ रूपयांत बाजारात उपलब्ध असेल तर या विभागाने अधिकचे २२०० रूपये का मोजले? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि याची चौकशी करणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, पॅनासोनिक इलुगा १७ हे मॉडेल एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याचे लागलीच उत्पादन थांबले. आता तर हा मोबाईल बाजारात उपलब्धच नाही. त्यामुळे एमएस सिस्टेक आयटी सोल्युशनने या मोबाईलची विक्री बेकायदेशीररित्याच केली असे म्हणावे लागेल असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मार्टफोन मोबाईलची खरेदी तत्काळ थांबवावी. तसेच चौकशी समिती स्थापन करून याचे सत्य समोर आणले पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना यासंबंधित विचारपूस करण्यासाठी संपर्क साधला त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या खरेदी प्रकरणाची आपल्याला काहीही माहिती नाही असे सांगत यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

रमेश रामचंद्र घोडेकर हा हरवलेला आहे.


बिलोली:(ता.प्र)येथील देशमुख नगर येथे राहणारा
रमेश रामचंद्र घोडेकर वय 19 राहणार बिलोली हा शिक्षण करण्यासाठी नांदेड येथे राहत होता तो  दि:6/3/2019 रोजी पासून आनंद नगर नांदेड येथून हरवलेला आहे.कोणाला भेटल्यास खालील नंबर वर संपर्क करा.
  सतीष जेठे  बिलोली.
संपर्क:8390547560
        :8329276441

07 March 2019

*वंचित बहुजन आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी वलीओद्दीन फारुखी यांची निवड*


बिलोली:(ता.प्र) , फुले,शाहु,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व बहुजन समाजातील जनते च्या अडी अडचनी सोडवणारे तसेच समाज कार्यात पुढाकार घेवुन समाज कार्य करणारे व बिलोली परीसरात पत्रकारीतेत वेगळी ओळख असलेले  वलिओद्दीन  फारूखी यांची वंचित बहुजन आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली काल झालेल्या शासकीय विश्राम गृह येथे प्रमुख उपस्थिती नांदेड  लोकसभा उमेदवार यशपाल भिंगे व  जिल्हा अध्यक्ष  शिवाजी गेडेवाड,  सोशल मिडिया प्रमुख सोनूभाऊ , एम आय एमचे डॉ. हकीम खान यांच्या उपस्थित निवड करण्यात आली या वेळी  .भारीपचे बिलोली तालूका अध्यक्ष धम्मदीप गावंडे , धम्मदीप जाधव , संजय जाधव , संजय पोवाडे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.

06 March 2019

मोदींना मोठा झटका; 'राफेल प्रकरणातील कागदपत्रेच मंत्रालयातून चोरीला'


_*LIVE News Updates*_
नवी दिल्ली- राफेल प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. मात्र या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयानं राफेल व्यवहारामध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचं वृत्त 'द हिंदू' वृत्तपत्रानं दिलं होतं. काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे 'द हिंदू'नं हे वृत्त दिलं होतं. ही कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिल्याने खळबळ उडाली आहे.

'द हिंदू'नं ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचं वृत्त दिलं, ती कागदपत्रं सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला. यानंतर याचिकाकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी युक्तीवाद केला. सरकारनं न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप भूषण यांनी केला आहे.
-----------LIVE  NEWS UPDATE BY-----------

*ख्रिस गेलने केला ‘हा’ नवा विश्वविक्रम*

सेंट लुसिया | वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने शनिवारी झालेल्या इंग्लडविरुद्धच्या 5व्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तुफान फलंदाजी करत जागतिक विक्रमावर आपले नाव कोरले आहे.

ख्रिस गेल एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज बनला आहे. त्याने शेवटच्या सामन्यात इंग्लडची अक्षरश: पिसं काढली. 27 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकार ठोकत त्याने 77 धावा केल्या.

गेलला युनिव्हर्सल बाॅस म्हणून ओळखलं जातं. इंग्डविरुद्धच्या 5 एकदिवसीय सामन्यात 2 शतक आणि 2 अर्धशतकांच्या साहाय्याने गेलने 424 धावा ठोकल्या.

गेलने इंग्डविरुद्धच्या मालिकेत तब्बल 39 षटकार ठोकले आहेत. त्याने भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला देखील मागे टाकलं आहे. दरम्यान, मायदेशात त्याची ही शेवटची मालिका असू शकते. तो 2019च्या विश्वचषकानंतर क्रिकेट विश्वाला रामराम ठोकणार आहे.

