जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 September 2023

बिलोली बाजार समिती निवडणुक ; चार जणाविरुध्द तक्रार

बिलोली : बाजार समितीच्या निवडणुकीत शासन मान्य संस्थेत शासनाची पगार घेऊन नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मतदार संघातुन आपली उमेदवारी दाखल करून ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतांना प्रतिस्पर्धी भाजप मित्रपक्ष पुरस्कृत बळीराजा शेतकरी विकास पॅनलच्या चार उमेदवारांनी चार शिक्षकांची निवडणूक निर्णय अधिकारी बिलोली यांच्याकडे तक्रार करून उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी दि. २७ सप्टेंबर रोजी केली आहे. दि.७ रोजी निवडनुका होणार आहेत.

या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेस महायुतीचे कोरनुळे यादव किशनराव हे पोष्ट बेसीक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मरवाळी येथे शिक्षक असून त्यांनी ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघातुन उमेदवारी दाखल केली असून यास प्रतिस्पर्धी उमेदवार हांडे महेश भुजंगराव यांनी आक्षेप घेतला आहे. दुसरे उमेदवार बुध्देवार राजेश्वर रामकिशन हे यशवंत विद्यालय मुखेड येथे शिक्षक असून सेवा सहकारी संस्था इतर मागसवर्ग मतदारसंघातुन निवडणुक लढवित आहेत. यांची तक्रार रेणुकाबाई नारायण कंदमवाड या महिला उमेदवाराने केली आहे. तिसरे उमेदवार आनंदराव गुंडप्पा पाटील हे बिलोली येथे मुकबधिर शाळेवर शिक्षक आहेत त्यांची सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली यांना आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवार मुरके बालाजी रावसाहेब यांनी घेतला आहे. याच सोबत शिवाजी पाटील हे नायगाव येथील जनता हायस्कुल येथे निमशासकिय सेवेत असून यांची उमेदवारी रद्द करण्याची तक्रार पांडवे व्यंकट मष्णाजी यांनी केली आहे. अशा परिस्थितीत निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी काय निकाल देणार माजी खा.भास्करराव पाटील यांच्या गटातील जर हे उमेदवार अपात्र झाल्यास ठक्करवाड गटाला फटाके फोडण्याची संधी मिळणार का असे विविध प्रश्नांची चर्चा होत आहे.

८ रोजी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड

नांदेड :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी ८ ऑक्टोबर रोजी विशेष बैकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत विद्यमान संचालक मंडळातून अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास मतदान प्रक्रीयाही घेण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी व्ही. आर. देशमुख यांनी सांगितले.
यासंदर्भातचे प्रसिद्धीपत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाना पाठविण्यात आले आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यकार्यालयात ही बैठक बोलविण्यात आली आहे. अध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्या संचालकांकडून नामनिर्देशन पत्र मागविण्यात आले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ११.३० नामनिदर्शनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. ११ ते ११.४५ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार. ११.५० ते १२.१५ वाजताच्या दरम्यान आवश्यकता भासल्यास मतदान. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


22 September 2023

ई-पिक पाहणी नोंदविण्यासाठी 23 व 24 रोजी जिल्ह्यात विशेष मोहिम- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

बिलोली, :- राज्यात 2021 पासून ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला. यात पिक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे स्वत: शेतकऱ्यांच्या पुढाकारातून नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांशी आपआपल्या पातळीवर योग्य तो समन्वय साधावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

या मोहिमेद्वारे कृषि विभागाच्या कृषि सेवकांपासून सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या ई-पिक पाहणी मोबाईल ॲप्लीकेशची माहिती व्हावी, त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी ही मोहिम असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. दिनांक 23 व 24 सप्टेंबर रोजी या मोहिमेत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यातील गावांचे संबंधित तहसिलदार हे समप्रमाणात विभाजन करून 50 टक्के गावे तहसिल कार्यालयामार्फत व उर्वरित 50 टक्के गावांमध्ये तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत सदर उद्दीष्टाची पूर्तता करतील, असे त्यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 556 गावे असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केल्यास सुमारे 3 लाख 11 हजार 200 पर्यंत या मोहिमेचे उद्दीष्ट साध्य होणार आहे. यात तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक / कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी / तरुण मंडळाचे पदाधिकारी या स्वयंसेवकाची निवड करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक पेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनीही विश्वासाने सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

16 September 2023

प्राचार्यांच्या उपोषणाच्या ईशार्यांने प्रशासनाला जाग .अतिक्रमण मोहिम झाली गतीमान .

भोकर: श्री.शाहु महाराज विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर यांनी पाच हजार विद्यार्थ्यांच्या जिविताच्या सुरक्षतेसाठी भोकर प्रशासनाने त्वरित रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावित आन्यथा १७ संप्टेंबर २०२३ पासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी भोकर व तहसिलदार भोकर यांना विद्यार्थी,पालक वर्ग,ईतर शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य व सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने ७ संप्टेंबर रोजी दिले होते.
या दिलेल्या निवेदनामुळे भोकर प्रशासनाला खडबडुन जाग आली असुन दि.१६संप्टेंबर पासुन अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे करुन थाटलेल्या दुकानावर बुलडोझर चालवुन अतिक्रमणे हटवाविण्यास सुरवात केली आहे.
या मोहिमेचे व प्रशासनाचे विद्यार्थी,पालक , सर्व शिक्षक व तालुक्यातील नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
भोकर येथील शाहु महाराज विद्यालयात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यी आज घडिला शिक्षण घेत आहेत हे विद्यालय किनवट रोडवरील बोरगाव रोडवर असुन या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी आनेक लहान मोठे व्यावसायिक, कृषी दुकानादार,व व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्या मुळे विद्यार्थ्यांना जिव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत होते तसेच या मुख्य रस्त्यावरुन किनवट, हिमायतनगर, आदिलाबाद कडे जानारी मोठी वाहणे व प्रवाशी वाहतूक सुसाट वेगाने ये जा करत असल्याने अपघात घडुन विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता.
या बाबद गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा मुद्दा प्रलंबित होता त्या मुळे नाविलाजास्तव प्राचार्यांनी उपोषणाचे शस्त्र हाती घेतल्याने प्रशासन खडबडुन जागे होऊन अतिक्रमणे हटवाविण्यास सुरवात केली.
या मोहिमेत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका,पोलिस प्रशासन यांनी सक्रीय सहभाग घेऊन अतिक्रमणे काढून शहरातील मुख्य रस्त्यांना मोकळा स्वास दिला.

14 September 2023

ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे

अन्यथा ओबीसी समाज शासनाविरुद्ध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल;ओबीसी समाज शिष्टमंडळाने तहसिलदार भोकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पाठविले निवेदन

भोकर : समाजोन्नतीसाठी आरक्षण मागणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि संविधानिकतेने तो सर्व वंचित,उपेक्षितांना मिळालाच पाहिजे.मराठा समाजास ही आरक्षण मिळालेच पाहिजे व त्यांचे आम्ही समर्थनच करतोत.नव्हे तर त्यांच्या मागणीस ओबीसी समाज बांधवांचा पाठिंबा आहे.परंतू मराठा समाजास आरक्षण देत असतांना ओबीसी समाज आरक्षण कोट्यास धक्का न लागता त्यांना आरक्षण देण्यात यावे,आणि असे न केल्यास शासनाच्या विरोधात सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,असे भोकर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी म्हटले असून उपरोक्त मागणीसह आदी मागण्यांचे निवेदन भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.११ सप्टेंबर रोजी ओबीसी समाज समन्वय समिती व समाज बांधवांच्या एका जंम्बो शिष्टमंडळाने पाठविले आहे.

सबंध राज्यात मराठा आरक्षण व आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आंदोलनांनी तीव्रता वाढविली आहे.याची दखल राज्य व केंद्र शासनाने घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.त्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी पाठिंबा दर्शविला आहे.परंतू ओ.बी.सी.समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना ते आरक्षण द्यावे.कारण ओबीसी प्रवर्गात जवळपास ४०० जातींचा समावेश असून त्या एकूण जातींसाठी केवळ २७ टक्के आरक्षणाची तरतूद केलेली आहे.जर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजास ओबीसी मध्ये आरक्षण दिले गेले तर त्याचा परिपुर्ण फायदा मराठा समाजास होणार नाही,तसेच ओबीसी समाजाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसानच होणार आहे.


त्या अनुषंगाने राज्य व केंद्र शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण कोट्यात वेगळी टक्केवारी निर्माण करुन आरक्षण द्यावे.तसेच राज्य पातळीवर बिहार राज्याच्या धरतीवर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगनना करून ओबीसींना न्याय द्यावा. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्हयात ओबीसी मुले, मुलीं अर्थातच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारी वसतीगृहे निर्माण करुन देण्याची अंमलबजावणी करावी.अन्यथा सखल ओबीसी समाज बेमुद्दत आमरण उपोषण व लोकशाही पद्धतीने विविध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.असे म्हटले असून उपरोक्त आशयानुसार ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे,बिहार राज्याच्या धरतीवर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगनना करण्यात यावी,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यात यावेत यांसह आदी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ओबीसी समन्वय समिती ता. भोकरच्या वतीने दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथून एक भव्य रॅली काढली व तहसिल कार्यालय भोकर येथे त्या रॅलीची सांगता करण्यात आली.


यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणारे उपरोक्त मागण्यांचे निवेदन ओबीसी समन्वय समितीच्या जंम्बो शिष्टमंडळाने तहसिलदार राजेश लांडगे यांना दिले.त्या शिष्टमंडळात ओबीसी नेते नामदेव आयलवाड,संदिप पाटील कोंडलवार,ॲड. शेखर कुंटे,बी.आर.पांचाळ,बालाजी नार्लेवाड, माधवराव अमृतवाड,मोहनराव राठोड, उपसभापती बालाजीराव शानमवाड,संचालक उज्वल केसराळे,संचालक गणेशराव राठोड, संचालक राजू अंगरवाड,माजी उपसभापती सुरेशराव बिल्लेवाड,ओबीसी नेते नागोराव शेंडगे,नागनाथ पाटील कोंडलवार,ज्ञानेश्वर गोदेवाड,सुदाम आडे,सुभाष नाईक,बालाजी यलपे,निळकंठ वर्षेवार,रमेश महागावकर, गजानन गाडे,पांडुरंग वर्षेवार,ॲड.परमेश्वर पांचाळ,सत्यम रेड्डी किनीकर,राजेश्वर रेड्डी लोकावड,गजानन गाढे,नागोराव दंडे,भुमारेड्डी किनीकर,गंगाधर महादावाड,माधवराव कस्नुरे, पुंडलिक तोटावाड,संतोष आनेराये,दिगंबर लालवंडे,साईनाथ फेटेवाड,दिगंबर पप्पूलवाड, जगणराव बुट्टनवाड,दिलीप बाच्चेवाड,रमेशराव राठोड यांसह आदींचा समावेश असून त्या निवेदनावर ओबीसी समन्वय समितीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

थेरबन येथे बीआरएस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

भोकर :तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के.सी आर साहेब यांचे विश्वासू नेते तथा भारत राष्ट्र समिती नांदेड जिल्ह्याचे व भोकर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक आदरणीय नागनाथरावजी घिसेवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली थेरबन येथे बीआरएस पक्ष सदस्य नोदणी व पुढिल रणनिती संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन गावकरी मंडळींनी केले असता गावातील नागरिकांनी ज्यास्तीत ज्यास्त संख्येने बीआरएस पक्षात जाहीर प्रवेश केला व गावातील नागरिकांनी कायम आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून नारा दिला नागनाथ घिसेवाड साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है!
 त्यावेळी BRS चे कार्यकर्ते भीमरावजी दुधारे साहेब, गोविंदरावजी देशमुख साहेब, BRS चे कार्यकर्ते व थेरबन या गावातील सर्व महिला मंडळ, गावातील सर्व नागरिकांची ज्यास्त संख्येने उपस्थिती होती.गावातून एकचं नारा घुमत होता अपकी बार किसान सरकार

बैल पोळ्याच्या दिवशी कत्तलीसाठी जाणारे २२ गोवंश भोकर पोलीसांनी पकडले

गोवंशासह ट्रक घेतला ताब्यात; आरोपी मात्र पसार होण्यात झाले यशस्वी

भोकर : तालुक्यातील सोमठाणा ते पाळज रस्त्यावरील देवठाणा शिवारात जागरुक गोरक्षकांनी बैल पोळ्याच्या दिवशीच पहाटे कत्तलीसाठी गोवंश नेत असलेला ट्रक देवठाणा शिवारात पकडला व भोकर पोलीसांच्या स्वाधीन केला आहे.सदरील ट्रकमध्ये जवळपास २२ गोवंश कोंबून नेत असल्याची गंभीर बाब समोर आली असून कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात गोवंश नेत असलेले आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.तर सदरील गोवंशाना मौ.वाकद ता. भोकर येथील गोशाळेत सुरक्षितरित्या सोडण्यात आले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकर पोलिसांत सुरु आहे.

बुधवार दि.१३ सप्टेंबर रोजी पांडूरणा ता.भोकर येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन गाई चोरुन नेत असल्याची घटना ताजी असतांनाच दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी बैल पोळ्याच्या दिवशी पहाटे ४:३० वाजताच्या दरम्यान जागरुक गोरक्षकांनी सोमठाणा ते पाळज रस्त्यावरील मौ.देवठाणा ते मसलगा शिवारात कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात असलेला ट्रक क्र.एम.एच.४० एन.७५१७ पकडला.तसेच ११२ क्रमांक डायल करून भोकर पोलीसांना याबाबदची माहिती देण्यात आली.त्यावरुन पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,पो.उप. नि.विकास आडे,सहा.पो.उप.नि. संभाजी देवकांबळे,जमादार भिमराव जाधव,जमादार नामदेव जाधव,पो. कॉ.चंद्रकांत अरकिलवाड,गृहरक्षक ढगे,जाधव,यांसह आदींचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहचला. दरम्यानच्या काळात घटनास्थळी गोरक्षकांचा मोठा जमाव जमत असल्याचे पाहून गोवंशाने भरलेला तो ट्रक तेथेच सोडून गोवंश तस्कर व चालकाने पलायन केले.

