जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

31 December 2019

मंत्री श्री अशोक चव्हाण यांच परीचय

नाव : श्री. अशोक शंकरराव चव्हाण
Ø जन्म : 28 ऑक्टोबर 1958
Ø जन्म ठिकाण  : मुंबई.
Ø शिक्षण          : बी. एस्सी., एम. बी. ए.
Ø ज्ञात भाषा      : मराठी, हिंदी व इंग्रजी.
Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती अमिता
Ø अपत्ये          : एकूण 2 (दोन मुली)
Ø व्यवसाय       : शेती व उद्योग
Ø पक्ष               : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)
Ø मतदारसंघ     : 85-भोकर, जिल्हा-नांदेड.

Ø इतर माहिती   : 1986 - 1992 या काळात सरचिटणीस आणि उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी; 1995 ते 1999 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी; 1987-89 सदस्य, लोकसभा, 1992-98 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद, 1999-2004, 2004-2009 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, ऑक्टोबर 2009 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; मार्च 1993 ते सप्टेंबर 1994 राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास आणि संसदीय कार्य; सप्टेंबर 1994 ते मार्च 1995 राज्यमंत्री, गृह व संसदीय कार्य; ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 मंत्री, महसूल, राजशिष्टाचार; जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004 मंत्री, परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार; नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 मंत्री, उद्योग, खनिकर्म, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार; 8 डिसेंबर 2008 ते 26 ऑक्टोबर 2009 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री; 7 नोव्हेंबर 2009 रोजी मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा शपथ. ऑक्टोबर, 2019 मध्ये विधानसभेवर निवड. 1985 अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, नांदेड शहर; 1987 - 1989 सदस्य, कन्सल्टेटिव्ह कमिटी - केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, विभागीय रेल्वे युजर्स समिती, हैद्राबाद, आणि दक्षिण मध्य रेल्वे; 1991-92 सदस्य, सल्लागार पॅनल, केंद्रीय चित्रपट परिरक्षण, मुख्य प्रवर्तक, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव, जि. नांदेड, या कारखान्यास सलग तीन वेळा केंद्र शासनाचे प्रथम पारितोषिक, त्याचप्रमाणे स्पेनमधील माद्रीतच्या बिझनेस इनिशिएटिव्ह डायरेक्शनचे आंतरराष्ट्रीय दर्जासाठी क्राऊन अॅवॉर्ड; अध्यक्ष, शारदा भवन शिक्षण संस्था, नांदेड; अध्यक्ष, साई सेवाभावी ट्रस्ट, नांदेड. मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय; कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी 5,232 कोटी रुपयांचे पॅकेज; उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी 6,509 कोटी रुपयांचे पॅकेजः विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज, केंद्र शासनाच्या कर्ज माफी योजनेचा लाभ न मिळालेल्या व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 6,208कोटी रुपयांचे पॅकेज घोषित, याचा फायदा 40 लाख शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना महागाई पासून दिलासा देण्यासाठी एपीएल व बीपीएल लाभार्थ्यांसाठी स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, तूरडाळ, साखर, पामतेल या पाच वस्तू उपलब्ध; पुढील 3 वर्षात दारिद्रय रेषेखालील 10 लाख नागरिकांना 269 चौरस फुटांची व 70 हजार रुपये किंमत असलेली सदनिका देण्याची योजना; मराठी भाषेसाठी स्वतंत्र प्रशासकीय विभागाची निर्मिती, राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज; झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार झोपडपट्टीधारकांना मोफत मिळणाऱ्या सदनिकेच्या क्षेत्रात 225 चौ. फुटांवरून 269 चौ. फुटांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय, मुंबई व ठाणे येथील म्हाडाच्या जमिनीवर सध्याच्या चटईक्षेत्र निर्देशांकात 1.2 वरून 2.5 इतकी वाढ केली आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील; पंतप्रधानांनी घोषित केलेल्या अल्प संख्यांकांच्या 15 कलमी कार्यक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी; 2009-10 च्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी 210 कोटी रुपयांची तरतूद, दर्जेदार आरोग्यसेवेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 2009-10 या आर्थिक वर्षासाठी 2, 697 कोटी रुपयांची भरीव तरतूद; राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धतीवर राज्य सुरक्षा दल म्हणजेच फोर्स वनची स्थापना, त्यासाठी तातडीने 127 कोटी रुपये उपलब्ध करून दिले; सुरक्षा परिषदेची स्थापना, पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे उपलब्ध करून दिली; राष्ट्रीय सुरक्षा दलाचे केंद्र मुंबईत सुरू; पुण्यात राज्य गुप्तचर प्रशिक्षण केंद्राची स्थापना, नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1386 कोटी रुपयांचा विशेष कृती कार्यक्रम, सागरी सुरक्षेसाठी 55 पोलीस ठाण्यांची निर्मिती; शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 6 वा वेतन आयोग लागू, त्यासाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद, पंढरपूर, तुळजापूर आणि शिर्डी या तीर्थक्षेत्रांच्या वेगवान आणि नियोजनबद्ध विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय, राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा धोरण 29 ऑगस्ट 2009 पासून लागू; राज्यात ग्रामीण भागात 10 हजार 483 तर शहरी भागात 1 हजार 336 नागरी महा ई-सेवा केंद्रे उभारली जाणार आहेत; सक्षम दळणवळण व्यवस्था व शहरी भागांच्या विकासाला प्राधान्य; वीज निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल; मुंबईतील दळण - वळण व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 50 हजार कोटींची कामे सुरू, राज्याला उद्योगात आघाडी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील; उद्योगमंत्री असताना विशाल प्रकल्प धोरण व नवीन औद्योगिक धोरण आखले; देशात सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्रांना केंद्र सरकारकडून मान्यता

