जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 January 2024

दर्पण दिनानिमित्त भोकर येथे बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

भोकर - दिनांक ६ जानेवारी रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकरच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघा शाखा भोकर च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि.विश्वंभर पवार,पंचायत समिती भोकरचे माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,लोकनेते नागनाथराव घिसेवाड , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवानराव दंडवे,भाजपा ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष गणपतराव पिट्टेवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष आलेवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख,वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप राव, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, सा.पोलिस निरीक्षक रसुल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटिल य आदीं मान्यवरांसह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या उज्वल पत्रकारतेची परंपरा व आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्भीड लेखनातून समाजाला जागे करण्याचे काम करावे असे सांगितले. यानंतर या कार्यक्रमात तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार समाजसेवेचे निस्वार्थ भावनेतून काम करतात त्यामुळे भोकर शहरात पत्रकारांना त्यांच्या सामूहिक कार्यक्रमासाठी अद्यावत असे पत्रकार भवन असणे आवश्यक आहे अशी भावना
 व्यक्त केली. तसेच यासाठी सर्वांनीच सर्वोतपरी सहकार्य व आर्थिक मदत करु अशी ग्वाही दिली.
  अध्यक्षीय समारोपात बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले की,शहरात पत्रकार भवन उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करु. शासकीय जागेसाठी नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांची गरज असते.तेव्हा निवडणुकिनंतर पहिला निर्णय सर्वांच्या सहकार्याने पत्रकार भवन निर्माण करण्याचा घेवू असे सांगितले. 
या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन संघाचे सचिव पत्रकार आ.के.कदम तर आभार पत्रकार राजेश चंद्रे यांनी मानले. 
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे विजय चिंतावार, शुधांशू कांबळे,कमलाकर बरकमकर, गंगाधर पडवळे,विठ्ठल सुर्लेकर, बालाजी कदम,शुभम नर्तावार,विशाल जाधव,विनय दुर्केवार यांनी परिश्रम घेतले .

0 comments:

Post a Comment