जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

28 February 2019

अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ, अंमलबजावणीचा दुष्काळ: खा. अशोक चव्हाण


दुष्काळात होरपळणा-या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा होती पण सरकारने अर्थसंकल्पातून दुष्काळी जनतेच्या तोंडावर मोठमोठे आकडे फेकून दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प निराशा करणारा असून निवडणुकीच्या तोंडावर फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात हा अंतरिम अर्थसंकल्प असतानाही sनिधीच्या तरतुदीचे आकडे मात्र पूर्ण वर्षाचे दिले आहेत. या अर्थसंकल्पातील बहुतांश घोषणांची अंमलबजावणी ही नव्या सरकारला करावी लागणार आहे. मागच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली हे अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही.  शेतक-यांची कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दुष्काळी मदत याबाबत या अर्थसंकल्पात सरकारकडून काही ठोस कृती केली जाईल व आपल्याला मदत मिळेल अशी राज्यातील शेतक-यांची अपेक्षा होती पण सरकारने त्यांची निराशा केली आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात आयुष्यमान भारत योजनेची भलामण केली पण या योजनेसाठी राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजी तरतूद केली आहे. 
राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झालेली दिसत नाही. योजनांच्या तरतुदींना कात्री लावली आहे. पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये या सरकारने २५ योजना जाहीर केल्या होती, कृषी वर्ष जाहीर केलं होतं. त्याची कसलीही अंमलबजावणी राज्यात झालेली दिसत नाही. महसुली तुट वाढल्यामुळे त्यामुळे उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरूणाईवर याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होणार आहे. महिला, तरूण, विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांना या अर्थसंकल्पातून काहीही मिळाले नसून सर्व समाज घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

27 February 2019

भारतानं पाकिस्तानला जाणारी सर्व विमानं उड्डाणे केली रद्द!

नवी दिल्ली | भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानला जाणारी सर्व विमान उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. यासोबत भारतातील काही विमानतळांवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

भारतातील लेह, श्रीनगर, अमृतसर, शिमला, कुलु, पठाणकोट, चंदीगड, धर्मशाला या विमानतळांवरुन होणारी देशांतर्गत उड्डाण देखील रद्द करण्यात आली आहेत.

जम्मू काश्मीर आणि पंजाब राज्यामधील विमानतळांवरील उड्डाणं मे महिन्यापर्यंत रद्द केली गेली आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक सुरु झाली आहे.

पाकिस्तानने पकडलेल्या जवानाला काहीच नाही होणार. जाणून घ्या का ?


नवी दिल्ली : आज भारताच्या सीमा भागात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी भारताने देखील आपले फायटर जेट पाठवले. त्यानंतर पाकिस्तानचं विमान भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाडलं. पण या दरम्यान भारताच्या एक लढाऊ विमानावर पाकिस्तानने हल्ला केला. पाकिस्तानचा असा दावा आहे की, भारताचा एक पायलट त्यांच्या ताब्यात आहे. भारत सरकारने एक पायलट बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हटलं की, 'भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने देखील अॅक्शन घेतली. त्यानंतर भारताने कारवाईत पाकिस्तानचं एक विमान पाडलं.
या कारवाईमध्ये भारताचं एक विमान देखील पडलं. ज्यामध्ये भारताचा एक पायलट बेपत्ता आहे. त्याचा तपास करत आहोत.' पण पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार जर भारताचा पायलट जर खरंच त्यांच्या ताब्यात असेल तर मग आता त्याच्या सोबत काय केलं जाऊ शकतं.
आंतरराष्ट्रीय जिनेवा करारानुसार काही नियम बनवण्यात आले आहेत. यानुसार युद्धादरम्यान पकडल्या गेलेल्या जवानांना धमकावलं नाही जावू शकत किंवा त्यांचा अपमान नाही केला जावू शकत. ताब्यात असलेल्या जवानाबाबत जनतेत उत्सूकता देखील तयार नाही केली जावू शकत.
जिनेवा करारानुसार युद्धात पकडलेल्या जवानावर खटला चालवला जातो किंवा युद्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवलं जातं. जवानाला पकडल्यानंतर त्याचं नाव, सैन्यपद आणि त्याचा नंबर दुसऱ्या देशाला सांगितला जातो.
आतापर्यंत तसं अनेकांनी जिनेवा कराराचं उल्लंघन देखील केलं आहे. जिनेवा करार हा दुसरे विश्वयुद्धानंतर 1949 मध्ये तयार करण्यात आला. याचा मुख्य उद्देश मानवी मुल्य जपण्यासाठी आहे.