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा परिचय

·नाव : श्री. अजित अनंतराव पवार
· जन्म  : 22 जुलै 1959.
· जन्म ठिकाण  : देवळाली-प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.
·        शिक्षण          : बी. कॉम.
·        ज्ञात भाषा      : मराठी, हिंदी व इंग्रजी
·        वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा
·        अपत्ये          : एकूण 2 (दोन मुले)
·        व्यवसाय       : शेती
·        पक्ष               : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
·        मतदारसंघ     : 201-बारामती, जिल्हा पुणे.

·        इतर माहिती   : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई : 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघ; 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा;

28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री : 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री : 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा); ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 23 नोव्हेंबर, 2019 ते 26 नोव्हेंबर, 2019 पर्यंत उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

जितेश अंतापुरकर यांनी आश्रम शाळेत केले वाढदिवस साजरा

बिलोली (ता.प्रतिनिधी) 
राजषीॅ शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोहगाव च्या वतीने दिलिप पाटील पांढरे यांच्या कार्यालयात जितेशभाऊ अंतापुरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

वाढदिवस म्हटला की खर्च आलाच. मित्रांना पार्टी देणं, मोठमोठे समारंभ, जेवणावळी यावर मोठया प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन ""राजषीॅ शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे""च्या माध्यमातून लोहगाव येथील अनुसूचित जाती जमाती चे विद्यालयात मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आला आश्रम शाळेतील बालकांसमवेत वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला.

या मध्ये जितेश अंतापुरकर हे म्हणाले की या शाळेसाठी जे काही देता येईल ते आम्ही देउ या शाळेसाठी काहीही कमी पडु देणार नाही असेही जितेश अंतापुरकर यांनी सांगितले.  या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते दिलिप पाटील पांढरे, प्रल्हाद वानोळे, गजानन लघूळे ,हणमत पा पांढरे, अनिल गोस्वामी, उतम वानोळे, ग्रीरीस चाडकर, शिवप्रसाद स्वामी, मनोज राजूरकर,गोविंद मुदगुरे यांच्या सह मोठ्या प्रमाणात शाळेतील शिक्षक विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते

30 December 2019

✅✅ *असे असेल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ*✅✅

🎆 महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. आज एकूण ३६ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये २६ जणांनी कॅबिनेट तर १० जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
🎆 राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून आदित्य ठाकरे यांनाही कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 
🎆 पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. 
🎆 राज्य मंत्रिमंडळाची यादी खालीलप्रमाणे :
✅ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे, शिवसेना
✅ उपमुख्यमंत्री - अजित पवार, राष्ट्रवादी

✅✅ कॅबिनेट मंत्री :
१. एकनाथ शिंदे, शिवसेना२. सुभाष देसाई, शिवसेना
३. बाळासाहेब थोरात, काँग्रेस४. नितीन राऊत, काँग्रेस
५. जयंत पाटील, राष्ट्रवादी६. छगन भुजबळ, राष्ट्रवादी
७. अशोक चव्हाण, काँग्रेस८. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
९. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी१०. विजय वडेट्टीवार, काँग्रेस
११. अनिल देशमुख, राष्ट्रवादी१२. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
१३. वर्षा गायकवाड, काँग्रेस१४. डॉ. राजेंद्र शिंगाणे, राष्ट्रवादी
१५. नवाब मलिक, राष्ट्रवादी१६. राजेश टोपे, राष्ट्रवादी
१७. सुनिल केदार, काँग्रेस१८. संजय राठोड, शिवसेना
१९. गुलाबराव पाटील, शिवसेना२०. अमित देशमुख, काँग्रेस
२१. दादा भुसे, शिवसेना२२. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी
२३. संदिपान भुमरे, शिवसेना२४. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
२५. यशोमती ठाकूर, काँग्रेस२६. अनिल परब, शिवसेना
२७. उदय सामंत, शिवसेना२८. के.सी. पाडवी, काँग्रेस
२९. शंकरराव गडाख, अपक्ष३०. असलम शेख, काँग्रेस
३१. आदित्य ठाकरे, शिवसेना

✅✅ राज्यमंत्री :

१. अब्दुल सत्तार, शिवसेना
२. सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस
३. शंभूराजे देसाई, शिवसेना
४. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पार्टी
५. विश्वजीत कदम, काँग्रेस
६. दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
७. आदिती तटकरे, राष्ट्रवादी
८. संजय बनसोडे, राष्ट्रवादी
९. प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी
१०. राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष

कोण घेणार मंत्रिपदाची शपथ? ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. याबाबतची संभाव्य यादी समोर येतेय. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे.
शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे.मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात आज दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. तर यामध्ये
काँग्रेसकडून अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत आहेत, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्य़क्ष पदाची जबाबदारी येऊ शकते. राष्ट्रवादीकडून अजित पवार, धनंजय मुंडे त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांचं नाव आघाडीवर आहे. बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळू शकतं.

29 December 2019

सैनिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील आसन आरक्षित करण्याची थेट मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

२९ डिसेंबर २०१९
बिलोली (प्रतिनिधी) 
बेळकोणी येथील रहिवासी असलेले देगलूर - बिलोली विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील बेळकोणीकर यांनी  देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील आसन आरक्षित करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे . एकंदरीत पहाता महामंडळाच्या बसमध्ये खासदार , आमदार , ज्येष्ठ नागरिक , अपंग व्यक्ती , पत्रकारांसाठी आसन : आरक्षित असतात पण स्वताचे कुटुंब सोडून हजारो मैल दुरदेशाच्या सिमेवरती देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी बसमधील आसनावर आरक्षणाची सुविधा उपलब्ध नाही . परिणामी कधी सहा महिण्या नंतर तर कधी वर्षानंतर कौटुंबीक सुट्टी घेवून कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणा - या , हजारो मैलचा प्रवास करून थकलेल्या भारतीय सैनिकांना महामंडळाच्या बसेस मधून जागे अभावी उभे टाकून प्रवास करावा लागत आहे . देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनीकांनी उभे टाकून प्रवास करणे हि बाब देश वासियासाठी लाजीरवानी असून महामंडळाच्या बसेस मधून आमदार , खासदार हे कधीच प्रवास करतांना दिसत नाहीत तरी पण त्यांच्यासाठी : आसन आरक्षित असल्याचा आरोप आहे . त्याउलट हजारो मैलचा रेल्वेने प्रवास करून थकलेल्या सैनिकांना मात्र महामंडळाच्या बसेस मधून उभे टाकून प्रवास करावा लागत आहे . भारतीय सैनिकांना बसमधील आसन आरक्षन सुविधा देवून त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे . त्यामुळे बसमध्ये सैनिकांसाठी आसन व्यवस्था तात्काळ आरक्षित करण्याचे आदेश देण्यात यावे , अशी मागणी उदय पाटील बेळकोणीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