05 March 2019

*मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी तरुणाची जलसमाधी*

बीड : लाईवन्यूज ऑनलाईन - मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील एका तरुणाने पाली धरणात उडी माररून जलसमाधी घेतल्याची घटना मंगळवारी घडली . पोलिसांना काठावर एक बॅग सापडली असून त्यात मोबाईलमध्ये त्याने आत्महत्येचे कारण रेकॉर्ड केले आहे . संजय ज्ञानोबा ताकतोडे असे तरुणाचे नाव आहे . मागील अनेक वर्षापासून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे . त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे मातंग समाजाकडून काढण्यात आले . परंतु सरकारकडून याची दखल घेतली जात नाही , असा आरोप करत मंगळवारी संजय ताकतोडे याने या स्वतंत्र
 अदोलनासाठी | पाला धरणाजवळ पाण्यात उडा मारून जलसमाधी घेतली . त्यानंतर याची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तेथे धाव घेतली . पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे . काठावर त्याची बॅग  पोलिसांना सापडली असून त्यात त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचे कारण त्याने रेकॉर्ड करून ठेवले आहे .

श्यामराव मरिबा जेठे याचं निधन

बिलोली: येथील साठेनगर मध्ये राहणारे  श्यामराव मरिबा जेठे वय 55  आज दिनांक 05 मार्च 2019 रोज मंगळवार रोजी सकाळी ठिक 10:05  यांच अल्पशः आजाराने यांच्या राहत्याघरी दुःखद निधन झाले.त्यांचा एक मुलगा ,तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे . आज सायंकाळी 5 वाजता बिलोली - बोधन या मार्गावरील  लघूळ रोडवरील समशान भुमित अत्यविथी होणार आहे . ते बिलोलीनगर परिषदेचे  माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांचे बंधु होते.

04 March 2019

*लोकसभेची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागण्याची शक्यता; शरद पवारांचा अंदाज*


नाशिक | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागेल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.

लोकांना बदल पाहिजे आहे त्यामुळं तीन राज्यांच्या निवडणुकांप्रमाणं भाजपचा पराभव होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणत असून मोदींच्या रुपानं देशावर आलेली आपत्ती दूर करण्यासाठी प्रयत्न करु, असं शरद  पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अनिल अंबानी हे संरक्षण तज्ञ असल्यानं त्यांना राफेलचं कंत्राट मिळालं, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला आहे.

दहशतवाद्यांचे मृतदेह मोजणे आमचे काम नाही- वायुसेना प्रमुख धनोआ

वृत्तसंस्था
05:24 PM
पाकिस्तानात गेलेला विग कमांडर अभिनंदन हा फिटनेसनंतर परत कामावर रूजू होणार आहे, तर मिग-21 हे आक्रमक आणि चांगले लढाऊ विमान आहे. नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानात केलेल्या हवाई | हल्यानंतर पहिल्यांदाच वायुसेनेचे प्रमुख बी . एस . धनोआ यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रीया दिली आहे . त्यांनी म्हटले की , दहशतवाद्यांचे मृतदेह मोजणे | हे आमचे काम नाही , ते काम सरकारचे आहे , ते । सरकार करेल . आमचे काम हल्ला  करण्याचे होते | आणि ते आम्ही व्यवस्थित केले आहे . एअर स्ट्राईकवेळी आम्ही आमचे टार्गेट हिट केले | असल्याचेही त्यांनी सांगितले . पाकिस्तानात गेलेला विग कमांडर अभिनंदन हा | फिटनेसनंतर परत कामावर रूजू होणार आहे , तर मिग - 21 हे आक्रमक आणि चांगले लढाऊ विमान आहे असेही धनोआ पत्रकार परिषदेत म्हणाले . त्याचबरोबर , राफेल विमाने सप्टेंबरपर्यंत वायुदलात दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली . तसेच , पाकिस्तानात अजूनही असे ऑपरेशन | सुरूच असल्याने भारताकडूनही हे ऑपरेशन संपलेले | नाही असेही धनोआ यांनी स्पष्ट केले .

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रकाश आंबेडकरांना भेटण्याची शक्यता


नवी दिल्ली | वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत सामिल व्हावं, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे प्रकाश आंबेडकरांची भेट घेण्याची शक्यता आहे.