मोदींनी बोलावली बैठक ; 2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला तातडीची मंजूरी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही पाचारण करण्यात आलं आहे.
भारत-पाकिस्तानमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्याने युद्ध होण्याचे संकेत मिळत आहे.
2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला तातडीची मंजूरी देण्यात आली आहे. तसेच भारतीय हवाई दलाला 2 मिनिटांत उड्डाण करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोदींच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून बैठकीसाठी निर्मला सितारामन, सुषमा स्वराज, राजनाथ सिंग उपस्थित आहेत.नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही पाचारण करण्यात आलं आहे.
भारत-पाकिस्तानमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच दोन्ही देशांच्या हालचाली वाढल्याने युद्ध होण्याचे संकेत मिळत आहे.
2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला तातडीची मंजूरी देण्यात आली आहे. तसेच भारतीय हवाई दलाला 2 मिनिटांत उड्डाण करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोदींच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून बैठकीसाठी निर्मला सितारामन, सुषमा स्वराज, राजनाथ सिंग उपस्थित आहेत.

भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब



श्रीनगर : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आहे.
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यांनी नौशेरा, पुँच, राजौरी येथे बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून पाकिस्तानच्या विमानांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकूण तीन विमाने भारतीय हद्दीत आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघऩ केले आहे.
भारतीय हवाई दलाच्या 'मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले होते.
पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला होता. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही बदला घेतला जाईल असे म्हटले होते. त्यानुसार, पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

26 February 2019

*बेटी बचाव चा नारा देणार हे सरकार खरच महिलांच रक्षण करणार आहे का ?*

 बाभुळगाव : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे दि . 16 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित केला होता पांढरकवडा येथे नरेंद्र मोदी यांच्या महिला मेळाव्यात वर्ग 7 वी मध्ये शिकणारी क्षितिजा ह्या लहान मुलीला हातनाक प्राणाला मुकावे | लागले आहे सभास्थळी सकाळी 6 पासून महिला बोलावण्यात आल्याअसताना दुपारी 2 पर्यंत त्यांना न पाण्याची सोय न सावलीची सोय उपलब्ध केली गेली नव्हती . यातच क्षितिजा ही मुलगी देखील या मेळाव्यात आपल्या आई सोबत आलेली असताना पाण्याअभावी ती मृत्युमुखी पडली मोदींच्या सुरक्षतेसाठी व गर्दी कमी होऊ नये या साठी त्या मेळाव्यातील महिलांना । पाण्यासाठी पण पोलीस सभागृहा बाहेर पडू देत नव्हते एवढेच नाही तर त्यांच्या कडे असलेल्या पाणी बॉटल सुद्धा सुरक्षेच्या नावाखाली काढून घेण्यात आल्यात्यामुळे ब - याच जणांना पाण्याअभावी त्रास होत होते | | बेटी बचाव चा नारा देणार हे सरकार खरच महिलांच रक्षण करणार आहे का ? यावर मोठा प्रश्न या घटनेने | उपस्थित झाला आहे . या घटनेचा निषेध म्हणून विद्यार्थी | काँग्रेस अर्थात nsui चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी | तिन्ह नाराजी व्यक्त केली आहे . या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही महोदय तहसिलदार साहेबाणा | निवेदन देऊन विनंती करत आहोत की या कार्यक्रमाच्या आयोजकांवर व नरेंद्र मोदी यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा . निवेदन देतांना NSUI चे जिल्हाध्यक्ष कौस्तुभभाऊ शिर्के अक्षय राऊत उपजिल्हाध्यक्ष , | चंद्रशेखर परचाके उपाध्यक्ष यु काँ राळेगाव , राजुभाऊ काटेखर कृष्णाभाऊ ठाकरे तालुकाध्यक्ष यु . काँ . बाभुळगाव विलास चांदेकर निखिल गाडगे NSUI तालुकाध्यक्ष राजेश काटेकर वृषभ गुल्हाने NSUI उपाध्यक्ष मुकेश बोबडे उपाध्यक्ष NSUI . विपुल बोदडे . अभिभाऊ शेळके , सुवेध भेले आशिन दहाट स्वप्निल वानखडे स्नेहल दिघाडे , शाहरुख खान अध्यक्ष | शिवशक्ती महाविध्यालय सागर मस्कर , सुरज भारती , संघपाल डोफे , जितेश पडघाण मो मुदस्सीर आदी । nsui चे पद्धाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . . .

25 February 2019

फेक व्हिडिओ शेअर केल्यास ब्लॉक होणार अकाउंट










नवी दिल्ली - फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर फेक न्यूज, फेक व्हिडिओ आणि फेक फोटोवर निर्बंध घालण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फेसबुक, गुगल, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सरकारने आदेश दिले आहेत, की त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर होणाऱ्या फेक फोटो आणि व्हिडिओवर बंदी घालावी.
याबाबत सरकारचे म्हणणे आहे, की दररोज किंवा एक दिवसाआड प्लास्टिकचे तांदूळ, प्लास्टिकची कोबी आणि अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर होत आहेत. समाजात असे व्हिडिओ अफवा पसरवत आहेत आणि खाण्या-पिण्याच्या वस्तूंवरुन लोकांचा विश्वास उडत चालला आहे. सोशल मीडिया कंपन्यांना सरकारने आवाहन केले आहे, की जे खाण्या-पिण्याचे फेक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतात त्यांचे अकाउंट तातडीने ब्लॉक करण्यात यावे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी सोशल मीडियाला हे आदेश दिले आहेत.
पवन अग्रवाल म्हणाले, की सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ-फोटो शेअर करणे देशाची जनता आणि व्यापारी दोघांसाठीही हानिकारक आहे. यासंबंधी सोशल मीडिया कंपन्यांच्या हेड ऑफिसला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने निवेदन देखील पाठवले आहे. एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता ज्यामध्ये दावा करण्यात आला होता, की अंडे हे प्लास्टिकचे बनवण्यात येत असून दुधामध्ये केमिकल्स मिसळण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशा प्रकारच्या फेक व्हिडिओला आळा घालण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आता अशाप्रकारचे फेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याऱ्यांची खैर नाही.काही नागरिक उगीच कोणताही विडिओ  पडताळणी न करता ते पुढे पाठविले जाते.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

*व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे 'फिंगरप्रिंट लॉक' हे नवे फिचर*


आपल्या युझर्ससाठी व्हॉट्सअॅप हे नेहमीच काही ना काही नवी फिचर्स दरवेळेस आणत असते. यावेळी व्हॉट्सअॅपने संभाषण आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लवकरच 'फिंगरप्रिंट लॉक' हे नवे फिचर आणणार आहे. आपल्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही या फिचरमुळे व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

हे फिचर व्हॉट्सअॅपवरील संभाषण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आणण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक जण सध्या आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप लॉक करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात. पण व्हाट्सअॅपच्या या नवीन फिचरमुळे थर्ड पार्टी अ‌ॅप्स वापरण्याची गरज पडणार नाही. व्हॉट्सअॅपकडून यासोबतच इतरही काही फिचर्स आणली जाणार आहेत.

कंपनीकडून व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. पण आपला मोबाईल फोन अनेकदा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले व्हॉट्सअॅप मेसेजेस वाचले जाण्याची भिती अनेकांना असते. आता फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे परवानगी शिवाय व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे.

लवकरच व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड युजर्स साठी 'डार्क मोड'चे अपडेट येण्याची शक्यता आहे. डार्क मोडमुळे रात्रीच्या वेळी मोबाईल वापरताना डोळ्यांना त्रास कमी होतो तसेच मोबाईलच्या बॅटरी लाईफवरही याचा चांगला परिणाम होतो.

त्याचबरोबर 3D टच अॅक्शन हे फिचर आयफोन युजर्ससाठी असणार आहे. या फिचरमुळे एखाद्याला न कळत त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहता येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षी स्टिकरचे नवीन अपडेट आणल्यानंतर ते प्रचंड लोकप्रिय ठरले होते. व्हॉट्सअॅप आता लवकरच 'स्टिकर इन्टिग्रेशन' फिचर आणणार आहे. या फिचरमुळे युजर्सना स्टिकर पाठवण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरुन व्हॉट्सअॅपवर स्टिकर पाठवता येणार आहे.

सध्या व्हॉट्सअॅपवर ऑडिओ मेसेज पाठवायचा असल्यास तो रेकॉर्ड केल्यानंतर पाठवण्याआधी ऐकण्याची सोय नाही. या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरून एखादा ऑडिओ मेसेज पाठवताना रेकॉर्ड केल्यानंतर तो ऐकता येणार आहे. आपल्या मोबाईल फोनवरील ऑडिओ किंवा म्यूजिक फाईल्सची यादी अॅपमध्ये दिसेल. तसेच एकाच वेळी 30 ऑडिओ फाईल्स पाठवता येणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या सेवेची संधी द्या -आ.अमिताताई चव्हाण

बारुळ : नांदेड जिल्ह्याचा विकास पुढे ठेवण्यासाठी मतदारांनी जिल्ह्याची सेवेची संधी द्यावी , असे प्रतिपादन खंडगाव येथे आ . अमिता चव्हाण यांनी केले .
पेठवडज जि . प . गट हा लोकसभेसाठी नांदेड मतदारसंघात असून त्या अनुषंगाने हमीद खंडगाव येथे आ . अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीत बूथ कमिटी बैठक व जाहीर सभा घेण्यात आली . त्यावेळी आ . अमिता चव्हाण यांनी लोकसभेसाठी निवडून देऊन एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले तसेच राहिलेली काही कामे असतील तर ते पूर्ण करण्याचा शब्द दिला .
कार्यक्रमाला माजी जि . प . अध्यक्ष दिलीप येटमोगरेकर , काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे , उपाध्यक्ष मनोहर पाटील चिखलीकर , माजी महापौर मंगला निमकर , जि . प . सदस्या शीला उलगुलवाड , प्रकाश उलगुलवाड उपस्थित होते . यावेळी उपस्थितांची भाषणे झाली . यावेळी डॉ . रंजित काळे , प्रकाश उलगुडवाड , संजय मालीपाटील , देवीदास कारभारी , अविनाश काळे , डॉ . श्रावण रॅपनवाड , मारोती पंढरे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळवंत वडजे यांनी केले .

