भोकर : समाजोन्नतीसाठी आरक्षण मागणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि संविधानिकतेने तो सर्व वंचित,उपेक्षितांना मिळालाच पाहिजे.मराठा समाजास ही आरक्षण मिळालेच पाहिजे व त्यांचे आम्ही समर्थनच करतोत.नव्हे तर त्यांच्या मागणीस ओबीसी समाज बांधवांचा पाठिंबा आहे.परंतू मराठा समाजास आरक्षण देत असतांना ओबीसी समाज आरक्षण कोट्यास धक्का न लागता त्यांना आरक्षण देण्यात यावे,आणि असे न केल्यास शासनाच्या विरोधात सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,असे भोकर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी म्हटले असून उपरोक्त मागणीसह आदी मागण्यांचे निवेदन भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.११ सप्टेंबर रोजी ओबीसी समाज समन्वय समिती व समाज बांधवांच्या एका जंम्बो शिष्टमंडळाने पाठविले आहे.
सबंध राज्यात मराठा आरक्षण व आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आंदोलनांनी तीव्रता वाढविली आहे.याची दखल राज्य व केंद्र शासनाने घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.त्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी पाठिंबा दर्शविला आहे.परंतू ओ.बी.सी.समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना ते आरक्षण द्यावे.कारण ओबीसी प्रवर्गात जवळपास ४०० जातींचा समावेश असून त्या एकूण जातींसाठी केवळ २७ टक्के आरक्षणाची तरतूद केलेली आहे.जर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजास ओबीसी मध्ये आरक्षण दिले गेले तर त्याचा परिपुर्ण फायदा मराठा समाजास होणार नाही,तसेच ओबीसी समाजाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसानच होणार आहे.
त्या अनुषंगाने राज्य व केंद्र शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण कोट्यात वेगळी टक्केवारी निर्माण करुन आरक्षण द्यावे.तसेच राज्य पातळीवर बिहार राज्याच्या धरतीवर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगनना करून ओबीसींना न्याय द्यावा. याचबरोबर महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्हयात ओबीसी मुले, मुलीं अर्थातच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारी वसतीगृहे निर्माण करुन देण्याची अंमलबजावणी करावी.अन्यथा सखल ओबीसी समाज बेमुद्दत आमरण उपोषण व लोकशाही पद्धतीने विविध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.असे म्हटले असून उपरोक्त आशयानुसार ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे,बिहार राज्याच्या धरतीवर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगनना करण्यात यावी,महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्यात यावेत यांसह आदी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ओबीसी समन्वय समिती ता. भोकरच्या वतीने दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथून एक भव्य रॅली काढली व तहसिल कार्यालय भोकर येथे त्या रॅलीची सांगता करण्यात आली.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येणारे उपरोक्त मागण्यांचे निवेदन ओबीसी समन्वय समितीच्या जंम्बो शिष्टमंडळाने तहसिलदार राजेश लांडगे यांना दिले.त्या शिष्टमंडळात ओबीसी नेते नामदेव आयलवाड,संदिप पाटील कोंडलवार,ॲड. शेखर कुंटे,बी.आर.पांचाळ,बालाजी नार्लेवाड, माधवराव अमृतवाड,मोहनराव राठोड, उपसभापती बालाजीराव शानमवाड,संचालक उज्वल केसराळे,संचालक गणेशराव राठोड, संचालक राजू अंगरवाड,माजी उपसभापती सुरेशराव बिल्लेवाड,ओबीसी नेते नागोराव शेंडगे,नागनाथ पाटील कोंडलवार,ज्ञानेश्वर गोदेवाड,सुदाम आडे,सुभाष नाईक,बालाजी यलपे,निळकंठ वर्षेवार,रमेश महागावकर, गजानन गाडे,पांडुरंग वर्षेवार,ॲड.परमेश्वर पांचाळ,सत्यम रेड्डी किनीकर,राजेश्वर रेड्डी लोकावड,गजानन गाढे,नागोराव दंडे,भुमारेड्डी किनीकर,गंगाधर महादावाड,माधवराव कस्नुरे, पुंडलिक तोटावाड,संतोष आनेराये,दिगंबर लालवंडे,साईनाथ फेटेवाड,दिगंबर पप्पूलवाड, जगणराव बुट्टनवाड,दिलीप बाच्चेवाड,रमेशराव राठोड यांसह आदींचा समावेश असून त्या निवेदनावर ओबीसी समन्वय समितीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







0 comments:
Post a Comment