28 December 2019

लावणी महोत्सवाचे थाटात उद्घाटन

नांदेड | माळेगाव यात्रेत अकलूजच्या धर्तीवर शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी लावणी महोत्सवाला सुरुवात झाली . या लावणी महोत्सवामुळे माळेगावच्या यात्रेस वैभव प्राप्त झाले आहे .
दुपारी 3 वाजता लावणी महोत्सवाची उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे , आमदार माधवराव पाटील जवळगावकर , आमदार मोहनराव पाटील हंबर्डे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्याहस्ते नटरंग देवतेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले . यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे , कृषि व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . शरद कुलकर्णी , जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील , विजय धोंडगे , संजय बेळगे , दशरथ लोहबंदे , मधुकर सरोदे , दिनकर दहिफळे , स्वप्नील चव्हाण , आनंद गुंडले , सुभाष गायकवाड , आशाताई शिंदे , श्रीनिवास मोरे , दत्ता कोकाटे , बालाजी वैजाळे , सुभाष गायकवाड ,आनंद पाटील , संतोष पांडागळे , विशाल जाधव , प्रविण मॅकलवाड , उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही . आर . कोंडेकर , डी . यू . इंगोले , व्ही . आर . पाटील , शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर आदींची उपस्थिती होती . माळाकोळी येथील प्रेमकुमार मस्के आणि अनुराधा नांदेडकर यांच्या गण - गौळणीने महोत्सवाला सुरुवात झाली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी व चंद्रकांत मेकाले यांनी केले .

बिलोली:नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन

बिलोली(शुभम निदाने)
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी बिलोली येथे बिलोली बंद करण्यात आले.सर्वधमीॅय आणि सर्व पक्षीय'आयोजीत करण्यात आलेल्या आंदोलन दुपारी नमाजानंतर गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ' या आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व संबंधित कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी मौलाना अहमाद बेग इनामदार, मौलाना मुबेन मौलाना, मारोती पटाईत, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, अनुप अंकुशकर, गौसोडिन कुरेशी, राजेंद्र कांबळे, जावेद कुरेशी, शेख सुलेमान, वाल्योदिन खानवाडी, वल्लिओदिन फारूखी,आदींनी यावेळी आपले विचार मांडले संतोष कुलकर्णी, माधव जाधव, शेख फारुख, ए.जी. कुरेशी, धम्मपाल गावंडे,संदेश जाधव, मुकरराम फारुखी, गंगाधर सोनकांबळे, शेख सलीम, मजीद सर, संतोष पाटील, शेख एरशाद, हजप्पा पाटील, अझर कुरेशी, आदी उपस्थित होते. 
यामध्ये निवेदनाद्वारे संबंधित कायद्याचा निषेध करण्यात आला.सर्वधमीॅय आणि सर्व पक्षाच्या वतीने नागरिकता संशोधन विधेयक (कॅब)-२०१९ जातीय सलोख्यामध्ये तेढ निर्माण करणारे असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो. हे विधेयक भारतीय नागरिकता सिद्ध करण्यासाठी धर्माच्या नावावर कायदेशीररित्या आधार बनवत आहे. हे विधेयक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या अल्पसंख्याकांना भारतामध्ये आश्रय देत आहे आणि याचा उद्देश धर्माचा आधार घेऊन भेदभाव निर्माण करण्याचा आहे आणि विविध धर्मियांमध्ये यामुळे दरी निर्माण करीत आहेत. अशा प्रकारचे हे विधेयक भारताच्या अखंडता व एकतेला आघात पोहोचवत आहे,' असे म्हणणे यात मांडण्यात आले आहे. 'भारत देश सर्व जातीधर्माच्या लोकांना समान दर्जा प्राप्त करून देतो, भारतीय नागरिकता मिळण्यासाठी धर्माची अट ठेवण्यातून इतिहासाला तडा दिला जात आहे व भारतीय घटनेच्या मूळ रचनेच्याविरुद्ध आहे,' असेही स्पष्ट केले गेले आहे.  हा अन्याय रोखावा अशी विनंतीही यात करण्यात आली आहे.

