जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 January 2024

राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार.

भोकर : राजधानी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या राष्ट्रीय तेंग -सु-डो कोरियन कराटे स्पर्धेत सुवर्ण, कास्य व ब्राँझ पदकांचे मानकरी ठरलेल्या खेळाडू व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षकाचा हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकाळा व ग्रामस्थांच्या वतीने सोमवार (दि.१५) रोजी सत्कार करण्यात आला.
दिनांक ०३ ते ६ जानेवारी २०२४ दरम्यान दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय तेंग- सु-डो (कोरियन ) कराटे नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत चिकाळा येथील स्फूर्ती देविदास राव पवळे हिच्यासह सलोनी विनोद सुरदसे हिने फाईट प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच धनश्री भगवान हाके व समीक्षा किरण बोईनवाड यांना सिल्वर तर अंजली संतोष सावते हिने ब्रॉन्झ पदक पटकावले आहे.
हे सर्व खेळाडू सध्या भोकर येथील विवीध शाळा, महाविद्यालयात शिकत असून त्यांना प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चिकाळा येथील जि. प. प्राथमिक शाळेत या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास बाबुराव चोंडे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधांशू कांबळे उपस्थित होते.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी खेळाडूंचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींसह क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर, स. शि. बालाजी गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पोलीस पाटील दत्ता चंदनवार,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव कदम, डॉ.देविदास पवळे, पत्रकार शिवाजी सूर्यवंशी, धोंडीबा माने, शिवाजी भोसले, संगीता पवळे, अंगणवाडी सेविका सुनिता माने , स शी सूर्यवंशी, पंचलिंग मॅडम माधव बोडके आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मुख्याध्यापक जे डी वाघमारे यांनी केले.

0 comments:

Post a Comment