भोकर प्रतिनीधी - मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील इयत्ता पहिलीतील एक चिमुकली दि.१४ जानेवारी रोजी (रविवारी) दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावातून बेपत्ता झाली होती. याबाबतची तक्रार मुदखेड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी सदर चिमुकली हरवल्याची नोंद करण्यात आलेली आहे.
रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकलीचा गळा दाबून खून झाला आहे.पोलिसांचे तपासचक्र अजूनहि सुरूच होते.मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता झाल्याची तक्रार मुदखेड पोलिसांत रविवारी दाखल झाल्यानंतरच पोलीस यंत्रणा कामाला लागली शेवटी सोमवारी तिचा मृतदेह शहराजवळ उमरीरोडवर एका झुडपात सकाळी आढळला. सदर चिमुकलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपी अज्ञात आहेत.तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात यावेत.दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१५ जानेवारी
(सोमवारी) रोजी सदर चिमुकलीचा मृतदेह उमरी रोडवर एका झुडपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर एकच खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील चौकशी मोहीम हाती घेतली असून आरोपीस तात्काळ अटक करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी घटनेचे योग्य तो तपास व्हावा.सदरील घटनेचा मनसेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आह्रे. मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर या सदरील प्रकरणी सी.बी.आय चौकशी करण्याचे आदेश द्यावे आणि अज्ञात आरोपीस अटक करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी भोकर मार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी साईप्रसाद जटालवार(ता.अध्यक्ष, भोकर),माधव मेकेवाड(शहराध्यक्ष, भोकर),गंगाधर वैद्य(शहर उपाध्यक्ष),अशोक निळकंठे(ता.उपाध्यक्ष, भोकर),राम गिनलवाड(ता.अध्यक्ष वाहतूक सेना),राहुल बुद्धेवाड(ता.उपाध्यक्ष, भोकर),विशाल जाधव(मनसे सैनिक),प्रवीण शेवाळे(मनसे सैनिक),दुर्गेश्वर तुंबलवाड,उमेश जिलेवाड सह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment