जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 January 2024

सिद्धार्थ महाविद्यालयात ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा

मुंबई ( चंद्रकांत कांबळे) नमिता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित सिध्दार्थ महाविद्यालय, बौराडपाडा, बदलापुर,मुंबई येथे २६ जाने गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रमूख विश्वस्त नागेश संभाजी जाधव, संचिव मीना नागेश जाधव, तसेच व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .
सकाळी ८.४५ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळा व महाविद्यालयात नृत्य स्पर्धा,भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामधील विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी मांचावरील प्रमुख पाहूणे व विद्यार्थ्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडले.महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संविधानाचे महत्त्व विषद करताना देशासाठी संविधान किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. प्राध्यापक संदीप कर्णेकर यांनी संविधान काल, आज आणि उद्या या विषयावर सखोल मार्गदर्शनपर केले. दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठाण, किनी, ता. भोकर, जि. नांदेड च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देउन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कला शिक्षक चंद्रकांत कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक नवनाथ केदार यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. तसेच विलास कड़ाळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष संगेवार यानी उपस्थितांचे आभार मानले.

-बोथि येथील राशन चे धान्य जाते कुठे. राशन दुकानदार जोमात मात्र लाभार्थी कोमात.


भोकर:तालुक्यातील मौ. बोथी येथील गरिबांच्या स्वस्त धान्यावर स्वस्त धान्य दुकानदाराचा डल्ला याकडे प्रशासन जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहेत. गावकऱ्यांकडुन संताप व्यक्त करण्यात आल आहे, यात शासन दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय केशरी कार्डधारकांना अन्न पुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. अनेक ठिकाणी दलाल सक्रिय झाले असून,रेशनिंगचा गहू, तांदूळ खरेदी करून मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात आहे. बोथी - तुराटी मधून दर दोन ते तीन दिवस आड हैदराबादकडे रेशनचा तांदुळ मोठ्या प्रमाणात ट्रक द्वारे पाठवला जातो यात जिल्ह्यातुन मोठे अधिकारी पासून तालुक्यातील कमर्चारी यांची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे या वर एल. सी. बी. डिपार्टमेंट राजकारणी पुढाऱ्यांचा हसतशेप असल्याची गोपनीय माहिती मिळत आहे. काळ्या बाजारात दर दोन ते तिन दिवसाला ट्रक मध्ये साधरणता चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल रेशनचा तांदूळ काळ्या बाजारत जात असतात शंका येऊ नहे म्हणून GJ पासींगच्या गाड्या वापरल्या जातात यात महत्वाची बाब अशी की तालुक्यातील एक व्यक्ती प्रमुख भुमीका निभावत असतो त्याचा त्याला दर महिन्याला मोबदला दिला जातो. एलसीबी चा एक अधिकारी या नियंत्रण ठेवत असतो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याची देखभाल करत असतात, माहितीस काही गोपनीय माहितीनुसार गाडीला कोणी अडवल किवा थांबवल्यावर स्थानिक पोलीस प्रशासन व काही एल सी बी अधिकाऱ्याचा थेट फोन कॉल येत असल्याची माहिती मिळत आहे. या काळ्या बाजारात जाणारा तांदुळ मोठ्या प्रमाणात त्या त्या तालुक्यातील प्रशासन व अधिकारी यांच्याशी संबंध असल्याचे जिल्हातील अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचे माहिती मिळत आहे. या सर्व प्रकरावर गावातील जनतेतून मोठा प्रश्न निर्माण झाला तरी गोरगरीब जनतेचा थोडातून घास हिसकावून बाहेरच्या राज्यात काळ्या बाजारत तांदूळ व्रिकी केला जात आहे काही लाभार्थी तांदूळ तर काही लाभार्थी गहू विक्री करीत आहेत. जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लोक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे तांदूळ शेजाऱ्या बाजारात ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लाभार्थी गव्हाचा वापर करताना त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते. परंतु तांदूळ एका व्यक्ती मागे 4 किलो तांदूळ मिळत असल्याने तांदूळ वापर करीत नाहीत. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारही प्राप्त होत नाही. यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही. जो मुळ राशन कार्ड धारक आहेत त्यांना राशन मिळत नाही. यातून दलालांचे मात्र चांगभले होत आहे व संबंधित विभागाचे व प्रशासनाचे खिसे भरल्या जात आहे. सदर डिसेंबर महिन्यात पावती फाडून सुद्धा राशन देत नाही स्वत धान्य दुकानदार बालाजी वाघे हा धारकास आरे रावेची उध्दट भाषा बोलुन हाकलून देतो काल 26 जानेवारी रोजी गावात आलॉस्मेट करून शशंभर लोकांना दुकानासमोर बसुन ठेवून लोकांची दिशाभूल केली लवकर प्रशासनाने लायसन्स रद्द करून स्वत धान्य दुकानदार बालाजी वाघे तुराटीकर याच्याविरुद्ध योग्य कारवाई करावी अशी जोरदार चर्चा कार्ड धारकांकडून होत आहे.

29 January 2024

राष्ट्रीय मतदार दिन निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे संकल्प अकॅडमी,भोकर च्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य !

भोकर : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय,नियोजन भवन नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात संकल्प अकॅडमी,भोकरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून समाजाला एक अभिनव दिशादर्शी संदेश दिला असून त्यांच्या अभिनयातून प्रकटलेल्या संदेशाचे नांदेड जिल्हाअधिकारी अभिजित राऊत यांनी कौतूक करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सद्यस्थितीत १२ वी नंतर विद्यार्थी हे डॉक्टर आणि इंजिनियर ह्या दोनच पदाच्या प्राप्ती साठी धडपड करत असतांना दिसत आहेत.पण यात प्रत्येकाला यश मिळेल असे नाही आणि यश न मिळालेले विद्यार्थी मग चुकीच पाऊल उचलून आयुष्य संपवताना दिसत आहेत.तर भविष्यात उपलब्ध असणाऱ्या करीअरच्या विविध पर्यायाची विद्यार्थ्याना जाणीव करून देणारे व निवडणूक वेळी कोणत्याही दारू,पैशा सारख्या अमिषाला बळी न पडता मतदाराने मतदान करून योग्य उमेदवार निवडून आणला पाहिजे.तसेच आपला आणि देशाचा विकास साधावा असा संदेश देणारे पथनाट्य संकल्प ॲकडमी भोकर च्या विद्यार्थ्यांनी सादर केले आहे..
या पथनाट्य चमूत ॲकडमीच्या शिवम राठोड,चक्रधर कदम, कु.प्रांजल सुवर्णकार,कु.अनुष्का कोकाटे,कु.प्रतीक्षा सोळंके, कु.तनुजा गायकवाड,कु.ईश्वरी कुऱ्हाडे,कु.ऋतिका कल्याणकर, रितेश राठोड,आदित्य गडपाळे,अरुण जाधव,प्रतीक तेलंगे, श्रीकांत झुकरे आणि कृष्णा कदम या विद्यार्थी कलाकारांचा समावेश होता.

या सादरीकरणाबद्दल संकल्प अकॅडमीचे संचालक कुशल देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत,नांदेड दक्षिण मध्य रेल्वे चे विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार,महाराष्ट्र राज्य निवडणूक दूत डॉ.सान्वी जेठवाणी,अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाण,मतदान नोंदणी अधिकारी,विकास माने यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संकल्प अकॅडमीचां महत्वाकांक्षी संकल्प…

भविष्यात उपलब्ध असणाऱ्या विविध करिअर ऑप्शन ची विद्यार्थ्याना जाणीव व्हावी,तसेच १२ वी नंतर विद्यार्थ्यानी डॉक्टर किंवा इंजिनीयर या दोन पर्यायातच आडकुन न राहता, राष्ट्रीय स्तरावरील सर्वच पदांसाठी तयारी करणे.जसे की युपीएसी सारख्या परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. तसेच मतदान दिनाबदल जनजागृती करणे व त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास साधणे,हा संकल्प अकॅडमी चा नवा संकल्प असून सर्व कलाकार विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या सादरीकरणानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आणि सर्वांगिण विकासाचा संकल्प

25 January 2024

भोकर आगारात चालक दिन उत्साहात साजरा

भोकर प्रतिनिधी:- रा.प.महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनेनुसार दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी भोकर आगारात चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन सर्व यशस्वी चालकांचे आगार व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यातआले. 
 या चालक दिनाच्या औचित्यांने बस आगारात सुंदर रांगोळ्या टाकून मनमोहक वातावरण निर्माण करण्यात आले होते.रा.प.महामंडळात उत्कृष्ट केपीटीएल देणारे चालक व विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचा आगार व्यवस्थापक रा.मा.दिवटे,स.का.अधिक्षक र.गं. पाटील,वाहक निरीक्षक सं.बा.काकडे,आगार लेखाकार चिटेबोईनवाड ताई,आगारातून ३५ वर्ष विना अपघात सेवा करून सेवानिवृत्त झालेले चालक मा.को.शिरकंटे यांच्या हस्ते आगारातील सर्व चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आगार प्रमुख यांनी आपल्या मनोगतात चालक हा रा.प.महामंडळाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या योगदानामुळेच महामंडळ प्रगती करीत आहे असे गौरव उद्गार काढले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पत्रकार बालाजी नार्लेवाड व पत्रकार सुभाष तेले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ लिपिक श्रीदत्त चाटलावर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आगारातील सर्व कर्मचारी बांधवांनी मोलाचे योगदान दिले.

