भोकर प्रतिनिधी:- विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारी ज्ञान वाढावे,स्वतः परिश्रम करून विविध पदार्थ तयार करून ते विकून चार पैसे कमवावेत व त्यांना पुढील जीवनात स्वावलंबी बनण्याचे धडे मिळावेत या उद्देशाने जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा हाळदा येथे विद्यार्थ्यांसाठी आनंदनगरी मेळाव्याचे दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११वाजता आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास उद्घाटक म्हणून गावचे माजी सरपंच तथा पत्रकार बालाजी नार्लेवाड यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन दत्तराव अक्कलवाड,ग्रामपंचायत सदस्या सौ.मायाताई विलासराव किसवे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रूक्माजी नार्लेवाड,सदस्य दत्ता मुडसे,संतोष बोईनवाड,शिवाजी नार्लेवाड, माधव आक्कलवाड,दत्ता पेरेवार,विष्णू बुटेवाड,व्यंकट बोईनवाड आदींची उपस्थिती होती.
मेळाव्याच्या सुरुवातीस शाळेतील स्काऊट व गाईडच्या पथकांनी मान्यवरांना मानवंदना दिली त्यानंतर सर्व उपस्थितांचे शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ ईबितवार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे तब्बल ६४ स्टॉल लावले होते. यात प्रामुख्याने गुलाब जामुन,बर्फी,पेढा, वडापाव,समोसे,शेंगदाणा चिक्की,तिळाची चिक्की,चकल्या,चिवडा,भजे आदी खमंग पदार्थाचा समावेश होता.यावर गावातील उपस्थितांनी व विशेषतः महिला मंडळींनी तसेच शिक्षक व शिक्षिका यांनी पण चांगलाच ताव मारला व विद्यार्थ्यांचे तोंडभर कौतुक केले.या मेळाव्यात विद्यार्थ्यांचा १० हजाराच्या वर विक्री व्यवसाय झाला. हा आनंद नगरी मेळावा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सहशिक्षक विजयकुमार न्यालमवार,राजकुमार व्यवहारे तसेच सहशिक्षिका श्रीमती सरस्वती मंडलापुरे, श्रीमती निर्मला मिटकरी,श्रीमती हंबर्डे मीनाक्षी, श्रीमती सुजाता तीगोटे,श्रीमती समुदंरा सावंत आदीसह सेवक आयतोड यांनी मोलाचे योगदान दिले.







0 comments:
Post a Comment