सदरील रस्त्याने तेलंगणा राज्यात अनेकवेळा कत्तलीसाठी गोवंश नेल्या जात असल्याची चर्चा उपस्थितांत होत होती.यावेळी देखील दोन ट्रक जात होते असे उपस्थितांतून बोलल्या जात होते.पकडण्यात आलेल्या 'त्या' ट्रकचे टायर पंचर झाल्याने हे गोवंश सुदैवाने बचावले आहे.महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्त्या प्रतिबंधीत कायदा लागू आहे.परंतू तेलंगणा राज्यात तसे नसल्याने नांदेड जिल्ह्यातील किनवट,हिमायतनगर, भोकर,धर्माबाद,बिलोली व देगलूर तालुका मार्गे तेलंगणा राज्यात सर्रासपणे गोवंश नेल्या जात असल्याची खळबळजनक बाब समोर येत असून गोवंश तस्करांना कायद्याची भिती राहिली नसल्याचे दिसून येत आहे.आज राज्यात सर्वत्र बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांनाच काबाडकष्ट करून सर्वांच्या मुखी घास भरवणारे शेतकऱ्यांचे हे मित्र मात्र कत्तलीसाठी जात होते. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ते आज सुदैवाने बचावले आहेत. सदरील गोवंशाना मौ.वाकद येथील गोशाळेत सुरक्षिरित्या सोडण्यात आले असून पो.नि.नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'त्या' आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकर पोलीसात सुरु होती.

08 September 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिली प्रारंभाचा होत आहे शताब्दी सोहळा

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील 'ग्रेज इन' या संस्थेतून प्राप्त केलेल्या बॅरिस्टर या सर्वोच्च पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या संस्मरणीय आणि ऐतिहासिक घटनेचा शताब्दी सोहळा साजरा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात दि.०९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एक राखी सैनिकांसाठी उपक्रमास शाळेकडुन मिळाला उदंड प्रतिसाद

भोकर प्रतिनिधी:- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने एक राखी सैनिकांसाठी व एक संदेश सैनिकासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.या उपक्रमास श्री शाहू महाराज विद्यालय भोकर, कै. लक्ष्मणराव घिस्सेवाड विद्यालय भोकर, मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालय भोकर व नूतन केंद्रीय प्राथमिक शाळा भोकर या शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून उदंड प्रतिसाद दिला.सुमारे अडीच हजाराच्या वर राख्या व संदेश संकलित करून मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयातील सैनिकांना या राख्या बांधण्यात आल्या.
   आपल्या देशांचे वीर जवान सैनिक बांधव हे मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमावर्ती भागात गस्त घालत असतात. त्यामुळेच आपण आपल्या घरी सुखी समाधानाने व आनंदाने जीवन जगत असतो. सैनिकांचे अनेक सण उत्सव हे देशाच्या सीमेवरच त्यांना साजरे करावे लागतात.तेव्हा त्यांच्या त्यागाची व समर्पणाची आठवण ठेवून राखी पौर्णिमेच्या पवित्र सणा निमित्त त्यांना देशाच्या बहिणीकडून राखी बांधणे हे आपले परम कर्तव्य आहे या जाणिवेतून पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने एक राखी सैनिकासाठी व एक संदेश सैनिकासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरवण्यात येऊन यासाठी शहरातील शाळेतून राख्या व संदेश संकलित करण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमास भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालय चे मुख्याध्यापक संजय देशमुख कामनगावकर व तेथील शिक्षक वृंद,कै.लक्ष्मणराव घिस्सेवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर व तेथील शिक्षक वृंद,मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.चौधरी मॅडम व तेथील शिक्षक वृंद आणि नूतन केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पठेवाड सर व तेथील शिक्षक वृंद व त्या त्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद देऊन अडीच हजाराच्या वर राख्या व संदेश संकलित केले. 
  दिनांक ५ सप्टेंबर२०२३रोजी मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण विद्यालयातील सर्व सैनिक बांधवांना विधीवत राख्या बांधून राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयाचे मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया यांनी मनापासून आभार मानले व सर्वांना धन्यवाद दिले. तसेच या उपक्रमास सर्व शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीनेही त्यांचे शतशः आभार मानण्यात आले. 
   हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बावळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, 
कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,सचिव प्रा.आर.के. कदम,उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, उपाध्यक्ष कमलाकर बरकमकर,कोषाध्यक्ष बालाजी पाटील कदम,सहसचिव विठ्ठल सुरलेकर,समन्वयक सुधांशू कांबळे,संघटक विशाल जाधव,पदाधिकारी सारंग शेठ मुंदडा, गजानन गाडेकर,संभाजी कदम,रमाकांत जोशी,राजेश चंद्रे,विनय दुर्केवार आदिसह सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