24 January 2024

राम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त भोकर मध्ये जल्लोष रॅली || मुस्लिम बांधवांनी देखील बाजारपेठ बंद ठेवून केले सहकार्य

भोकर प्रतिनीधी - अयोध्यातील रामाची अयोध्या नगरी मध्ये राम प्राणप्रतिष्ठा राम मंदिर सोहळा निमित्ताने भोकर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भव्यदिव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थी लेझीम पथक, बँड पथक, टाळ- मृदंग,घोडी नृत्य विविध कार्यक्रमाने उपस्थित त्यांचे आकर्षण ठरले.
युवक वर्ग तरुण मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मोठ्या उत्साहांमध्ये जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नावाचा जय जय कार करत सोहळ्यामध्ये बेफान होऊन आनंद उत्सव साजरा करत होते.महिला युवती सुद्धा जय श्रीराम चे नारे देवून डिजे च्या तालावर राम गीतावर डान्स केला.महिलांनी भजनी गात संपूर्ण रॅलीमध्ये पायी चालत श्रीरामाचा जयघोष करत होत्या, अनेक बालनर त्या लेझीमच्या तालावर ताल धरत होते संपूर्ण भोकर शहर, श्रीरामाचा गजर करत होते.
श्रीरामाच्या सोहळ्यामध्ये तल्लीन होऊन आनंद उत्सव साजरा करत होते या उत्सवामध्ये भोकर पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता डॉ.बी.आर.आंबेडकर चौकामध्ये शोभायात्रा आल्यानंतर फटाक्यांची विविध रंगीबेरंगी आकाशामध्ये आतिश बाजी करण्यात आली भोकर शहरातील सर्व व्यापार बाजारपेठ दुकाने शोभायात्रे संपेपर्यंत कडकडीत बंद होती सर्व भोकर राममय झालं होतं न भूतो न भविष्यती सोहळा भोकर वाशी यांना पाहायला मिळाला या शोभा यात्रेचा उपस्थित आणि मनसोक्त आनंद घेऊन सोहळ्यामध्ये तल्लीन झाला होता या कार्यक्रमाचे नियोजन भोकर विकास मंच आणि भोकर मधील सर्व राम भक्त होते.

===================================

 रक्तदान शिबिराचे माधव मेकेवाड यांनी आयोजन केले

     यावेळी अनेक जण राम भक्त मोठ्या जल्लोष करत राम भक्तांनी रक्त दान केले सर्व मिळून ४१ जणांना यावेळी गुरू गोविंद सिंह ब्लड बँक सेंटरचे चव्हाण सर यांनी रक्त दात्याना प्रमाण पत्र देण्यात आले. यावेळी मिरवणूक येत असताना जे सी बी च्या साह्याने पुष्प वृष्ठी यावेळी करण्यात आली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावेळी शास्त्री नगर ,गांधी नगर येथील राम भक्तांनी साईबाबा मंदिर मिरवणूक रस्त्यावर केला होता सर्व जणांनी सहकार्य केले.



   यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोकर तालुका आणि शहरातील नागरिकांचा विजयी दिवसाचा जल्लोष केला यावेळी साईप्रसाद जटालवार,माधव मेकेवाड,अशोक निळकंठे,बालाजी डवरे,गंगाधर गववैद्य,भूषण राठोड,विशाल जाधव,गोविंद आगलावे सह अन्य जण उपस्थित होते.

==============================

भोसी येथे हजरत सय्यद शहा बियाबाणी यांचे उर्स शरीफ यात्रेनिमत्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

भोकर – तालुक्यातील भोसी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हरजत सययद शहा बियाबाणी यांचा उर्स शरीफ कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून दि. २४ ते दि २७ जानेवारी दरम्यान भरवण्यात येणाऱ्या यात्रेचे गावकरी व परिसरातील जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व गावकऱ्यांकडून करण्यात आले आहे
दि.२४जाने वारी बुधवार रात्री ०९ वाजता हजरत शहा बियाबाणी यांचे संदल जुन्या गावातून निघनार आहे .दि.२५जाने रोजी दर्ग्याच्या ठिकाणी उर्स आणि दुर्गाजी लोकनाट्य मंडळाचे लोकजागृतीपर कार्यक्रम तर दि.२६ जाने शुक्रवार रोजी समस्त गावकरी मंडळींच्या वतीने कुस्त्यांचे जंगी सामने आयोजीत करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध सृष्टी फळ रोपवाटिकेचे संचालक, विविध पुरस्कार प्राप्त विज्ञाननिष्ठ प्रयोगशील अभ्यासू फळबागायातदार शेतकरी नंककिशोर दिगंबरराव गायकवाड (कौठेकर) यांच्याकडून कुस्तीचे पाहिले बक्षीस सात हजार अकरा रुपये मर्यादेपर्यंत ठेवण्यात आले आहे तर दुसरे बक्षिस
उपसरपंच सुरेश रामजी पाटील यांच्या कडुन पाच हजार अकरा रुपये,तिसरे बक्षिस सौ रत्नमाला गंगाधर सिंगेवाड
यांच्यातर्फे तीन हजार अकरा रू ठेवण्यात आले असून सोबतच अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे दिले जाणार आहेत. तेंव्हा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटीचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाअध्यक्ष डॉ. अशोक देशमुख व सर्व यात्रा कमेटी सदस्यांकडून करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक सलोखा राखून यात्रा शांततेत यशस्वी करून गावचे नावलौकिक करावे असे आवाहन सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत संदस्य , व सचिव ग्राम पंचायत , चेरमन सेवा स.सो.सा आणि यात्रा कमिटी व समस्त गावकऱ्यांकडून करण्यात आले आहे.
…………………………………………..


भोसी येथे प्रसिद्ध दर्गा सय्यद शहा बियाबानी यात्रे निमित्त ऊर्स व संदल यात्रा भरवण्याची पूर्वापार परंपरा आहे. या कार्यक्रमात दरवर्षी शेकडो भाविक सहभागी होऊन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी दर्ग्यात फुल व चादर चढवून प्रार्थना करतात. सर्व जाती धर्मासाठी ही दर्गा श्रद्धेचे ठिकाण आहे.

भोकरचे नवे ठाणेदार म्हणून सुभाषचंद्र मरकड रूजू

भोकरचे नवे ठाणेदार म्हणून सुभाषचंद्र मारकड रुजू 

भोकर -भोकर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून सुभाषचंद्र मारकड यांनी आज (दि.२४ जाने) पहिल्या सत्रात पदभार स्विकारला आहे.पो नि नानासाहेब उबाळे यांच्या जागी ते रुजू झाले आहेत.
नूतन पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड हे यापूर्वी नांदेड येथे ट्रॅफिक इन्चार्ज म्हणून कर्तव्य बजावले असून अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पूर्वीचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे हे शांत,संयमी मात्र कर्तव्यात कठोर असल्याची ओळख अल्पावधीत निर्माण करून भोकर तालुक्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले.त्यांची पदोन्नतीने सोलापूर येथे बदली झाली आहे.
नूतन पोलीस निरीक्षक मारकड यांच्या आगमनाने भोकर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी मजबूत उपाययोजना होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्वप्रथम भोकर ठाण्याच्या परिघात दिवस रात्र वावरणाऱ्या दलालांच्या टोळीची कशी नांगी मोडतील याकडे भोकरकरांचे लक्ष लागून आहे

22 January 2024

श्रृंगीऋषींनी जोडले भोकर चे आयोध्येशी पवित्र नाते तर माता सितादेवींच्या पदस्पर्षाने पावन झाली भोकर तालुक्यातील सिताखांडी

अयोध्येत दि.२२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम लल्ला ची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे.त्या औचित्याने भोकर तालुक्यातील पवित्र स्थळ श्रृंगीऋषी आश्रम व सिताखांडी विषयी प्रासंगिक लेख वाचकांसाठी-संपादक

