भोकर (प्रतिनीधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नवनिर्वाचित जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्य इंजिनियर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस आज दिनांक 3 जानेवारी रोजी भोकर येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आतिशबाजी व ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इंजिनीयर विश्वंभर पवार हे स्वच्छ मनाने सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडत सुख-दुखात धाऊन जाणारे नेते म्हणून ओळख असलेलं उदयोन्मुख नेतृत्व. राजकीय वाटचाल करताना केवळ औपचारिकता म्हणून काही सोपस्कार करून त्याचे अगणित श्रेय लाटण्याची प्रथा अलीकडे वाढत चालली आहे. परंतु अशा काळातही पवार यांनी समाजातील अनेक वर्गांशी विश्वासार्ह नाते निर्माण केले असल्याने अल्पावधीतच येथे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यांचा समाजातील वाढलेला संपर्क पाहता आज त्यांच्यावर प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे…
इजि.पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोकर शहरातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व थंडीचे दिवस असल्यामुळे गरजूंना कंबलचे वाटप केले. शहरातील विविध भागात कार्यक्रम घेउन इंजिनीयर विश्वंभर पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक बडे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, साहित्यिक,व्यापारी व मित्रपरिवार तसेच नागरिकांनी दिवसभर वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या..
यादरम्यान राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनेही इंजिनीयर विश्वंभर पवार यांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महासचिव उत्तम बाबळे, तालुका अध्यक्ष बालाजी नारलेवाड, सुधांशू कांबळे यांनी मनोगतातून भावी राजकीय यशासाठी व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार विजय चिंतावर, आर के कदम,गंगाधर पडोळे, विठ्ठल सुरलेकर, बालाजी कदम, विशाल जाधव यांची उपस्थिती होती…







0 comments:
Post a Comment