04 March 2019
Home »
» *लोकसभेची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागण्याची शक्यता; शरद पवारांचा अंदाज*
*लोकसभेची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागण्याची शक्यता; शरद पवारांचा अंदाज*
नाशिक | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येणाऱ्या 7-8 तारखेला लागेल, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते.
लोकांना बदल पाहिजे आहे त्यामुळं तीन राज्यांच्या निवडणुकांप्रमाणं भाजपचा पराभव होईल, असं शरद पवार म्हणाले आहेत.
सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणत असून मोदींच्या रुपानं देशावर आलेली आपत्ती दूर करण्यासाठी प्रयत्न करु, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, अनिल अंबानी हे संरक्षण तज्ञ असल्यानं त्यांना राफेलचं कंत्राट मिळालं, असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला आहे.








0 comments:
Post a Comment