 हिंदू पौराणिक कथांमधील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भगवान श्री रामाचे अयोध्येच्या सिंहासनावर आरोहण होणे.भगवान श्रीराम यांनी लंकेश्वर रावणाचा पराभव केल्यावर व १४ वर्षांचा वनवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर जो भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला तो न्याय आणि नीतिमान शासनाच्या स्थापनेचे प्रतीक होता,जिथे लोकांच्या कल्याणाला अग्रक्रम होता. भगवान श्री राम हे एक आदर्श राजा मानले जातात. ज्यांनी दया,करुणा,न्याय,शिस्त व शील जपत प्रजेसाठी राज्य केले.एक नीतिमान मर्यादा पुरुषोत्तम राजा म्हणून राबविलेल्या त्यांची कारकिर्दीला रामराज्य तथा एक आदर्श राज्य म्हणून मानले जाते.राज्याभिषेक सोहळ्याने अयोध्येत समृद्धी व शांततेच्या नव्या पर्वाची सुरुवातही झाली.भगवान श्री रामाच्या त्या कारकिर्दीत, राज्याची भरभराट झाली व लोक सुसंवादात सुरक्षित आणि आनंदाने जगले.राज्याभिषेक सोहळ्याला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वही होते.भगवान श्री रामाचे रामराज्याच्या सिंहासनावर आरोहण होणे हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिले जात होते.हा सोहळा एक भव्य दिव्य सोहळा होता,या नेत्रदीपक सोहळ्याचे  साक्षीदार होण्यासाठी व नवीन राजाला शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी ऋषी,मुनींसह अनेक विद्वान लोक त्यावेळी आयोध्येला गेले होते.या महान तपस्वी ऋषी मुनींतील एक नाव म्हणजे महान तपस्वी ‘श्रृंगीऋषी’ हे होय.भगवान श्री रामाचा राज्याभिषेक सोहळा हा वाईटावर नीतिमत्तेच्या विजयाचे,न्याय व नीतिमान शासनाची स्थापना, समृद्धी आणि शांततेच्या नवीन युगाची सुरुवात झाल्याचे प्रतीक होते.प्रचलित कथा व अख्यायिकांनुसार अशा ऐतिहासिक अजरामर सोहळ्याच्या पुजेत,होम हवन करण्यात ज्यांचे पवित्र हस्त लागले व सहभागी होण्याचे भाग्य ज्यांना लाभले आहे त्या महान तपस्वी श्रृंगऋषी यांचे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सोमठाणा,सावरगाव माळ, देवठाणा,रेणापूर,बटाळा, किन्हाळा,थेरबन व शिनगारवाडी या गावांच्या मधोमध असलेल्या जंगलात आणि पूर्व दिशेला वाहत जाणाऱ्या सुधा नदीच्या तीरी वास्तव्य झाले आहे.भोकर शहरापासून ५ ते ६ कि.मी.अंतरावर व सावरगाव माळ या गावापासून अगदी जवळ रेणापूर गावशिवार हद्दीत ‘श्रृंगीऋषी’ यांचे आश्रम आहे.प्रचलित अख्यायिकांनुसार या परिसरात भगवान श्रीराम, माता सितादेवी व लक्ष्मण यांचा या जंगलात प्रवास झाला आहे.या प्रवासादरम्यान माता सितादेवी यांना तहान लागली असता लक्ष्मणाने बाण मारला व त्याठिकाणी शुद्ध नितळ पाण्याचा एक झरा प्रवाहित झाला.त्या झऱ्याच्या पाण्याने माता सितादेवींची तहान भागली.परंतू काही दिवसांनी त्या झऱ्याच्या प्रवाहाची गती कमी झाली.ही बाब लक्षात घेऊन श्रृंगऋषी यांनी भगवान श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यास जातांना या झऱ्याचे पाणी आपल्या सोबत नेले व ते शरयू नदीच्या पवित्र पाण्यात टाकले आणि त्याठिकाणचे पाणी आपल्याकडे घेतले.तसेच त्यातील काही पाणी काशी येथे टाकले व तेथील पाणी सोबत घेतलेल्या त्या शरयूच्या पाण्यात मिसळले आणि राज्याभिषेक सोहळ्यावरुन परत येतांना ते पाणी आपल्या सोबत येथे आणले.सोबत आणलेले ते पवित्र पाणी त्या झऱ्याच्या उगमस्थानी टाकले.त्यामुळे तो झरा पुन्हा प्रवाहित झाला व १२ महिने वाहू लागला.ही किमया त्या पवित्र पाण्याचीच आहे म्हणावे लागेल.आजही तो झरा जीवंत असून उत्तर-दक्षिण वाहतो.शरयू व काशी येथील पवित्र पाणी या झऱ्याच्या उगमस्थानी टाकले गेले आणि हा झरा अजरामर प्रवाहित झाल्याने यास ‘शरयू-काशीचा’ झरा म्हणून ही काहीजण संबोधतात.याच झऱ्याच्या पश्चिमेस तपस्वी श्रृंगऋषी यांचे वास्तव्य झाले आहे.महान तपस्वी ‘श्रृंगीऋषी’ यांचे वास्तव्य झालेल्या ठिकाणी कालांतराने तपस्वी श्री विष्णुदत्त ब्रम्हचारी महाराज यांनी वास्तव्य केले आहे.श्री विष्णुदत्त ब्रम्हचारी महाराज हे देखील थोर तपस्वी व आयुर्वेदाची चांगली माहिती असणारे बहुगुणी व्यक्तीमत्व होते.त्यांनी गेल्या जवळपास ६५ ते ६७ वर्षांपूर्वी श्रृंगीऋषी मंदिर बांधले. या मंदिराची देखभाल ते करत असत. दरम्यानच्या काळात प.पु.ह.भ.प.श्री विष्णुदत्त ब्रम्हचारी महाराज हे शनिवार दि.६ एप्रिल १९६३ रोजी समाधिस्त झाले. त्यांची समाधी त्या मंदिर परिसरात आहे.श्रृंगीऋषी आश्रम व मंदिराचे मुख्य विश्वस्त म्हणून भोकर पंचायत समितीचे माजी सभापती अप्पाराव देशमुख सोमठाणकर हे येथील कामकाज पाहतात.मंदिराचा परीसर अंदाजे १.६० हेक्टर आर असून मंदिराच्या परिसरामध्ये प्राचिन महादेव मंदिर देखील आहे. तसेच श्री गणेश मंदिर व राधाकृष्ण मंदिर ही आहे.श्रृंगीक्षषींचे वास्तव्य झालेल्या ठिकाणी एक भूसूरुंग असून ते सद्या बंद करण्यात आले आहे.श्री दत्त‍ जयंतीच्या दिवशी तसेच श्रावण महिन्यामध्ये श्री श्रृंगीऋषी मंदिर व आश्रम येथे भावीकांची गर्दी असते.तसेच लक्ष्मणाच्या शक्तीमुळे येथील बारमाही झऱ्याचा उगम झाला आहे अशी श्रद्धा असल्यामुळे भक्तगण कार्तीक महिन्याामध्ये येथे दरवर्षी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजीत करतात.तर माता सितादेवींच्या पदस्पर्षाने पवित्र झालेल्या सिताखांडी येथून उगम झालेल्या सुधा नदीच्या पाण्यात या झऱ्याचे पाणी मिसळते व याच नदी प्रवाहावर बांधण्यात आलेला सुधा प्रकल्प हा मोठा जलाशय भोकर तालुक्यातील नागरिकांसाठी आशिर्वादरुपी वरदान ठरला आहे.तर माता सितादेवी,लक्ष्मण व श्रृंगीऋषी यांच्या पदस्पर्शाने भोकर तालुक्याची भूमी पावन झाली असून तपस्वी श्रृंगीऋषी यांनी येथील पाणी श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यास अयोध्या येथे नेऊन व शरयूचे पाणी येथे आणून आयोध्येशी भोकर चे पवित्र नाते जोडले आहे.

तर माता सितादेवींच्या पदस्पर्षाने पावन झाली भोकर तालुक्यातील सिताखांडी
भगवान श्रीराम कथा व प्रचलित अख्यायिकांनुसार भगवान श्रीराम हे १४ वर्षाचा वनवास संपवून पत्नी सितादेवी,लक्ष्मण यांच्या सोबत अयोध्येत परतल्यानंतर नतदृष्ट विचारांच्या लोकांनी माता सितादेवी यांच्या पवित्र चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या वल्गणा व कुजबुज सुरु केली.शीलवंत तथा मर्यादा पुरुषोत्तम राजा म्हणून ख्याती असलेल्या श्रीरामास ते सहन झाले नाही व त्यांनी भाऊ लक्ष्मणास पत्नी सितादेवी यांना परत वनवासात सोडण्यात यावे असे सांगितले. आज्ञाधारक भाऊ लक्ष्मणाने भावाचा आदेश शिरोवर घेतला व माता सितादेवी यांना वनवासात सोडण्यासाठी निघाले.याच दरम्यान माता सितादेवी यांचा प्रवास ज्या जंगलातून झाला त्या जंगल परिसरास ‘सिताखांडी’ म्हणून संबोधले गेले आहे.
उंच व घणदाट झाडे,दऱ्या,खोऱ्यांनी व्यापलेल्या ज्या भूमीत माता सितादेवी व लक्ष्मण आले तो भूमी परिसर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सिताखांडी होय. या ठिकाणी ते पोहचल्यावर माता सितेस तहान लागली असल्याने त्यांनी लक्ष्मणाकडे पाण्याची मागणी केली. परिसर नवखा,भयान जंगल,पाणी कुठेही आढळले नाही.त्यामुळे पाणी कुठे शोधायचे ? हे समजू न शकल्याने लक्ष्मणाने बाण मारून जमिनीतून पाणी वर काढले.त्या स्थळाला ‘लक्ष्मण डोह’ अशी ओळख मिळाली आहे.तो ‘लक्ष्मण डोह’ आजही आजही अस्तित्वात आहे.लक्ष्मणाने ते पाणी मोठ्या पर्णाच्या दोन द्रोणात घेतले व माता सितेस देण्यासाठी आणले.परंतू प्रवासात थकलेल्या माता सितेस तेथे झोप लागली.ती झोपमोड होऊ नये म्हणून लक्ष्मणाने माता सितेस उठविले नाही व त्या उठल्यावर पाणी पितील म्हणून त्या पाण्याचे एक द्रोण उशास व दुसरे द्रोण पायथ्यास ठेवले. माता सिता या गाढ झोपेत असल्याने पुर्वेस ठेवलेल्या द्रोणास त्यांचा पाय लागला व पश्चिमेस ठेवलेल्या द्रोणास हात लागून ते दोन्ही द्रोण लवंडले. त्या पाण्यातुनच पूर्वेला सुधा तर पश्चिमेला सिता अशा दोन नद्यांचा उगम झाला. आजही अस्तित्वात असलेल्या या दोन नद्यांचे उगमस्थान सिताखांडी आहे.तर या नद्यांच्या उगमस्थानावरुन दुसरी एक आख्यायिका अशी ही आहे की, येथे सितामातेसाठी असलेल्या स्नानगृहातून वाहणारे पाण्याचे दोन प्रवाह निघाले त्या प्रवाहांचे सुधा व सिता नदीत रुपांतर झाले. एकाच ठिकाणी उगम झालेल्या या दोन नद्यांचा पाणी प्रवाह एकाच दिशेने न वाहता विरुद्ध दिशेने वाहतोय हा माता सितेच्या पावित्र्याचा महिमा असून भौगोलीक व नैसर्गिक चमत्कारच आहे असे म्हटल्या जाते.
भोकर पासून ८ कि.मी.अंतरावर असलेल्या निसर्गरम्य सिताखांडी परिसराच्या मध्यभागातून महाराष्ट्र -तेलंगणा राज्यास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जातो.येथे उगम पावलेल्या सुधा नदीचा प्रवाह पुढे महान तपस्वी श्रृंगीऋषी आश्रम परिसरातून उगम पावलेल्या त्या बारमाही झऱ्याच्या पाणी प्रवाहात मिसळतो.याच संगमावर भोकर तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरलेला सुधा प्रकल्प हा मोठा जलाशय बांधण्यात आला आहे.तर याच सुधा नदीवर पुढे तेलंगणा राज्यातील म्हैसा मंडळ येथे गडन्ना सुधा वाघू हा विशाल जलाशय बांधण्यात आला.तसेच ही सुधा नदी पुढे दक्षिण गंगा म्हणून सर्व परिचित असलेल्या गोदावरी नदीत विलीन होते. त्यामुळे सुधा नदीस गोदावरीची उपनदी म्हणून ओळखल्या जाते.सिताखांडी येथे श्रीराम,सिता व लक्ष्मण यांचे मंदिर, महादेव मंदिर असून दर्शनासाठी व पर्यटनासाठी भाविक भक्तांसह अनेकजणांची ये-जा असते.भोकर तालुक्यातील सिताखांडी व तपस्वी श्रृंगीऋषी आश्रम पवित्र भूमी प्रभू श्रीराम यांच्या आनंदोत्सवी,सुख आणि दुःखाच्या कार्यकाळाची साक्षीदार असल्याने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सजायला पाहिजे होती ?मर्यादा पुरुषोत्तम राजा प्रभू श्रीराम,माता सितादेवी, लक्ष्मण यांच्या वनवास-दु:खाच्या काळात सिताखांडी व श्रृंगीऋषी आश्रम परिसरात त्यांचे पदस्पर्श झाला व ही भूमी पवित्र झाली.तर महान तपस्वी श्रृंगीऋषी यांनी प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेक आनंदोत्सवात सहभागी होऊन भोकर तालुक्यातील पवित्र जल अयोध्येत नेऊन भोकर चे आयोध्येशी पवित्र नाते जोडले.हे भोकर तालुक्यातील जनतेचे सौभाग्य आहे.भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री झाले असता त्यांनी सन २०१० मध्ये सिताखांडी परिसरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे.तर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी श्रृंगीऋषी आश्रम परिसरास तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे.असे असले तरी म्हणावा तसा या दोन्ही ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणचा विकास झालेला नाही. तर देशाचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्र भाई मोदी यांच्या हस्ते दि.२२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर जिर्णोद्धार व श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या मंगल औचित्याने संपूर्ण देशात आनंदोत्सव,दीपोत्सव साजरा केला जात आहे.भोकर शहर व तालुक्यातील अनेक गावांत ही आनंदोत्सव व दीपोत्सव साजरा केला जात आहे. ऐतिहासिक,पौराणिक,धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या सिताखांडी व श्रृंगीऋषी आश्रम येथे ही मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव आणि दीपोत्सव व्हायला पाहिजे. परंतू तसे होतांना दिसत नाही.सिताखांडी येथे देविदास महाराज यांच्या पुढाकारातून मंदिरात पुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.तर श्रृंगीऋषी आश्रम येथे सोमठाणा,सावरगाव माळ व आदी गावांतील भक्तगणांनी पुजा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ऐरवी निवडणूकींच्या प्रचार शुभारंभाचे श्रीफळ या ठिकाणी फोडणा-या पुढाऱ्यांनी मात्र या पवित्र ठिकाणांकडे पाठ फिरवल्याने अनेकांतून खंत व्यक्त होत आहे.तसेच भोकर तालुक्यातील सिताखांडी व तपस्वी श्रृंगीऋषी आश्रम पवित्र भूमी ही प्रभू श्रीराम यांच्या आनंदोत्सवी,सुख आणि दुःखाच्या कार्यकाळाची साक्षीदार असल्याने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने भव्य दिव्यत्वाने सजायला पाहिजे होती ? किमान अख्यायिकांवर विश्वास असणाऱ्यांनी तरी हे करायला पाहिजे होते,असे ही अनेकांतून बोलल्या जात आहे.