06 September 2023

भोकर येथील ४ शाळांनी वीर जवानांना दिल्या २ हजार ५०० राख्या व संदेश पत्र

भगिणींचा आशिर्वाद देश रक्षणासाठी आम्हास उर्जादायी - लीलाधर महाराणीया(मुख्य कमांडंट)

कें.रि.पो.बल प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

भोकर येथील ४ शाळांनी वीर जवानांना दिल्या २ हजार ५०० राख्या व संदेश पत्र

मुदखेड : माता,मातृभूमी अर्थातच देश रक्षणासाठी आम्ही सदैव कर्तव्यतत्पर असतोत.हे कर्तव्य पार पाडतांना आम्हास शुभेच्छा व आशिर्वादाची नक्कीच अपेक्षा असते. देशातील माता भगिणींच्या शुभेच्छा व आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेच आणि आज रक्षा बंधनातून हजारो भगिणींनी आम्हास शुभेच्छारुपी आशिर्वाद दिला आहे तो आशिर्वाद देश रक्षणासाठी आम्हास उर्जादायी ठरणार आहे.असे प्रतिपादन केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड चे मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया यांनी व्यक्त केले. केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात दि.५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 'रक्षाबंधन' कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
लॉयन्स क्लब नांदेड,ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय शाखा मुदखेड व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर यांच्या सहभागातून केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय,मुदखेड येथे दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी वीर जवानांना राखी बांधण्याच्या निमित्ताने 'रक्षाबंधन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात संपन्न झालेल्या 'रक्षाबंधन' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया हे होते.तर डिप्टी कमांडंट अमित कुमार शर्मा,असिस्टंट कमांडंट जाकी कुमार,असिस्टंट कमांडंट वासुदेव, असिस्टंट कमांडंट हरी प्रसाद, एस.एम.दिनेश कुमार,असिस्टंट डॉ.निलेश यांसह लॉयन्स क्लब चे पदाधिकारी,ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बहेणजी,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या पदाधिकारी पत्रकार बांधवांनी 'वीर जवानांसाठी 'एक राखी व शुभेच्छा संदेश पत्र' देण्याचे आवाहन शालेय विद्यार्थी भगिणींना केले होते.या आवाहनास भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालय भोकर,कै.लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालय भोकर,कै. मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय भोकर,जि.प.कें.प्रा.नुतन शाळा भोकर च्या विद्यार्थी भगिनींनी उदंड प्रतिसाद दिला होता.या ४ शाळांच्या माध्यमातून जवळपास २ हजार ५०० राख्या व शुभेच्छा संदेश पत्र जमा झाली होती.त्या राख्या व शुभेच्छा संदेश पत्र एकत्र करुन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड,कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,सचिव प्रा.आर.के.कदम, उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, कमलाकर बरकमकर,कोषाध्यक्ष बालाजी कदम पाटील,सहसचिव विठ्ठल सुरलेकर,समन्वयक सुधांशू कांबळे,संघटक विशाल जाधव, पदाधिकारी सारंग शेठ मुंदडा, गजानन गाडेकर,संभाजी कदम, रमाकांत जोशी यांसह आदींनी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड येथे नेले होते. संपन्न झालेल्या 'रक्षाबंधन' कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या उपरोक्त सर्व पदाधिकारी बांधवांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया यांचा शॉल,पुष्पहार व मिठाई देऊन यथोचित सन्मान केला.तर पत्रकार संघाच्या वतीने सौ.रिता बाबळे,कु. भाग्यश्री बाबळे,कु.गायत्री कदम,कु. श्रुती सुरलेकर,की.गौरी सुरलेकर,कु. द्रविडी कांबळे,कु.दीक्षा पडवळे,कु. मनस्वी पडवळे,कु.गौरी पडवळे,कु. रक्षा पडवळे,कु.अनुष्का गाडेकर,कु. सांची कदम यांनी त्या राख्या व शुभेच्छा संदेश पत्र केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले व उपस्थित अधिकारी,प्रशिक्षक आणि वीर जवानांचे औक्षण करुन राख्या बांधून,मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. तसेच लॉयन्स क्लबच्या पदाधिकारी भगिनी,ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बहेणजींनी ही राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

