सेंट लुसिया | वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने शनिवारी झालेल्या इंग्लडविरुद्धच्या 5व्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तुफान फलंदाजी करत जागतिक विक्रमावर आपले नाव कोरले आहे.
ख्रिस गेल एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज बनला आहे. त्याने शेवटच्या सामन्यात इंग्लडची अक्षरश: पिसं काढली. 27 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकार ठोकत त्याने 77 धावा केल्या.
गेलला युनिव्हर्सल बाॅस म्हणून ओळखलं जातं. इंग्डविरुद्धच्या 5 एकदिवसीय सामन्यात 2 शतक आणि 2 अर्धशतकांच्या साहाय्याने गेलने 424 धावा ठोकल्या.
गेलने इंग्डविरुद्धच्या मालिकेत तब्बल 39 षटकार ठोकले आहेत. त्याने भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला देखील मागे टाकलं आहे. दरम्यान, मायदेशात त्याची ही शेवटची मालिका असू शकते. तो 2019च्या विश्वचषकानंतर क्रिकेट विश्वाला रामराम ठोकणार आहे.








0 comments:
Post a Comment