भविष्यात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या कलशारोहण सोहळ्या प्रसंगी तरी पवित्र श्रृंगीऋषी आश्रम ते सिताखांडी चा परिसर शुशोभित व्हायला पाहिजे,आनंदोत्सवी सोहळ्यांनी बहरला पाहिजे, श्रीराममय झाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो व थांबतो!

पत्रकारांनी वास्तविक लिखानावर भर देणे आवश्यक — नामदेव आयलवाडपत्रकार दिना निमित्ताने आयलवाड यांच्या कडून पत्रकारांचा सन्मान

भोकर:(प्रतिनिधी) येथील विश्रामगृहावर ओबीसी काँग्रेस नेते नामदेवराव आयलवाड यांच्याकडून पत्रकारांचा डायरी पेन देऊन दि २१ जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांस माजी जि.प.अध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर यांची उपस्थिती होती
भोकर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करणे कर्तव्य होते परंतू काही अपरिहार्य कारणास्तव ०६ जानेवारी पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकारांचा सन्मान करता आला नाही. दि २१ जानेवारी रोजी भोकर पत्रकारांच्या सन्मानासाठी विश्रामगृहावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधव अमृतवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना नामदेवराव आयलवाड यांनी पत्रकार हा समाजमनाचा आरसा असुन त्याने वास्तववादी लिखानावर भर देण्याची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी तत्कालीन काळांत अन्याय अत्याचाराविरुद्ध लिखानाचा कार्य केले.त्यामुळे पत्रकारितेचा वारसा समृद्ध झाला असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान दंडवे,माजी सभापती गोविंद बाबा गौड,बाजार समिती सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी जि.प.सदस्य प्रकाश भोसीकर,माजी जि.प.सदस्य बाळासाहेब रावणगांवकर उपसभापती शाहनमवाड,शहर अध्यक्षा सुलोचना ढोले,अनिता साबळे संचालक राजीव अंगरवार, सुलोचना ढोले ताई, राजूरकर ताई,खडकी सरपंच नामदेव तरंगे,पांडुरना सरपंच सुनील मदनवाड,जगन बुट्टनवाड आदीसह अनेकांची उपस्थिती होती.यावेळी नामदेव आयलवाड पत्रकार एल ए हिरे, अहेमद करखेलीकर,बालाजी पांचाळ,उत्तम बाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार बालाजी नार्लेवाड यांनी मानले.संचलन अटपलवाड यांनी केले

21 January 2024

लख्खा नूतन पुरुष पोलीस पाटील आत्माराम रुकमाजी बोयावार यांचा गावकऱ्यां कडून भव्य सत्कार !!


अंबादास के एल बोयावार  ता प्रतिनिधि 
देगलूर तालुक्यातील लख्खा येथे गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून  शिव लहू फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराने कार्य करणाऱ्या  शिक्षणाने  अनुभव असणाऱ्या व्यक्तीला पोलिस पाटील पदी निवड झाली याचा आनंद गावकऱ्या दिसून येत आहे  गावच्या सन्माननीय व्यक्तींनी नव नियुक्त पोलीस पाटील  याचं मन भरून शुभेच्छा दिल्या

रोहीपिंपळगाव येथील घटनेच्या आरोपी ला पकडण्यात पोलिसांना यश

मुदखेड: तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणारे पापी पोलीसांच्या ताब्यात
भोकर (प्रतिनिधी)-एका 6 वर्षीय बालिकेवर अत्यंत कुररतेने लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि नंतर तिचे प्रेत घरापासून 17 किलो मिटर दुर नेऊन टाकले. या नराधमाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी 12 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीतील दिनांक 14/01/2024 रोजी एका 06 वर्ष वयाचे मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाले वरुन पो. स्टे. मुदखेड गुरनं 02/2024 कलम 363 भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात
आला होता. सदर गुन्ह्यातील अपहत मुलीचा मुदखेड परिसरात शोध घेतला असता, दिनांक 15/01/2024
रोजी मुदखेड ते उमरी जाणारे रोडचे बाजुला उन्हाळे यांचे मोकळया जागेत अपन्हत मुलीचे प्रेत मिळुन आले.
मिळुन आलेल्या मुलीच्या प्रेताचा पंचनामा करुन सरकारी दवाखाना नांदेड येथे पोस्टमार्टम करण्यात आले.त्यामध्ये वैद्यकीय अभिप्रायानंतर सदर गुन्ह्यात कलम 302, 366 (अ), 376 (अब) 201 भा. दं. वि. सहकलम 6बालकाचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण कायदा प्रमाणे कलमे वाढ करण्यात आली आहेत.
नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक,नांदेड परिक्षेत्र,नांदेड व मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी घटनास्थळी भेट देवुन त्यांचे आदेशाने मा.श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक,भोकर, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुशीलकुमार नायक,श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा,नांदेड व पथकातील पोलीस अधिकारी,अंमलदार यांचा कॅम्प
मौजे रोहीपिंपळगाव ता.मुदखेड या गावात करण्यात आला होता.पोलीसांचे वेगवेगळे 06 तपास पथके तयार करुन पथकाकडुन गावातील लोकांना विचारपुस केली.
तसेच गोपनिय बातमीदार नेमण्यात आले, गुन्ह्यात भौतीक, तांत्रीक पुरावे हस्तगत करुन अज्ञात आरोपीचा शोध
घेण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनिय बातमी वरुन आरोपी दशरथ ऊर्फ धोंडीवा फुलाजी पांचाळ,
वय-23 वर्ष, व्यवसाय मजुरी / सुतारकी रा. रोहिपिंपळगाव ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपीस सदर गुन्हयाचे अधिक तपासासंबंधाने पोलीस कोठडी मिळणेकामी मा.न्यायालयात हजर केले असता, मा.न्यायालयाने आरोपीस दिनांक 31/01/2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्हयात इतर आरोपीचा सहभाग आहे
काय? याचा तपास चालु असुन, सदर गुन्हयाचा तपास श्री सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी
उप विभाग इतवारा हे करीत आहेत.
नमुद गुन्हयाचा तपास मा. श्री शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, मा.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक,
नांदेड, श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी
श्री सुशीलकुमार नायक, पोनि श्री उदय खंडेराय, वसंत सप्रे, सपोनि श्री चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, कमल शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, दशरथ आडे, गजानन दळवी स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार, मुदखेड पोलीस स्टेशनचे अमंलदार तसेच पो. स्टे. नांदेड ग्रामीण, इतवारा पो.स्टे. लिंबगाव व सायबर सेल येथील अमंलदार यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक

20 January 2024

त्या घटनेच्या निषेधार्थ भोकर शहर कडकडीत बंद

भोकर : प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील दिनांक १४ जानेवारी रोजी अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घुण खुनाच्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ भोकरकरांनी काल शनिवार दिनांक 20 रोजी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
१४जानेवारी रोजी रोहिपिंपळगाव येथील एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिचा निर्घुण खुन करुन एका रोडच्या कडेला तिचा मृतदेह फेकण्यात आला होता सदरील घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून महाराष्ट्रातील सर्व स्तरातून सदर घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्या अनुषंगाने भोकर शहरातील विविध राजकीय पुढाऱ्यांनी दिनांक १९ रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वानुमते एक दिवशीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्याच अनुषंगाने काल राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी भाजपा, बी आर एस राष्ट्रवादी काँग्रेस यासह सर्व सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने सदर घटनेच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी वर्गांनी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते यास प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील आपली प्रतिष्ठाने स्वयं स्फूर्तीने बंद ठेवून निषेध व्यक्त करत कडकडीत बंद

19 January 2024

संत सेवालाल महाराज यांच्या 285 वी जयंती निमित्त संत सेवालाल महाराज स्मारक समिती भोकर च्या वतीने बैठक संपन्न झाली

भोकर :दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साह साजरी करायची आहे त्यानिमित्ताने आज भोकर येथे समस्त बंजारा समाज वतीने संत सेवालाल महाराज नियोजित जागा किनवट रोड भोकर येथे बैठक आयोजित करण्यात आली, आज घेण्यात आलेल्या
बैठकीमध्ये विविध पक्षांमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी तथा कर्मचारी डॉक्टर वर्ग व्यापारी वर्ग शिक्षक वर्ग तरुण वर्ग व विविध संघटनेतील सर्व पदाधिकारी व तसेच स्मारक समिती भोकर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
यावर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती स्मारक समिती भोकर वतीने साजरी होणार असे समस्त बंजारा समाज यांच्या उपस्थितीत जाहीर केले

चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी 10 पथके तैनात

भोकर:-मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील एका चिमुकलीचे दि.१४ जानेवारी रोजी (रविवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पळवून नेऊन हत्या करण्यात आली असल्याची घटना सामोर येताच महाराष्ट्रभर याचे तीव्र पडसाद उमटत असून या ब्लाइंड घटनेचे नेमके गूढ स्पष्ट व्हावे, आरोपीचा शोध तात्काळ लागावा यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडून वेगवेगळे दहा पथके नेमण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांनी मुदखेड येथे पत्रकारांना दिली आहे.
मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील इयत्ता पहिलीत शिकणारी ०६ वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार मुदखेड पोलिसांत दि.१४ जानेवारी रविवारी दाखल करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा लागलीच कामाला लागली मात्र शेवटी सोमवारी सकाळी उमरी रोडवर एका झुडपात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे .या चिमुकलीचा खून का व कशासाठी आणि कोणी केला असेल? हे सर्व प्रश्न ब्लाइंड असल्यामुळे या प्रकरणाचे सस्पेन्स पहातापोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वेगवेगळे दहा पथके नेमून कामाला लावले आसल्याची माहिती देऊन याप्रकरणी नागरिकांनी तपासात पोलीसांना मदत करावे असेही आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे
……………………………………
दिनांक 15 तारखेस सकाळी उमरी रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालया जवळ त्या बालिकेचा मृतदेह सापडला असून याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. सायबर , डॉग पथक एललसीबी , लोकल पोलिस, आणि सीनियर ऑफिसर ऍडिशनल एसपी यांचा यात समावेश आहे. हत्यची ही केस “ब्लाइंड ” आहे रोहीपिंपळगाव हे खूप दुर्गम गाव आसल्याने गावामध्ये सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल मदत मिळत नाही पण सर्व टीम योग्य ग्राउंडवर फिरत असुन आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.
अविनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड

18 January 2024

रोहीपिंपळगाव येथील ९वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा क्रूर पद्धतीने हत्या केलेल्या आरोपीला तात्काळ अटक करून त्यास कठोर शासन करा -शिव भीम सेना भोकर

भोकर:- अंबादास बोयावार 
 मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील इयत्ता पहिलीतील एक चिमुकली दि.१४ जानेवारी रोजी (रविवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली होती. याबाबतची तक्रार मुदखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी सदर चिमुकली हरवल्याची नोंद करण्यात आलेली आहे.
               रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून खून झाला आहे.पोलिसांचे तपासचक्र अजूनहि सुरूच मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार मुदखेड पोलिसांत रविवारी दाखल झाल्यानंतरच पोलीस यंत्रणा कामाला लागली शेवटी सोमवारी तिचा मृतदेह शहराजवळ उमरीरोडवर एका झुडपात सकाळी आढळला. सदर चिमुकलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी अज्ञात आहेत.तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात यावेत.दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१५ जानेवारी 
(सोमवारी) रोजी सदर चिमुकलीचा मृतदेह उमरी रोडवर एका झुडपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील चौकशी मोहीम हाती घेतली असून आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी घटनेचे योग्य तो तपास व्हावा.सदरील घटनेचा शिव भिम सेना वतीने तीव्र निषेध करण्यात करण्यात आला आह्रे.में.मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर या सदरील प्रकरणी सी.बी.आय चौकशी करण्याचे आदेश द्यावे अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येईल,आणि अज्ञात आरोपीस अटक करावी असे निवेदन तहसीलदार भोकर मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन शिव-भीम सेनेच्या वतीने चंद्रकांत मुस्तापुरे यांनी निवेदन दिले.

17 January 2024

रोहीपिंपळगाव येथील मुलीचे अपहरण व खुन प्रकरणाचा तपास सी.बी.आय मार्फत करावा - मनसेची मागणी


भोकर प्रतिनीधी -  मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील इयत्ता पहिलीतील एक चिमुकली दि.१४ जानेवारी रोजी (रविवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली होती. याबाबतची तक्रार मुदखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी सदर चिमुकली हरवल्याची नोंद करण्यात आलेली आहे.
               रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून खून झाला आहे.पोलिसांचे तपासचक्र अजूनहि सुरूच होते.मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार मुदखेड पोलिसांत रविवारी दाखल झाल्यानंतरच पोलीस यंत्रणा कामाला लागली शेवटी सोमवारी तिचा मृतदेह शहराजवळ उमरीरोडवर एका झुडपात सकाळी आढळला. सदर चिमुकलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी अज्ञात आहेत.तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात यावेत.दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१५ जानेवारी 
(सोमवारी) रोजी सदर चिमुकलीचा मृतदेह उमरी रोडवर एका झुडपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर एकच खळबळ उडाली.
       सदर घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील चौकशी मोहीम हाती घेतली असून आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी घटनेचे योग्य तो तपास व्हावा.सदरील घटनेचा मनसेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आह्रे. मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर या सदरील प्रकरणी सी.बी.आय चौकशी करण्याचे आदेश द्यावे आणि अज्ञात आरोपीस अटक करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी भोकर मार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे.
      यावेळी साईप्रसाद जटालवार(ता.अध्यक्ष, भोकर),माधव मेकेवाड(शहराध्यक्ष, भोकर),गंगाधर वैद्य(शहर उपाध्यक्ष),अशोक निळकंठे(ता.उपाध्यक्ष, भोकर),राम गिनलवाड(ता.अध्यक्ष वाहतूक सेना),राहुल बुद्धेवाड(ता.उपाध्यक्ष, भोकर),विशाल जाधव(मनसे सैनिक),प्रवीण शेवाळे(मनसे सैनिक),दुर्गेश्वर तुंबलवाड,उमेश जिलेवाड  सह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.

व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

नांदेड : व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये ‘विविध स्पर्धा परीक्षा व इतर कलेमधील प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा’ त्यांच्या पालकांसमवेत सत्कार समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन,दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या ‘सायन्स व मॅथ ऑलिम्पियाड’ परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह ‘गोल्ड मेडल’ प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.या सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष नामदेव कार्लेकर, कासराळीचे सरपंच शंकर गायकवाड व शाळेचे प्राचार्य विरभद्र विभुते,सौ.रुचिरा बेटकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये गोल्डमेडल प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा हार व पुष्पगुच्छ देत मिठाई भरवून विषेश सत्कार व कौतुक करण्यात आले.यामध्ये प्रतीक्षा उपासे, शिवराज बनसोडे,अनुष्का जाधव,सार्थक कौटकर,निरव गायकवाड, साक्षी कर्नेवाड,श्रेया माने,रुपेश क्षीरसागर,अंतरा डुकरे,राजवीर काशीद व सर्वेश गुंडले आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासोबतच शाकुंतल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या विभागस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये व्यंकटेश्वराच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषक मिळवल्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचा देखील विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सोबतच सायन्स टीचर धनंजय गायकवाड व मॅथ टीचर रूचिरा बेटकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.          

व्यंकटेश्वराच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी आपली गुणवत्ता सिद्ध करत विशेष प्राविण्य प्राप्त केले.त्यामुळे शाळा नवीन असूनही,कमी विद्यार्थी असताना देखील शाळा आपल्या शिक्षकांच्या अथक मेहनतीमुळे व पालकांच्या सहकार्याने आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध करू शकलो. पुढेही असेच यश संपादन करत राहू असे मत प्राचार्य विरभद्र विभुते यांनी आपल्या प्रस्ताविकेत सांगितले.तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे यासाठी वसतीगृहाची व्यवस्था केली असून भविष्यात सर्व सोयी सुविधा पूरवत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष नामदेव कार्लेकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.

या सत्कार समारंभाने आम्ही भारावून गेलो व शाळा घेत असलेल्या मेहनतीवर आम्ही समाधानी असल्याचे पालकांनी सांगितले.सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश मोरे व आभार प्रदर्शन रुचिरा बेटकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय गायकवाड,भाग्यश्री नमले,अंजूषा कपाळे,जान्हवी जोंधळे,मेहफुजा मिस यांच्यासह माधव सूर्यकार यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार.

भोकर : राजधानी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या राष्ट्रीय तेंग -सु-डो कोरियन कराटे स्पर्धेत सुवर्ण, कास्य व ब्राँझ पदकांचे मानकरी ठरलेल्या खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षकाचा हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकाळा व ग्रामस्थांच्या वतीने सोमवार (दि.१५) रोजी सत्कार करण्यात आला.
दिनांक ०३ ते ६ जानेवारी २०२४ दरम्यान दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय तेंग- सु-डो (कोरियन ) कराटे नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत चिकाळा येथील स्फूर्ती देविदास राव पवळे हिच्यासह सलोनी विनोद सुरदसे हिने फाईट प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच धनश्री भगवान हाके व समीक्षा किरण बोईनवाड यांना सिल्वर तर अंजली संतोष सावते हिने ब्रॉन्झ पदक पटकावले आहे.
हे सर्व खेळाडू सध्या भोकर येथील विवीध शाळा, महाविद्यालयात शिकत असून त्यांना प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चिकाळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास बाबुराव चोंडे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधांशू कांबळे उपस्थित होते.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी खेळाडूंचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींसह क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर, स. शि. बालाजी गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पोलीस पाटील दत्ता चंदनवार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव कदम, डॉ.देविदास पवळे, पत्रकार शिवाजी सूर्यवंशी, धोंडीबा माने, शिवाजी भोसले, संगीता पवळे, अंगणवाडी सेविका सुनिता माने , स शी सूर्यवंशी, पंचलिंग मॅडम माधव बोडके आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मुख्याध्यापक जे डी वाघमारे यांनी केले.

16 January 2024

नांदेड जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प करु या-अ.पो.अधीक्षक अबिनाश कुमार

नांदेड  : वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हयात यावर्षी हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे.याअनुषंगाने आपण सर्वजण यावर्षी नांदेड जिल्हा अपघातमुक्त करण्याचा संकल्प करु या,असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले. 

यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ हे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.या अभियानाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपन्न झाले,त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती दलजित कौर जज,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक संजय पेरके,जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत,सहा.प्रादेशिक परिवहक अधिकारी संदीप निमसे,वाहतूक निरिक्षक पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड,गुटे,ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेडचे पोलीस निरीक्षक एैलाने,सहा.पोलीस निरीक्षक जगताप,शिक्षणाधिकारी (प्रा) चे रोहिदास बस्वदे, शिक्षणाधिकारी (मा) प्रतिनिधी के.व्ही.पाठक,नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे शहर अभियंता दिलीप आरसुडे,अभियंता अरुण शिंदे हे उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी देशातील,राज्यातील व जिल्हयातील अपघाताची व अपघातामुळे होणारे परिणामाची माहिती दिली.नांदेड जिल्हयामध्ये यावर्षी हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे अभियान जिल्हयात पूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून यामध्ये विविध उपक्रम व तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी एनएसएस,एनसीसी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विदयार्थ्यानी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या वेळी फकीरा बहुउद्येशिय सेवा भावी संस्थेचे पथकांनी जनजागृतीचा कार्यक्रम केला आहे.या कार्यक्रमाच्या वेळी कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक,सहा.मोटार वाहन निरिक्षक व लिपीक कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालक मोटार वाहन निरिक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केलेले आहे.

14 January 2024

कर्तव्यदक्ष पो.उप.नि.दिगांबर पाटील यांची धर्माबाद येथे बदली

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस विभागातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षक यांच्या करण्यात आल्या प्रशासकीय बदल्या

नांदेड : आगामी लोकसभा -२०२४ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशी नुसार पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदलल्यांचे आदेश पत्र दि.११ जानेवारी रोजी काढले असून यात भोकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील यांची भोकर येथून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धर्माबाद जी.नांदेड येथे बदली करण्यात आल्याचा समावेश आहे.

देशाच्या लोकसभा निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजणार असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महसूल, पोलीस व विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्व विभागांना सुचविले आहे.त्याच सुचनेनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिनियम क्र.२२ च्या कलम २ ची सुधारणा महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम २०१५ मधील सुधारीत तरतुदीनुसार व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिनियम क्र.२२ (एन) (२) (इ) नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करुन नांदेड जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशी नुसार लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील जवळपास २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५२ पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात येत असल्याचे आदेश पत्र दि.११ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केले आहेत. तसेच बदली करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांना पदग्रहण अवधी देय नसल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या नुतन बदलीच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेशित करण्यात आले आहे.
सदरील बदली आदेशात भोकर पोलीस ठाणे येथे सेवारत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पांडूरंग पाटील यांचा समावेश आहे.पो.उप.नि. दिगांबर पाटील यांनी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावली असल्याने त्यांना पोलीस विभागाने सेवापदक देऊन गौरविले आहे.अशा कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील यांची भोकर पोलीस ठाण्यात दि.१ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली.येत्या फेब्रुवारीत भोकर येथील सेवेचे त्यांचे ३ वर्ष पुर्ण होत आहेत.दरम्यानच्या काळात २०२२ अखेर त्यांची अर्धापूर जि.नांदेड येथे बदली करण्यात आली होती. परंतू भोकर तालुका हा तेलंगणा राज्य सीमेवरील महाराष्ट्रातील मोठा तालुका असून येथील कामाची व्याप्ती व गुन्ह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना येथून सोडण्यात आले नाही. कर्तव्यकठोर व न्यायप्रिय व्यक्तीमत्व असलेल्या पो.उप.नि. दिगांबर पाटील यांनी भोकर येथे दरम्यानच्या काळात अनेक गुन्हे उघडकीस आणले आणि अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्यसेवेचा कार्यकाळ येथील अनेकांच्या स्मरणात राहणार आहे.त्यांना पुढील सेवाकार्यासाठी परिवाराच्या वतीने खुप खुप हार्दिक शुभेच्छा!बदली करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची नावे व बदली करण्यात आलेले ठिकाण दर्शविणारे आदेशपत्र पुढील प्रमाणे…

 

बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे व बदली करण्यात आलेले ठिकाण दर्शविणारे आदेशपत्र पुढील प्रमाणे…

भोकर तेथे श्री राम मंदिर जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा, छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य राम कथेसह शोभा यात्रेच आयोजन

भोकर :श्री राम मंदिर जिर्णोध्दार, श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या स्वराज्याभिषेक दिनानिमीत्त भव्य संगीतमय रामकथा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी भोकर शहर व तालुक्यातील सर्व श्री राम भक्त यांनी या यज्ञात प्रत्यक्ष सहभागी होऊन या ऐतिहासिक कार्यकर्माचा साक्षीदार होण्याचे भाग्य प्राप्त करून घ्यावे असे आवाहन समस्त श्री राम भक्त यांनी शनिवारी दि.13 जानेवारी सायंकाळी आयोजित बालाजी मंदिर बैठकीत केले आहे.

सदरील कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे भव्य संगीतमय रामायण कथा यज्ञ सोहळा हा माऊलीधाम, नवा मोंढा भोकर जि. नांदेड येथे दि. १७/०१/२०२४ बुधवार ते दि. २१/०१/२०२४ रविवार कथेची वेळ : दुपारी १२ ते ४ वाजता असणार आहे तर सकाळी ११ ते १२ हनुमान चालीसा व रामरक्षा मंत्र पारायण दिनांक २२/०१/२०२४ रोज सोमवार सकाळी ७.३० वाजता काल्याचे किर्तन होईल तदनंतर 
सकाळी ८.३० पासून भोकर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा ज्यात साधू, संत,महाराज,भजन, बँडपथक, राम नामजप, हनुमान चालिसा,आदिसह निघून ती परत माऊलीधाम नवा मोंढा येथे बरोबर ११.३० ला पोहचेल त्या नंतर ११.३० ते १.३० वाजता अयोध्या येथील श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व श्री राम मंदिर जिर्णोध्दार भव्यदिव्य सोहळा नयनरम्य, डोळ्याचे पारणे फिटणारा, व गेली शेकडो वर्षा पासून याची प्रत्येक हिंदुला आतुरता लागली होती तो अविस्मरणीय, सुवर्णंक्षण सर्वांनां मोठ्या स्क्रिनवर थेट प्रक्षेपण प्रणालीद्वारे पाहणायास मिळणार आहे. महाप्रसादाने या यज्ञ सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी सर्व श्री राम भक्त यांनी या सर्व सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून पावन कार्यात सहभाग नोंदवून पुण्य पदरी पाडून घ्यावे असे विनम्र अहवानआयोजन समिती काडून करण्यात येत आहे.

ही कथा आपणास राष्ट्रीय कथाकार, तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार,रामायणाचार्य श्री ह.भ.प. शिवाजी महाराज वटबे आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य वाणीतून ऐकावयास मिळणार आहे.व संगीत संयोजन मुख्य गायक संतोष देवकर गुरुजी,आळंदी,सह गायक गणेश महाराज सावळे हिंगोली, तबला वादक चक्रधर शिंदे बीड, पॅडवादक सुरज माने, झाकी गणेश महाराज परभणी, कीर्तिशःकुमार वैष्णव, मृदंगाचार्य ह.भ. प. गणेश महाराज काकीलवाड व भजनी मंडळ भोकर.

  आणि दिनांक २२/०१/२०२४ रोज सोमवार सकाळी लवकर आपआपल्या घरासमोर व आपल्या परिसरात सडा, सरावण,रांगोळ्या टाकणे, घरांवर गुढी उभारणे, भगवा ध्वज लावणे, फटाके उडविणे अर्थातच गुढी पाडवा व दिपावली साजरी करणे, सायंकाळी दिपोत्सव साजरा करणे घराघरात दिप लावणे आपल्या परिसरातील मंदिरात दिपोत्सव करणे, ध्वज लावणे, रामनाम जप करणे, किर्तन, प्रवचन, भजनाचे आयोजन करणे, आरती करणे, फटाके, बॅन्ड, वाजवून आनंद उत्सव साजरा करणे व महाप्रसादाचे आयोजन करणे असे आवाहन आयोजक श्री रामभक्त, भोकर विचार विकास मंच व समस्त गांवकरी मंडळी, लोकोत्सव समित भोकर,समस्त हिंदू समाज, भोकर तालुका यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

13 January 2024

भोकर जिल्हासत्र न्यायालयाने एका न्यायालयीन कर्मचाऱ्यास दिली ३ वर्षाची शिक्षा

 भोकर : उमरी तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या पोटगी मंजूरीतील आरोपीस न्यायालयीन वारंटमध्ये अटक न करण्यासाठी व २ महिन्याची मुदत वाढवून देतो म्हणून १ हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या एका बेलीफ पदावर सेवारत असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्याविरुद्ध सदरील गुन्ह्यातील सबळ पुरावे सिद्ध झाल्यावरुन भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे तदर्थ जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच.खरादी यांनी दि.१ नोव्हेंबर रोजी ३ वर्ष शिक्षा व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. उमरी तालुक्यातील एका विवाहित व्यक्तीने त्यांच्या पत्नीस पोटगी द्यावी असा निर्णय मा.भोकर न्यायालयाने दिला होता.सदरील पोटगीस्तवची रक्कम पत्नीस देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता.यामुळे सदरील महिलेने न्यायदाद मागितल्यावरुन त्या व्यक्तीविरुद्ध मा.न्यायालयाने अटक वारंट काढला होता.तो अटक वारंट तामिल करण्यासाठी गेलेले बेलीफ पदावर सेवारत असलेले लोकसेवक तथा न्यायालयीन कर्मचारी एस.एन. भारती(४८) यांनी त्या व्यक्ती विरुद्ध निघालेल्या पोटगी वारंटमध्ये अटक न करण्यासाठी व सदरच्या पोटगी वारंटचा विनातामील अहवाल मा.न्यायालयास पाठविण्यासाठी आणि २ महिन

मॉर्निंग वॉक करणाऱ्या खरबी येथील दोन विद्यार्थ्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

भावांनो... महामार्गावर मॉर्निंग वॉक करतांना काळजी घ्या...!-पो.नि.नानासाहेब उबाळे 

भोकर : मौ.खरबी ता.भोकर येथील दोन शालेय विद्यार्थी मॉर्निंग वॉक साठी भोकर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गेले असता भोसी परिसरात दि.१२ जानेवारी रोजी पहाटे ५:०० वाजताच्या दरम्यान बेसुमार सुसाट वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना उडविले.यात ते चिरडल्या गेल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून आज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भोकर पोलीसात सुरु आहे. कै.मोहनराव देशमुख विद्यालय,भोसी ता.भोकर येथे इयत्ता १० वीत शिक्षण घेत असलेला संकेत दत्ता पाशेमवाड (१७) व कै.लक्ष्मणराव घिसेवाड कनिष्ठ महाविद्यालय,भोकर येथे इयत्ता ११ वीत शिक्षण घेत असलेला वैभव दत्ता येळणे(१८) दोघे ही रा.खरबी ता.भोकर हे दोघे शालेय विद्यार्थी मित्र दि.१२ जानेवारी २०२४ रोजी पहाटे मॉर्निंग वॉक,रिंग व व्यायाम करण्याची भोकर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गेले होते. पहाटे ५:०० वाजताच्या दरम्यान भोसी शिवार परिसरातील गु-हाळाजवळ याच महामार्गावर भोकरकडून नांदेडकडे बेसु

कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीमेस प्रारंभ…!


