जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 September 2023

एक राखी सैनिकांसाठी उपक्रमास शाळेकडुन मिळाला उदंड प्रतिसाद

भोकर प्रतिनिधी:- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने एक राखी सैनिकांसाठी व एक संदेश सैनिकासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.या उपक्रमास श्री शाहू महाराज विद्यालय भोकर, कै. लक्ष्मणराव घिस्सेवाड विद्यालय भोकर, मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालय भोकर व नूतन केंद्रीय प्राथमिक शाळा भोकर या शाळेतील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून उदंड प्रतिसाद दिला.सुमारे अडीच हजाराच्या वर राख्या व संदेश संकलित करून मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयातील सैनिकांना या राख्या बांधण्यात आल्या.
   आपल्या देशांचे वीर जवान सैनिक बांधव हे मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमावर्ती भागात गस्त घालत असतात. त्यामुळेच आपण आपल्या घरी सुखी समाधानाने व आनंदाने जीवन जगत असतो. सैनिकांचे अनेक सण उत्सव हे देशाच्या सीमेवरच त्यांना साजरे करावे लागतात.तेव्हा त्यांच्या त्यागाची व समर्पणाची आठवण ठेवून राखी पौर्णिमेच्या पवित्र सणा निमित्त त्यांना देशाच्या बहिणीकडून राखी बांधणे हे आपले परम कर्तव्य आहे या जाणिवेतून पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने एक राखी सैनिकासाठी व एक संदेश सैनिकासाठी हा उपक्रम राबविण्याचे ठरवण्यात येऊन यासाठी शहरातील शाळेतून राख्या व संदेश संकलित करण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमास भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालय चे मुख्याध्यापक संजय देशमुख कामनगावकर व तेथील शिक्षक वृंद,कै.लक्ष्मणराव घिस्सेवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर व तेथील शिक्षक वृंद,मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.चौधरी मॅडम व तेथील शिक्षक वृंद आणि नूतन केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री पठेवाड सर व तेथील शिक्षक वृंद व त्या त्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद देऊन अडीच हजाराच्या वर राख्या व संदेश संकलित केले. 
  दिनांक ५ सप्टेंबर२०२३रोजी मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण विद्यालयातील सर्व सैनिक बांधवांना विधीवत राख्या बांधून राखी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मुदखेड येथील केंद्रीय रिझर्व पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयाचे मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया यांनी मनापासून आभार मानले व सर्वांना धन्यवाद दिले. तसेच या उपक्रमास सर्व शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीनेही त्यांचे शतशः आभार मानण्यात आले. 
   हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बावळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, 
कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,सचिव प्रा.आर.के. कदम,उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, उपाध्यक्ष कमलाकर बरकमकर,कोषाध्यक्ष बालाजी पाटील कदम,सहसचिव विठ्ठल सुरलेकर,समन्वयक सुधांशू कांबळे,संघटक विशाल जाधव,पदाधिकारी सारंग शेठ मुंदडा, गजानन गाडेकर,संभाजी कदम,रमाकांत जोशी,राजेश चंद्रे,विनय दुर्केवार आदिसह सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

0 comments:

Post a Comment