आंबेडकरांच्या सर्व अटी मान्य करण्याची लेखी हमी काँग्रेस-राष्ट्रवादीनं दिली आहे. तसं काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंबेडकरांना काल लिहिलेल्या संयुक्त पत्रात नमूद केलेलं आहे.

राहुल गांधी हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत. या भेटीत आघाडीतल्या प्रवेशासंदर्भात आणि जागावाटपाबाबत चर्चा होईल, अशी माहिती आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांची आगामी लोकसभेसाठी 12 जागांची मागणी आहे.

03 March 2019

ट्रॅव्हल्सच्या धडकेत काका-पुतन्याचा मुत्यु


बिलोली ( शंकरनगर ) : दुचाकीला भरधाव टूल्सने दिलेल्या धडकेत पुतण्याचा जागीच , तर काकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . हा पटना ३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शंकरनगर येथे नांदेड़ - देगलूर मुख्य मार्गावर घडली . नायगाव तालुक्यातील भोपाळा | येथील रहिवासी फोन वायू सयद | ( पुतण्या , वय १९ ) हा श्री साईयाया | विद्यालयात सेवक या पदावर कार्यरत | असलेल्या काफी हुसेन अमीरसाय | सय्यद ( वय ५० ) यांना ( एम . एच . २६ | थि , के , ०९५६ ) दुचाकीवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होता , शाळेमवळील रस्ता ओलांडताना नांदेडहून बीदरकडे जात असलेल्या ( एम . एच . २० ए . वाय . ८६३२ ) मिनी टॅडल्सने दुचाकीला चिरडले . यात फेरोज सय्यदचा जागीच मृत्यू झाला . तर समद हुसेन यांच्या डोक्याला जर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले , नागरिकांनी त्यांना नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठविले होते . डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते . उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू भोपाळा येथे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान दफनविधी करण्यात आला . | रामतीर्थ पोलिसांनी या घटनेची नाद घेतली असून , तपास सहाय्यक पालास निरीक्षक सोमनाब शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बनसोडे हे कनीत आहेत . | संतप्त नागरिकांचा रास्ता रोको शंकरनगर बसस्थानक मार्गावर गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे . मात्र संयंधितांनी दुर्लक्ष केले जाते . पाच महिन्यांपूर्वी याच शाळेतील नागनाथ हतीनगरे या याचा अपघाती मृत्यू झाला होता . दरम्यान , पुन्हा गतिरोध टाकण्यासाठी संतप्त नागरिकांनी

02 March 2019

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांकडून गोळीबार; 4 जवान शहीद तर 8 जखमी


   Saturday, 02 Mar, 9.10 pm
 जम्मू काश्मीर - जम्मू काश्वीर येथील कुपवाडा जिल्ह्यातील परिसरात शुक्रवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कुपवाडातील लंगेट परिसरात झाला. या हल्ल्यात 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद तर 8 जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान हे दहशतवाद्यांचे शव आणण्यासाठी गेले असता अचनाक एक दहशतवादी उठला आणि त्याने अंदाधुद गोळीबार केला. यामध्ये सीआरपीएफचे एक इंस्पेक्टर, एक जवान आणि जम्मू काश्मीर पोलीसचे दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुड परिसरात घेराव घालत शोधमोहिम हाती घेतली होती.
यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षादलाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान सध्या सुरक्षादल आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार सुरू आहे.

Gjkkkkk

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांकडून गोळीबार; 4 जवान शहीद तर 8 जखमी








जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांकडून गोळीबार; 4 जवान शहीद तर 8 जखमी

जम्मू काश्मीर - जम्मू काश्वीर येथील कुपवाडा जिल्ह्यातील परिसरात शुक्रवारी सांयकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कुपवाडातील लंगेट परिसरात झाला. या हल्ल्यात 4 सीमा सुरक्षारक्षक शहीद तर 8 जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान हे दहशतवाद्यांचे शव आणण्यासाठी गेले असता अचनाक एक दहशतवादी उठला आणि त्याने अंदाधुद गोळीबार केला. यामध्ये सीआरपीएफचे एक इंस्पेक्टर, एक जवान आणि जम्मू काश्मीर पोलीसचे दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी कुपवाडा जिल्ह्यातील बाबागुड परिसरात घेराव घालत शोधमोहिम हाती घेतली होती.
यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षादलाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान सध्या सुरक्षादल आणि दहशतवाद्यामध्ये गोळीबार सुरू आहे.