मुंबई ( चंद्रकांत कांबळे) नमिता एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित सिध्दार्थ महाविद्यालय, बौराडपाडा, बदलापुर,मुंबई येथे २६ जाने गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रमूख विश्वस्त नागेश संभाजी जाधव, संचिव मीना नागेश जाधव, तसेच व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .
सकाळी ८.४५ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळा व महाविद्यालयात नृत्य स्पर्धा,भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामधील विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी मांचावरील प्रमुख पाहूणे व विद्यार्थ्यांकडून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडले.महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संविधानाचे महत्त्व विषद करताना देशासाठी संविधान किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. प्राध्यापक संदीप कर्णेकर यांनी संविधान काल, आज आणि उद्या या विषयावर सखोल मार्गदर्शनपर केले. दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठाण, किनी, ता. भोकर, जि. नांदेड च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले शाळेमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस देउन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कला शिक्षक चंद्रकांत कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक नवनाथ केदार यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. तसेच विलास कड़ाळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष संगेवार यानी उपस्थितांचे आभार मानले.







0 comments:
Post a Comment