28/03/2019
टीम थोडक्यात
मुंबई | आपण शिवरायांचे वंशज एकदा पाऊल टाकले की परत मागे नाही, असं प्रतिपादन नुकताच काँग्रेस प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.
काल काँग्रेसचे नेते रणदिप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी नवी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताक्षणी त्यांनी भाजपवर आसूड ओढायला सुरूवात केली आहे.
मला धर्म आणि देशभक्ती शिकविणारे भाजपवाले कोण? असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणाऱ्या साने गुरूजींचा धर्म पाळते, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.








0 comments:
Post a Comment