टिटवाळा : रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी रजि.अध्यक्ष सुनील उतेकर आणि कोंकण रहिवाशी मंडळ टिटवाळा रजि.संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत परब,उपाध्यक्ष शंकर पेडूरकर,सचिव निलेश राणे,खजिनदार,गुणाजी गावडे, कार्याध्यक्ष प्रवीण टोले, सचिन परब, प्रकाश चौगुले,सौ.सिमा पिपुटकर,सौ. प्रेमलता तावडे सल्लागार संतोष राणे आणि सहकारी यांनी कोंकणात प्रवाशांसाठी कल्याण सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी टिटवाळा येथे सह्यांची मोहीम सुरू केली.

कोंकणातील चाकरमानी नौकरदारांना कोंकणात जाण्यासाठी नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो.यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत,आपल्या मुला बाळांसह सणवार, होळी,गणपती तसेच इतर उत्सवादरम्यान रेल्वेने जाणे येणे गर्दीमुळे धोक्याचे झाले आहे.यासाठी कल्याण आणि परिसरात लाखो कोंकणकर राहतात यासाठी कल्याण ते सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी यासाठी संघटना अध्यक्ष सुनील उतेकर आणि सहकारी गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.
यास अनुसरून कोंकण रेल्वे प्रवाशांच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष द्यावे व रेल्वे सुरू व्हावी यासाठी अनेल रेल्वे स्टेशन परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचा प्रारंभ टिटवाळा रेल्वे स्टेशन येथून करण्यात आला आहे.मांडा टिटवाळा रिक्षा युनियन अध्यक्ष बाळा भोईर यांच्या हस्ते या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था अध्यक्ष सुनील उतेकर,यशवंत परब अध्यक्ष, संपादक संभाजी मोरे,राजेंद्र गावडे,गोपिचंद घाटये,दिलीप गायकवाड,योगेश चांदोरकर,सौ.करूणा परब,सुपर्णा गावडे, सुनीता खोकले,स्नेहा मिटबावकर यांसह शेकडो कोंकणकर यावेळी उपस्थित होते.यावेळी कोंकणात नवीन आणि हक्काची कल्याण-सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी यासाठी हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तसेच संस्थेने नवीन पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती दिली व नियुक्तीपत्र,शॉल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

तहसिलदार राजेश लांडगे यांच्यावर भोकर येथील ३ कार्यालयांची आहे जबाबदारी

तर आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केली आहे तीन कार्यालयांचा पदभार असलेल्या या अधिकाऱ्यांच्या बदलीची तयारी...?

भोकर : जवळपास दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयास कायमस्वरूपी पदभारी उपविभागीय अधिकारी मिळाल्याचा आनंद येथील नागरिकांनी झाला होता.परंतू उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांनी अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीतच त्या खुर्चीचा पदभार सोडून मुंबई मंत्रालय गाठल्याने भोकर चे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे तो प्रभारी पदभार सोपविला गेला असून उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय व नगर परिषद या तीन कार्यालयांचा पदभार असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश लांडगे यांची ही आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बदलीची तयारी केली असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत असल्याने पुन्हा एकदा या तीन ही कार्यालयांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविला जाणार का कायमस्वरूपी अधिकाऱ्यांकडे ? अशी चर्चा कार्यालय परिसरात होत असून नागरिकांची संभाव्य गैरसोय टाळली जावी म्हणून उपरोक्त तीन ही कार्यालयांना कायमस्वरुपी अधिकारी मिळावा अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयीन कार्यालय मुंबई येथे अवर सचिव म्हणून बदली झाल्यापासून जवळपास दीड वर्ष भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा पदभार भोकर व मुदखेड चे तहसिलदार आणि प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्याकडे आलटून पालटून होता.दरम्यानच्या काळात आक्टोंबर २०२३ मध्ये पदोन्नत तहसिलदार सचिन यादव यांची भोकर चे उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती झाली होती.त्यांच्या रुपाने कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालयास मिळाल्याचा आनंद येथील नागरिकांना झाला.परंतू त्यांचे भोकर येथे मन रमत नसल्याने राज्यकर्ते व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बदलीसाठी त्यांनी फिल्डींग लावली आणि येथील पदभार तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे सोपवून थेट मुंबई मंत्रालय गाठले आहे.

भोकर तहसिल चे विद्यमान तहसिलदार राजेश लांडगे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर चा प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्विकारला असून सद्या ते भोकर नगर परिषदेचे देखील प्रशासक व प्रभारी मुख्याधिकारी आहेत.त्यांच्या कार्यालयीन कामाची हातोटी लक्षात घेऊन वरिष्ठ आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर उपरोक्त तीन जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.ओढाताण व तारेवरची कसरत करत ते उपरोक्त जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.सप्टेंबर २०२१ मध्ये भोकर तहसिल कार्यालयाचा पदभार स्वीकारलेल्या तहसिलदार राजेश लांडगे यांचा सव्वा दोन वर्षाचा येथील प्रशासकीय कार्यकाळ होत असल्याने ते बदलीस पात्र आहेत.दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक उल्लेखनीय प्रशासकीय व विकासात्मक कामे केली आहेत.अशातच राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पुर्ण झाला आहे व जे अधिकारी स्वजिल्ह्यातील आहेत अशांच्या बदलीचे प्रस्ताव तयार करावेत अशा सुचना दिल्यानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकींची प्रशासकीय तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली असून नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तयार केला आहे. तसेच सदरील अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे,यानुसार नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यापैकी ९ तालुक्यातील तहसिलदारांच्या बदल्या होणार असून यामध्ये ७ तहसिलदार व २ उपविभागीय अधिकारीऱ्यांचा समावेश आहे.तर २ तहसिलदारांच्या जागा रिक्त असून एका उपविभागीय अधिकाऱ्याची जागादेखील रिक्त आहे,एकूणच ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील कंधारचे तहसिलदार राम बोरगावकर,हिमायतनगरचे डी.एम.गायकवाड, धर्माबादचे आर.एन.हांदेश्वर,अर्धापूरच्या उज्वला पांगारकर,भोकर चे राजेश लांडगे,किनवटचे डॉ.मृणाल जाधव,उमरीचे हरीश गाडे,तर मुदखेड व लोहा येथील पदभार रिक्त आहे.

दरम्यान आगामी निवडणूक प्रक्रिया चालू होण्यापूर्वी महसूल विभागातील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाने मागवली असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांच्या बदल्या होणे अनिवार्य असून त्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याची तयारी प्रशासन करत आहे.जर त्यांच्या बदल्या झाल्या व अन्य जिल्ह्यातून पदसिद्ध सक्षम अधिकारी येथे आले नाहीत तर त्या जागांवर नायब तहसिलदारांची प्रभारीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तसेच कायमस्वरूपी सक्षम अधिकारी नियुक्त न झाल्यास भोकर तालुक्यातील उपरोक्त तीन ही कार्यालयाचा कारभार 'अलबेल' होण्याची शक्यता आहे.म्हणून भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय,भोकर तहसिल कार्यालय व भोकर नगर परिषद कार्यालय या तीन्ही महत्त्वपूर्ण कार्यालयांना कायमस्वरुपी सक्षम अधिकारी मिळावेत आणि येथील नागरिकांची होणारी संभाव्य गैरसोय टाळली जावी अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त होत आहे.

11 January 2024

भोकर येथील पत्रकार भवनासाठी जागा व ५० लक्ष रूपये निधी द्यावा-इंजि.विश्वंभर पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार व अन्य सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली उपरोक्त मागणी

नांदेड : भोकर येथे पत्रकार भवन व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून पत्रकार बांधवांकडून केली जात आहे.त्याच अनुषंगाने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि. विश्वंभर पवार यांच्याकडे उपरोक्त मागणी केली असून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदस्यांनी दि.८ जानेवारी रोजी ती मागणी मान्यतेसाठी पालकमंत्री तथा नियोजन समिती अध्यक्ष गिरीष महाजन व जिल्हाधिकारी तथा नियोजन समिती सचिव अभिजित राऊत यांच्याकडे प्रस्तावित केली आहे.
भोकर शहर व तालुका हे तेलंगणा राज्य सिमेवरील महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मोठा तालुका असून या तालुक्यास भौगोलिक, ऐतिहासिक,राजकीय व आदी प्रकारे मोठी उज्वल पार्श्वभूमी आहे.त्यामुळे येथील शहरी व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक,दृष्ट्या मागासलेल्या व शोषित,पिढीत,वंचीत,शेतकरी, कष्टकरी,व्यापारी यांसह आदी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासन प्रशासनातील विविध योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने निस्वार्थ कर्तव्य सेवा बजावतात.हे करत असतांना ते सर्वजण कुठलेही वेतन अथवा मानधन न घेता निशुल्क सेवा कर्तव्य बजावतात.