26 December 2019

*शिवशाही बसचा अपघात*

बिलोली: नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही बसला सालुरा हद्दीत अपघात झाला. तेलंगना चेक पोस्ट च्या जवळपास चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने शिवशाही बस रस्त्याच्या खाली गेली  . एका विजेच्या  खांबावर जाऊन आदळली. या अपघातात सात जण होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे .ही घटना गुरूवारी पहाटे घडली.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. 
 हैद्राबादहुन नांदेड कडे जाणारी शिवशाही बस क्र एम. एच. 09,ईएम.9060 ही सालुरा हाद्दीत आली असता ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने   रस्त्याच्याकडेला असलेल्या विजेच्या खब्याला  जाऊन बस आदळली. या अपघातात बसच्या सर्व बाजूचा काचेच्या चक्काचूर झाला आहे.बसमधील सगळे प्रवासी सुखरूपआहेत अपघाताची माहिती मिळताच स.वा.निरीक्षक खुशाल ओलापांडे व अपघात पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची विचारपूस केले.

एलसीबी चिखलीकर, देगलूर धबडगे आणि बिलोलीला डोईफोडे

नांदेड :वेळ अमावशेच्या आदल्या रात्री स्थानिक गुन्हा शाखेसह बिलोली आणि देगलूर येथे तीन खांदेपालट करण्याचे आदेश पारीत करून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दोन तासातच बदल्यांचे आदेश पारित करण्यात आले . आज अमावश्या असल्याने त्यात एलसीबी , बिलोली आणि देगलूरचा प्रभार रात्रीच बदलून घेण्यात आलेला आहे . माळेगावचा खंडोबा विजयकुमार मगर यांच्या या निर्णयाला यश देवो असे

24 December 2019

माळेगाव येथे हजारो भाविकांनी घेतले देवस्वारीचे दर्शन घेतले

श्रीक्षेत्र माळेगाव | दक्षिण भारतात प्रसिध्द असलेल्या माळेगाव यात्रेला प्रारंभ होऊन दुपारी श्री खंडोबाची । देवस्वारी निघाली . यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात बेल भंडारा खोब - याची उधळण करीत लाखो भाविकांनी देवस्वारीचे दर्शन घेतले. माळेगावच्या श्री खंडोबाच्या यात्रेस प्रारंभ झाल्यानंतर आज दुपारी दोन वाजता मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली . शासकीय विश्रामगृह येथे स्वारीचे आगमन झाले . यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगाकर , आमदार श्यामसुंदर शिंदे , आमदार मोहनराव हंबर्डे , आमदार रावसाहेब अंतापुरकर,आशाताई शिंदे , उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती समाधान जाधव , शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे , कृषी व पशुसंर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी , महिला व बालकल्याण सभापती मधुमती राजेशराव देशमुख , समाजकल्याण सभापती शिलाताई दिनेश निखाते , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . शरद कुलकर्णी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी दी आर कोंदेकर कुलकर्णी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही . आर . कोंडेकर , डी . यू . इंगोले , व्ही . आर . पाटील , जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील , प्रविण पाटील चिखलीकर , विजय धोंडगे , प्रणिताताई देवरे चिखलीकर , भिमराव कल्याणे , श्रीनिवास मोरे , माणिकराव लोहगावे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर , शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर , प्रशांत दिग्रसकर , बळवंत , यू . टी . तोटावार , मिलिंद गायकवाड , लोहा पंचायत समितीचे सभापती सतिश पाटील उमरेकर , सरपंच गोविंदराव राठोड , उपसभापती इंदूबाई कदम , आनंदा गुंडले , रंगनाथ भूजबळ , अनिल मोरे , नरेंद्र गायकवाड , उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर , बालाजी तोटेवार , गट विकास अधिकारी पी . पी . फांजेवाड , गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के , उपसरपंच सुंदरबाई धुळगंडे यांच्यासह जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीचे पदाधिकारी , अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती .

अमृता फडणवीसांविरोधात शिवसेना आक्रमक; पुणे येथे ‘जोडे मारो’ आंदोलन

पुणे | अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडनावावरुन केलेल्या ट्विटमुळं शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पिंपरीमध्ये शिवसेना आघाडीच्या वतीने अमृता फडणवीस यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. फक्त ठाकरे आडनाव असल्याने कोणीही ठाकरे होत नाही, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीने अमृता फडणवीस यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे आणि चप्पल मारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या ट्विटचा निषेध नोंदवला. ज्या पोस्टरवर हे जोडे मारण्यात आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता.  ‘राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा’ अशा आशयाच्या पोस्टरसह घोषणाही देण्यात आल्या.अमृताताई, खरं तर पराभवामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आता आपण स्वतः सावरून, माजी मुख्यमंत्र्यांनादेखील मानसिक आधार द्यायला हवा होता पण साराचं अंधार दिसतोय आपल्या विचारात, अशी बोचरी टीका  महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांवर केली आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं. त्यानंतर त्यांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला गेला.

23 December 2019

कै.गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचपिंपळी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

बिलोली - तालक्यातील मौ .पाचपिंपळी येथे गेल्या बारा वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षी दि . २३ डिसेंबर रोजी कै.गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे २२० नाव नोदणी झाली त्यामधील ४४ वयोवृद्धाचे शस्त्रक्रिया होणार आहे . व्हिजन फाउंडेशन इंडिया उदयगिरी लॉयन्स नेञ रुग्णालय उदगीर व श्री साई शिक्षण संस्था पाचपिंपळी यांच्या संयुक्त विद्यमानाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून कै . गंगाबाई रावसाहेब पाटील पाचपिंपळी यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या बारा वर्षापासून सदर शिबिराचे आयोजन करण्यात येत असून , तालुक्यातील व परिसरातील हजारो गोरगरीब या शिबिराचा लाभ घेतात .दि . २३ डिसेंबर २०१९ रोजी गंगाबाई पाटील नर्सिंग स्कूल पाचपिंपळी येथे पार पडला.  शिबिराचा आयोजन  श्री साई शिक्षण संस्थेचे सचिव तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रा . शिवाजी पाटील पाचपिंपळीकर व उपसरपंच कमलकिशोर पाटील पाचपिंपळीकर _ _ यांनी केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, (पं.स.सदस्य)शंकर यंकम, हानमंत इंगळे,दिलिप पा.पांढरे,हाज्जपा पाटील,पांडुरंग पाटील रामपुरे सर,अविनाश पा पत्के,तिरूपती हिवराळे प्रविण पाटील,बाबुराव इंगळे,डॉ.शंकरराव पाटील,अशोक पा.जाधव,विठ्ठल पा.धुप्पेकर, आनंदराव पा. डॉ.ठाकुर साहेब,डॉ.विलास,पांचाळ सर,पवार सर,शिंदे सर,सय्यद सर, वानखेडे सर,केशव रानवळकर व शिक्षक, विद्यार्थी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

22 December 2019

रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बिलोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