यावेळी लॉयन्स क्लब चे पदाधिकारी, ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बहेणजी यांनी आयोजित 'रक्षाबंधन' कार्यक्रमास अनुसरुन मनोगत व्यक्त केले.तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी ' वीर जवानांसाठी एक राखी व एक शुभेच्छा संदेश पत्र' उपक्रमाविषयीची पार्श्वभूमी विषद केली.याचबरोबर उपस्थित वीर जवानांना शुभेच्छा दिल्या व सदरील राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करून घेतल्यामुळे केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रमुखांचे आणि एक राखी एक संदेश पत्र देणाऱ्या शालेय विद्यार्थी भगिणींचे आभार मानले.तर अध्यक्षीय समारोप करताना मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया पुढे म्हणाले की,आई ही प्रत्येकांची पहिली गुरु व तद्नंतर शिक्षक,प्राध्यापक आणि जीवनपथावर भेटणारे अनेकजण गुरु असतात.पहिल्या गुरुस सर्वश्रेष्ठ स्थान असून त्या गुरुंसह आपल्या आपल्या माता,भगिणी यांचा शुभाशिर्वाद व पत्नींचे पाठबळ आम्हास घर संसार सोडून देश रक्षणासाठी उन,वारा,पाऊस यांसह शत्रूंशी सामना करण्याची शक्ती देते. त्यामुळे शिक्षक दिन व रक्षाबंधन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही स्त्री शक्तीस वंदन करतोत आणि सर्वांना शुभेच्छा देतोत,असे ही ते म्हणाले. सदरील कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी वीर जवानांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. एम.दिनेश कुमार यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्वांनी अल्पोपहाराचा स्वानंद घेतला व शस्त्र प्रदर्शिनीतून शस्त्रांची माहिती जवानांकडून घेतली.

03 September 2023

डॉ.अण्णा भाऊ साठे यांची अमृततुल्य साहित्य संपदा स्वाभिमानाने जगण्यासाठीचे वरदान - उत्तम बाबळे

गोरठा येथे साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा जयंती सोहळा आनंदोत्सवात साजरा

भोकर : 'मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही',असा मौलिक संदेश देणाऱ्या साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या अनुभवाने प्राप्त केलेल्या प्रतिभेतून समता,बंधूता, न्याय,त्याग,शिस्त,प्रामाणिकता,निष्ठा,करुणा,शील,देशभक्ती जपत 'स्वाभिमानाने जगण्यासाठी लढा देत मरणाऱ्यांचे' संघर्षमयी दिशादर्शक साहित्य निर्माण केले आहे.म्हणूनच डॉ.अण्णा भाऊ साठे यांची ती अमृततुल्य साहित्य संपदा स्वाभिमानाने जगण्यासाठीचे वरदान ठरली आहे.असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.ते गोरठा ता.उमरी येथे दि.३० ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती सोहळ्या प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

गोरठा ता.उमरी येथे दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ११:०० वाजता माजी सभापती तथा युवानेते शिरिश भाऊ देशमुख यांच्या हस्ते नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी तळ हातावर पृथ्वी असलेल्या विज्ञानवादी लाल ध्वजाचे रोहण करण्यात आले. यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे हे होते.तर उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती शिरिश भाऊ देशमुख गोरठेकर,उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,संभाजी सावंत,ओंकार सावंत,नामदेव बड्डेवाड,धोतरे,दत्ताजी हैबतराव,एन.एम.कांबळे,एस.एच. कांबळे,जे.डी.हातोडे,डी.जे. सोनकांबळे,पचलिंग,मानवहित लोकशाही पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष गजानन गाडेकर,सर्व ग्राम पंचायत सदस्य यांसह आदींची उपस्थिती होती.