24 February 2019

श्रध्देय विलासरावजी देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण लोकार्पण सोहळा | संपन्न


लातूर:(विलासनगर)
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना विलासनगर ता जि लातूर येथे # लोकनेते _ श्रध्देय विलासरावजी देशमुख साहेब _ | पुर्णाकृती पुतळा _ अनावरण _ लोकार्पण सोहळा | संपन्न झाला यावेळी माजी राज्यपाल मा शिवराज पाटील चाकुरकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा आशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री मा सुशिलकुमार शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब माजीमंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब , माजीमंत्री मधुकरराव चव्हाण माजी मंत्री बस्वराज पाटील मुरूमकर , श्रीमती वैशालीताई देशमुख , आमदार | अमितभैया देशमुख , सिने अभिनेते रितेश देशमुख , जि . प सदस्य धिरज देशमुख यांच्यासह मान्यवर , | लोकप्रतिनिधी पदाधिकारी आदी उपस्थित होते

तालुका पञकार संघाच्या अध्यक्षपदी मारोती भालेराव तर कार्यध्यक्षपदी सुनिल कदम

बिलोली (ता.प्र.)
-----------------------------------------------
महाराष्ट्र राज्य पुरोगामी पत्रकार संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी पत्रकार मारोती भालेराव तर कार्यध्यक्षपदी सुनिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे घोषीत संघाचे जिल्हाध्यक्ष अनुराघ पोवळे यांनी केले आहेत.या वेळी प्रमुख उपस्थिती संघाचे विभागीय प्रमुख विकास गजभारे, पत्रकार सुनिल कांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिलोली तालुका शहर अध्यक्ष मुन्ना पोवाडे यांची होती.
सदर पञकार संघाची बैठक दि.23फेब्रुवारी रोजी संघाचे जिल्हाध्यक्ष अनुराग पवळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामग्रह बिलोली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुरोगामी पञकार संघाचे नियम व अटी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष सुनिल कदम यांनी केले.सखोल चर्च अंती एल.पि.गोणेकर यांनी सुचविल्या प्रमाणे अध्यक्षपदी मारोती भालेराव तर कार्यध्यक्षपदी सुनिल कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या सोबतच संघाची कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.सचिव डी.टी.सुर्यवंशी. संजय पोवाडे(उपाध्यक्ष) सुरेश देवकरे  (सहसचिव), मार्तंड जेठे (संघटक), राजु बाभळीकर (प्रसिद्धी प्रमुख) , लालबा गोणेकर (कोषध्यक्ष)मारोती भदरगे व संजय जाधव (सल्लागार ) सदस्य वाघमारे प्रल्हाद ,गौतम वाघमारे ,प्रकाश फुगारे,विजय सोनकांबळे,कमलाकर जमदाडे,दिंगाबर काचमोड,सोपान गारे,शंकर पवारे या सदस्यासह मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रकाश फुगारे यांनी केले .

.. .पण अमित शहा तडीपार होते,हे ही लक्षात ठेवा-धनंजय मुंडे

बीड | छगन भुजबळ जामीनावर आहेत, हे आम्हाला माहित आहे. पण भाजप अध्यक्ष अमित शहा हे तडीपार होते, हे ही लक्षात असू द्या, असं म्हणत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
परळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेचा समारोप शनिवारी झाला. यावेळी मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
मी मुख्यमंत्र्यांना सांगू ईच्छितो की तुम्हे मुख्यमंत्री असाल, मात्र आमच्या वाटेला येऊ नका. नाहीतर जशास तसे उत्तर देण्याची आमच्यात ताकद आहे, असं मुंडे म्हणाले.
दरम्यान, छगन भुजबळांनी आमच्यावर टीका करु नये. ते जामीनावर सुटले आहेत, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं
नांदेड येथे मुख्यमंत्री   देवेंद्र फडणविस हे आलेले असताना त्यांनी छगन भुजबळ यांना ते म्हणाले होते की छगन भुजबळ हे जामिनावर आहात म्हणुन म्हणाले असता त्यांच प्रतीउत्तर विधापरीषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले.