भोकर:-मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील एका चिमुकलीचे दि.१४ जानेवारी रोजी (रविवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास पळवून नेऊन हत्या करण्यात आली असल्याची घटना सामोर येताच महाराष्ट्रभर याचे तीव्र पडसाद उमटत असून या ब्लाइंड घटनेचे नेमके गूढ स्पष्ट व्हावे, आरोपीचा शोध तात्काळ लागावा यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडून वेगवेगळे दहा पथके नेमण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांनी मुदखेड येथे पत्रकारांना दिली आहे.
मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील इयत्ता पहिलीत शिकणारी ०६ वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार मुदखेड पोलिसांत दि.१४ जानेवारी रविवारी दाखल करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा लागलीच कामाला लागली मात्र शेवटी सोमवारी सकाळी उमरी रोडवर एका झुडपात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे .या चिमुकलीचा खून का व कशासाठी आणि कोणी केला असेल? हे सर्व प्रश्न ब्लाइंड असल्यामुळे या प्रकरणाचे सस्पेन्स पहातापोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वेगवेगळे दहा पथके नेमून कामाला लावले आसल्याची माहिती देऊन याप्रकरणी नागरिकांनी तपासात पोलीसांना मदत करावे असेही आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे
……………………………………
दिनांक 15 तारखेस सकाळी उमरी रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालया जवळ त्या बालिकेचा मृतदेह सापडला असून याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. सायबर , डॉग पथक एललसीबी , लोकल पोलिस, आणि सीनियर ऑफिसर ऍडिशनल एसपी यांचा यात समावेश आहे. हत्यची ही केस “ब्लाइंड ” आहे रोहीपिंपळगाव हे खूप दुर्गम गाव आसल्याने गावामध्ये सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल मदत मिळत नाही पण सर्व टीम योग्य ग्राउंडवर फिरत असुन आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.
अविनाश कुमार,अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड







0 comments:
Post a Comment