हे कर्तव्य बजावतांना पत्रकारांना पत्रकार परिषद किंवा अन्य कार्यक्रम घ्यायचा असेल तर येथील मंगल कार्यालये,सभागृह भाड्याने घ्यावे लागतात.निशुल्क निस्वार्थ सेवा कर्तव्य करणाऱ्या पत्रकारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असतांनाच ती महागडी मंगल कार्यालये व सभागृह भाड्याने घेणे ही न परवडणारी आणि अशक्य बाब आहे.त्यामुळे येथील पत्रकार बांधव व विविध पत्रकार संघटनांनी आमदार,खासदार,नामदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पत्रकार भवन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.परंतू अद्याप तरी या मागणीस यश आलेले नाही.

याच अनुषंगाने दर्पण दिन-मराठी पत्रकार दिनी दि.६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार व त्यांचे सहकारी पदाधिकारी,जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्याकडे उपरोक्त पत्रकार भवनासाठी जागा आणि भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवांनी केली.तसेच राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांच्या पुढाकारातून भोकर तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,तालुका उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, तालुका सचिव आर.के.कदम, विठ्ठल सुरलेकर,विशाल जाधव,गजानन गाडेकर,अंबादास बोयावार व आदींच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदन त्यांना दिले.यावेळी इंजि.विश्वंभर पवार यांनी सदरील मागणी राज्याचे ग्रामविकास,पंचायतीराज मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व नांदेड जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष गिरीष महाजन आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव अभिजित राऊत यांच्याकडे करेन व पाठपुरावा देखील करेन असे आश्वासन दिले.

नव्हे तर दि.८ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झालेल्या नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तामसा येथील वीर नेताजी पालकर यांचे भव्य स्मारक, पिंपळगाव ता.हदगाव येथील श्री दत्त मंदिर येथील रस्ता व भोकर येथील पत्रकार भवनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. भोकर येथील पत्रकार भवनासाठी मोठी जागा व बांधकामासाठी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.या मागणीचा होणाऱ्या विकास आराखड्यात नक्कीच विचार केला जाईल असे जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष पालकमंत्री गिरीष महाजन यांनी म्हटले असून नियोजन समिती सदस्य इंजि.विश्वंभर पवार,श्रीमती अरुणा विनायकराव कदम देशमुख, खान इसाखान सरदारखान,माधवराव दिगंबरराव धर्माधिकारी,रामचंद्र नागनाथ पाटील बन्नाळीकर,राजश्री मनोहर भोसीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव अभिजित राऊत यांची भेट घेऊन उपरोक्त मागण्यांचे निवेदन त्यांना दिले आहे.यावेळी त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.तर या मागणीस यश यावे व हे पत्रकार भवन लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी अपेक्षा सर्व पत्रकार बांधवांनी व्यक्त केली आहे.

09 January 2024

दर्पण दिनानिमित्त भोकर येथे बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

भोकर - दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघा शाखा भोकर च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार,पंचायत समिती भोकरचे माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,लोकनेते नागनाथराव घिसेवाड , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे,भाजपा ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष गणपतराव पिट्टेवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष आलेवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख,वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राव, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, सा.पोलिस निरीक्षक रसुल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटिल य आदीं मान्यवरांसह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या उज्वल पत्रकारतेची परंपरा व आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्भीड लेखनातून समाजाला जागे करण्याचे काम करावे असे सांगितले. यानंतर या कार्यक्रमात तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार समाजसेवेचे निस्वार्थ भावनेतून काम करतात त्यामुळे भोकर शहरात पत्रकारांना त्यांच्या सामूहिक कार्यक्रमासाठी अद्यावत असे पत्रकार भवन असणे आवश्यक आहे अशी भावना
 व्यक्त केली. तसेच यासाठी सर्वांनीच सर्वोतपरी सहकार्य व आर्थिक मदत करु अशी ग्वाही दिली.
  अध्यक्षीय समारोपात बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले की,शहरात पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करु. शासकीय जागेसाठी नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांची गरज असते.तेव्हा निवडणुकिनंतर पहिला निर्णय सर्वांच्या सहकार्याने पत्रकार भवन निर्माण करण्याचा घेवू असे सांगितले. 
या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संघाचे सचिव पत्रकार आ.के.कदम तर आभार पत्रकार राजेश चंद्रे यांनी मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विजय चिंतावार, शुधांशू कांबळे,कमलाकर बरकमकर, गंगाधर पडवळे,विठ्ठल सुर्लेकर, बालाजी कदम,शुभम नर्तावार,विशाल जाधव,विनय दुर्केवार यांनी परिश्रम घेतले .

आनंदनगरी मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळाले स्वावलंबनाचे धडे- ६४ स्टाॅल मधून केली १० हजाराची विक्री


भोकर प्रतिनिधी:- विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारी ज्ञान वाढावे,स्वतः परिश्रम करून विविध पदार्थ तयार करून ते विकून चार पैसे कमवावेत व त्यांना पुढील जीवनात स्वावलंबी बनण्याचे धडे मिळावेत या उद्देशाने जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा हाळदा येथे विद्यार्थ्यांसाठी आनंदनगरी मेळाव्याचे दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११वाजता आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास उद्घाटक म्हणून गावचे माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन दत्तराव अक्कलवाड,ग्रामपंचायत सदस्या सौ.मायाताई विलासराव किसवे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रूक्माजी नार्लेवाड,सदस्य दत्ता मुडसे,संतोष बोईनवाड,शिवाजी नार्लेवाड, माधव आक्कलवाड,दत्ता पेरेवार,विष्णू बुटेवाड,व्यंकट बोईनवाड आदींची उपस्थिती होती. 
   मेळाव्याच्या सुरुवातीस शाळेतील स्काऊट व गाईडच्या पथकांनी मान्यवरांना मानवंदना दिली त्यानंतर सर्व उपस्थितांचे शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ ईबितवार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे तब्बल ६४ स्टॉल लावले होते. यात प्रामुख्याने गुलाब जामुन,बर्फी,पेढा, वडापाव,समोसे,शेंगदाणा चिक्की,तिळाची चिक्की,चकल्या,चिवडा,भजे आदी खमंग पदार्थाचा समावेश होता.यावर गावातील उपस्थितांनी व विशेषतः महिला मंडळींनी तसेच शिक्षक व शिक्षिका यांनी पण चांगलाच ताव मारला व विद्यार्थ्यांचे तोंडभर कौतुक केले.या मेळाव्यात विद्यार्थ्यांचा १० हजाराच्या वर विक्री व्यवसाय झाला. हा आनंद नगरी मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सहशिक्षक विजयकुमार न्यालमवार,राजकुमार व्यवहारे तसेच सहशिक्षिका श्रीमती सरस्वती मंडलापुरे, श्रीमती निर्मला मिटकरी,श्रीमती हंबर्डे मीनाक्षी, श्रीमती सुजाता तीगोटे,श्रीमती समुदंरा सावंत आदीसह सेवक आयतोड यांनी मोलाचे योगदान दिले.

08 January 2024

दर्पण दिनाच्या औचित्यांने भोकर येथे पत्रकार भवन उभारण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

भोकर प्रतिनिधी:- दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाच्या औचित्यांने आयोजित कार्यक्रमात पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवन निर्माण करण्याचा मनोदय उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार,पंचायत समिती भोकरचे माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,लोकनेते नागनाथराव घिस्सेवाड, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे,भाजपा ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष गणपतराव पिटेवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष आलेवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख,वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राव, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, सा.पोलिस निरीक्षक रसुल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटिल या सह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची उज्वल पत्रकारतेची परंपरा व आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व पत्रकारांनी समाजाभिमुख राहून निर्भीड लिखाणाच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे काम करावे असे सांगितले. यानंतर या कार्यक्रमात तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भोकर शहरात पत्रकारांना हक्काची जागा राहण्यासाठी अद्यावत पत्रकार भवन निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त करून यासाठी लागले ते सहकार्य व आर्थिक मदत देण्याचा संकल्प जाहीर केला.
  अध्यक्षीय समारोपात बोलताना तहसीलदार राजेश लांडगे यांनी सांगितले की भोकर येथे पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करु. शासनाची जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांची गरज असते.तेव्हा निवडणुका झाल्या झाल्या पहिला निर्णय सर्वांच्या सहकार्याने पत्रकार भवन निर्माण करण्याचा घेवू असे सांगितले. 
या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संघाचे सचिव पत्रकार आ.के.कदम तर आभार पत्रकार राजेश चंद्रे यांनी मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विजय चिंतावार, शुधांसु कांबळे,कमलाकर बरकमकर, गंगाधर पडवळे,विठ्ठल सुर्लेकर, बालाजी कदम,शुभम नर्तावार,विशाल जाधव,विनय दुर्केवार यांनी मोलाचे योगदान दिले.

04 January 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख यांनी केले होते नियोजन

भोकर (प्रतिनीधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नवनिर्वाचित जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य इंजिनियर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस आज दिनांक 3 जानेवारी रोजी भोकर येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आतिशबाजी व ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इंजिनीयर विश्वंभर पवार हे स्वच्छ मनाने सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडत सुख-दुखात धाऊन जाणारे नेते म्हणून ओळख असलेलं उदयोन्मुख नेतृत्व. राजकीय वाटचाल करताना केवळ औपचारिकता म्हणून काही सोपस्कार करून त्याचे अगणित श्रेय लाटण्याची प्रथा अलीकडे वाढत चालली आहे. परंतु अशा काळातही पवार यांनी समाजातील अनेक वर्गांशी विश्वासार्ह नाते निर्माण केले असल्याने अल्पावधीतच येथे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यांचा समाजातील वाढलेला संपर्क पाहता आज त्यांच्यावर प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे…
इजि.पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोकर शहरातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व थंडीचे दिवस असल्यामुळे गरजूंना कंबलचे वाटप केले. शहरातील विविध भागात कार्यक्रम घेउन इंजिनीयर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक बडे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, साहित्यिक,व्यापारी व मित्रपरिवार तसेच नागरिकांनी दिवसभर वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या..
यादरम्यान राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनेही इंजिनीयर विश्वंभर पवार यांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महासचिव उत्तम बाबळे, तालुका अध्यक्ष बालाजी नारलेवाड, सुधांशू कांबळे यांनी मनोगतातून भावी राजकीय यशासाठी व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार विजय चिंतावर, आर के कदम,गंगाधर पडोळे, विठ्ठल सुरलेकर, बालाजी कदम, विशाल जाधव यांची उपस्थिती होती…