यावेळी जयंती सोहळ्यास अनुसरून शिरिश भाऊ देशमुख गोरठेकर, पो.नि.विश्वनाथ झुंजारे,शाळकरी विद्यार्थी,बार्टीच्या समतादुत सौ. जयश्री गायकवाड हैबतकर,जे. डी. हातोडे,डी.जे.सोनकांबळे यांसह आदीं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोप करताना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रांतियोद्धा वीर फकिरा राणोजी साठे यांच्या पुर्वजांना दिलेल्या ऐतिहासिक तलवारीची आणि भारताला पवित्र संविधान देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची द्वीधार साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या 'झुंजार लेखणीला' होती. त्यामुळेच त्यांचे अजरामर साहित्य अभ्यासकांच्या अनेक पिढ्यांसाठी जागतिक पातळीवर व विद्यापीठांतून 'आव्हान' म्हणून उभे राहिले आहे. असे ही ते म्हणाले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त केलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना पो.नि.विश्वनाथ झुंजारे,संपादक उत्तम बाबळे, गजानन गाडेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वही,पेन शालेय साहित्याचे वाटप करुन स्तुत्य उपक्रम राबविला.तर गावातील या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचनासाठी उपलब्ध व्हावे म्हणून सामाजिक जाण असलेले उपक्रमशिल व्यक्तिमत्त्व डी.जे.सोनकांबळे यांनी ५ हजार रुपयांच्या कादंबऱ्या व आदी साहित्य देण्याचे घोषित केले असून ते लवकरच घेऊन देणार आहेत. त्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सदरील सभेचे प्रास्ताविक व सुरेख असे सुत्रसंचालन अशोक हैबतकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार एन.एम.कांबळे यांनी मानले.तसेच जाहीर सभेच्या समारोपानंतर गावातील मुख्य रस्त्याने डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.आनंदोत्सवात संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्या निमित्तच्या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव हैबतकर,उपाध्यक्ष गौतम सोनकांबळे,उमेश हैबतकर, अरविंद हैबतकर (मु.पोलीस), शिवाजी हैबतकर,बळीराम हैबतकर, माधव हैबतकर,पंढरी हैबतकर, शिवराम,विजय,नागन कांबळे, मनोहर वाघमारे,समस्त हैबतकर परीवार,कांबळे, सोनकांबळे परिवार व आदींनी परिश्रम घेतले.

गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून सतत संघर्ष करणारा, संघर्षातून पुढे येत असलेल्या युवा नेतृत्व, शहाजी पाटील शिंदे

              उगवत नेतृत्वlशहाजी पा.शिंदे|जीवन चरित्र 
शहाजी पाटील शिंदे यांचा जन्म हळदा तालुका कंधार येथे झाला हळदा हे गाव नांदेड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव या गावात मोठमोठे प्रशासकीय अधिकारी मोठमोठे राजकारणी व आमदार कंधार तालुक्यातील राजकीय सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणजे हाळदा.
हळदा गावात ग्रामसेवक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस अधीक्षक,डॉक्टर, वकील असे मातबर प्रशासकीय अधिकारी राजकारणातील पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सभापती खरेदी-विक्री संघाचे चेअरमन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध पक्षातील मातब्बर नेते व हळदा गावातील आमदार असा हाळदयाचा इतिहास आहे.
याच गावात शहाजी पाटील यांचा जन्म 5 सप्टेंबर 1982 ला झाला आजोबा हनुमंतराव पाटील शिंदे शिक्षक मुख्याध्यापक होते तर वडील बाबाराव पाटील शिंदे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. बाबाराव पाटील शिंदे शिवसेनेचे कंधार तालुका प्रमुख (१५ वर्ष) उपजिल्हाप्रमुख खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य असे विविध पदे भूषविलेले वडील असताना शहाजी पाटील हे सुद्धा सामाजिक कार्यात रस असल्याने तेसुद्धा समाजाचे काही देणे लागतो म्हणून समाजसेवा करण्यासाठी युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या प्रेरणेतून संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश केला सुरुवातीला संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष नंतर जिल्हा संघटक या पदावर काम करीत असताना शहाजी पाटील यांच्या कामाची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी पाटील यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून सामाजिक कार्य करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली.
शहाजी पाटील यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये असताना तालुकास्तरीय बळीराजा महोत्सव हाळदा येथे संभाजी ब्रिगेड चे राज्य नेते आनंद दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. शहाजी पाटील दरवर्षी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपत असतात.
मध्यंतरीच्या काळात राजमुद्रा सामाजिक संघटनेत प्रवेश केला राजमुद्रा चे संस्थापक आदरणीय सचिन पाटील इंगोले प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद पाटील तेलंग राज्य सचिव सचिन भाऊ चव्हाण यांनी शहाजी पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन
राजमुद्रा च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदाची फार मोठी जबाबदारी दिली राजमुद्रा च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून संघटन मजबूत करण्यासाठी राजमुद्रा च्या गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा धडाका लावला संघटन मजबूत करत असताना कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कंधार तहसील कार्यालयावर रुमणे मोर्चा काढून राजमुद्रा कायम शेतकरी बांधवा सोबत असल्याचे दाखवून दिले सतत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम राजमुद्रा च्या माध्यमातून चालू आहे कंधार तालुक्यातील खराब रस्त्यामुळे बांधकाम विभागातील अनोखे आंदोलन आजही चर्चिले जाते.
कोरोणाच्या महामारी रक्ताचा तुटवडा भासल्यामुळे प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन महारक्तदान शिबिराचे मुखेड येथे आयोजन करून 189 रक्तदात्यांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. मराठा आरक्षणाचा व शेतकरी बांधवांवरील व जिल्ह्यातील विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या आदेशावरून केले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर राजमुद्रा चा आक्रोश मोर्चा हा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा होता आक्रोश मोर्चात प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. आक्रोश मोर्चा यशस्वी झाला तो फक्त सहकारी कार्यकर्तानमुळेच असेही शहाजी पाटील सांगत असतात.
अडचणीत असणाऱ्या ला मदत करणे हा शहाजी पाटील यांचा छंदच . आपला सहकारी किंवा मित्र अडचणीत सापडला तर न कोणी सांगतात स्वतः पुढे होऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील सुखात कमी पण दुःखात सर्वात पुढे असणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील साधी राहणीमान उच्च विचारसरणी असणारे शहाजी पाटील वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणे हा त्यांचा एक चांगला गुण.
एसटीचा प्रश्न असो तहसीलचा असो पंचायत समितीचा असो पोलीस स्टेशनचा प्रश्न असो त्या ठिकाणी स्वतः जाऊन मदत करणारा कार्यकर्ता शहाजी पाटील.
शहाजी पाटील यांनी बहुजन साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटनेचे ७ वर्ष प्रदेशाध्यक्षपदा वर सुद्धा काम केले आहेत. प्रदेशाध्यक्ष असताना शहाजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर पुणे मुंबई व !!दिल्ली संसद भवनावर!
सुद्धा प्रेरक-प्रेरिकांना न्याय मिळावा म्हणून आंदोलने मोर्चे काढणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील. जातीपातीला न मानणारा. आपल्या मित्रासोबत सहकाऱ्या सोबत कुठेही बसणारा साधा सरळ वागणारा मानपान न बघणारा शांत संयमी वेळ प्रसंगी आक्रमक होणारा कार्यकर्ता म्हणजे शहाजी पाटील.
प्रत्येकाला आपला वाटणारा निस्वार्थी निर्भड स्पष्ट बोलणारा आक्रमक मन्याडचा वाघ म्हणून ओळख निर्माण केली आहे. शहाजी पाटील यांच्यासोबत जिवाभावाचा कार्यकर्ता आहे मित्रपरिवार खूप मोठा आहे.राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यात रूजवण्यासाठी गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून सतत संघर्ष करणारा, संघर्षातून पुढे येत असलेल्या युवा नेतृत्व, विश्वासु नेतृत्व, अडचणीत १०० टक्के मदत करणार नेतृत्व, झुंजार नेतृत्व, मनमिळावु नेतृत्व, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार नेतृत्व, मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय शहाजी पाटील शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छुक
श्रीकांत पाटील बस्वदे
जिल्हा सचिव
राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

02 September 2023

ढाणकी येथे पत्नीचा गळा कापून फरार झालेल्या आरोपीस भोकर पोलिसांनी केली अटक.


भोकर: यवतमाळ जिल्ह्यातील मौजे ढाणकी ता उमरखेड येथे सासरवाडीत जाऊन पत्नीचा सुरीने गळा कापून खून करुन पसार झालेल्या आरोपीस भोकर पोलिसांनी सिताफीतीने पकडून अटक केली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की भोकर तालुक्यातील मौजे चिंचाळा येथील शिवाजी दशरथ नारमवाड यांनी उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे आपल्या माहेरी वडिलांकडे असलेली पत्नी कविता शिवाजी नारमवाड हिचा चरित्राच्या संशयावरून राहते घरी धारदार सुरीने गळा कापून खून केला होता.
त्यानुसार पोलीस स्टेशन बिटरगाव बु तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे गुरव नंबर २७८/२०२३ कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच सदरील गुन्ह्यातील आरोपी हा फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होती सदरिल गुन्हातील आरोपी भोकर पोलिसांना मौजे चिंचाळा तालुका भोकर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील पोलीस हवालदार सय्यद मोहीम, भीमराव जाधव, चालक राजेश दुधाडे , होमगार्ड अझर काजी यांनी दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मौजे चिंचाळा येथे जाऊन मोठ्या सीताफतीने सापळा रचून आरोपीस अटक करून भोकर पोलीस स्टेशन येथे आणून सदर आरोपीस भोकर पोलिसांनी पोलीस स्टेशन बिटरगाव(बु) जिल्हा यवतमाळ यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास बिटरगाव(बु) पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येणार आहे.