जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

08 January 2024

दर्पण दिनाच्या औचित्यांने भोकर येथे पत्रकार भवन उभारण्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

भोकर प्रतिनिधी:- दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाच्या औचित्यांने आयोजित कार्यक्रमात पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवन निर्माण करण्याचा मनोदय उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार,पंचायत समिती भोकरचे माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,लोकनेते नागनाथराव घिस्सेवाड, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे,भाजपा ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष गणपतराव पिटेवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष आलेवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख,वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राव, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, सा.पोलिस निरीक्षक रसुल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटिल या सह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची उज्वल पत्रकारतेची परंपरा व आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व पत्रकारांनी समाजाभिमुख राहून निर्भीड लिखाणाच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे काम करावे असे सांगितले. यानंतर या कार्यक्रमात तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भोकर शहरात पत्रकारांना हक्काची जागा राहण्यासाठी अद्यावत पत्रकार भवन निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त करून यासाठी लागले ते सहकार्य व आर्थिक मदत देण्याचा संकल्प जाहीर केला.
  अध्यक्षीय समारोपात बोलताना तहसीलदार राजेश लांडगे यांनी सांगितले की भोकर येथे पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करु. शासनाची जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांची गरज असते.तेव्हा निवडणुका झाल्या झाल्या पहिला निर्णय सर्वांच्या सहकार्याने पत्रकार भवन निर्माण करण्याचा घेवू असे सांगितले. 
या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संघाचे सचिव पत्रकार आ.के.कदम तर आभार पत्रकार राजेश चंद्रे यांनी मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विजय चिंतावार, शुधांसु कांबळे,कमलाकर बरकमकर, गंगाधर पडवळे,विठ्ठल सुर्लेकर, बालाजी कदम,शुभम नर्तावार,विशाल जाधव,विनय दुर्केवार यांनी मोलाचे योगदान दिले.

0 comments:

Post a Comment