बिलोली येथे दि:२२ डिसेंबर रोजी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व  बिलोली चे प्रसिद्ध उद्योजक कै.हनमनलु गंगाराम गंगावार उर्फ (कांता सावकार) यांच्या तृतीय स्मृतिप्रीत्यर्थ फोटो पूजन करण्यात आले व नवीन उपक्रम म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे मुलीला जन्म देणाऱ्या मातेचा हिमालया बेबी किट व लहान बाळास ड्रेस देऊन  सत्कार करण्यात आला .व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागेश लखमावार साहेब व श्री कृष्णा पालदेवार (जिल्हा न्यायाधीश हिंगोली) आर्य वैश्य समाज बिलोली चे ज्येष्ठ किशन सावकार गंगावार,विजय कुमार कूंचनवार ( अध्यक्ष आर्य वैश्य महासभा बिलोली) संतोष उत्तरवार (अध्यक्ष आर्य वैश्य युवक बिलोली) , शिवकुमार गंगावार, ज्ञानेश्वर गंगावार, लक्ष्मण गंगावार ,संजय पतेवार, विजय गोपशेटवार, डॉ.संतोष गंदेवार, संजय गंदेवार, राजू गंदेवार,उमाकांत पतेवार ,विठ्ठल कोत्तावार , महेश गंगावार, नंदकुमार पेन सलवार, सतीश बासटवार, आदिनाथ गंगावार,सत्यजित तुप्तेवार,एकनाथ पतेवार ,श धोंडिबा काप्रतवार,गणेश  कोत्तावार महेश येरावार,आदी उपस्थित होते . यावेळी आर्य समाज  बिलोली सर्व समाज बांधवांच्या वतीने श्री कृष्णा पालदेवार यांची जिल्हा न्यायाधीश हिंगोली येथे निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.


15 December 2019

शेतकऱ्यांचा नादच खुळा 4.5.एकरात साकारली शरद पवारांची प्रतिमा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रसचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या अपार कष्टामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये स्थान मिळाले . विशेष म्हणजे 80 वर्ष वयातही तरुणालाही लाजवेल एवढ्या क्षमेतेनं पवारांनी धावपळ केली . पायाला भिंगरी लावल्यागत पवार महाराष्ट्र दौरा करत होते . त्यात , साताऱ्यातील भर पावसातील सभेमुळे पवारांबद्दल तरुणाईच्या मनात कमालीचा आदर वाढला . नुकतेच , 12 डिसेंबर रोजी त्यांनी आपला 80 वा वाढदिवस साजरा केला . विशेष म्हणजे शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला . मात्र , कळंब तालुक्यातील एका शेतकरीपुत्राने पवारांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत .कळंब तालुक्यातील निपाणी गावच्या शेतकरी पुत्राने तब्बल 4 . 5 एकर शेतजमिनीमध्ये शरद पवारांची प्रतिमा साकारून त्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत . विशेष म्हणजे ही प्रतिमा साकारण्यासाठी तब्बल 15 दिवसांची वाट या शेतकरीपुत्राला पाहावी लागली . त्यामुळेच , वाढदिवसानंतरही तीन दिवसांनी ही प्रतिमा मातीतून उदयास आली . विस्तीर्ण असं साडे चार एकर क्षेत्र . . . यात पंधरा दिवसाची पेरणीपुर्व मशागत . . . त्यावर केलेलं आखीव - रेखीव रेखांकन . . . यात आठ दिवसापूर्वी विविध बियाणांची केलेली पेरणी . . हे बीज अंकुरलं अन् साकार झाली तब्बल १ लाख ८० हजार स्क्वेअर फूट आकाराची शरद पवार यांची प्रतिमा . अष्टपैलू आर्टीस्ट मंगेश निपाणीकर यांनी अशी विक्रमी कलाकृती सादर करूण शरद पवार यांना दिलेल्या शुभेच्छाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे . गत पाच दशकंगल्ली ते दिल्लीपर्यतच्या राजकीय सारीपाटावरील एक महत्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार यांना गणलं जातं . त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य चाहते राज्यभर आहेत . मात्र निपाणी ( ता . कळंब ) येथील भुमिपूत्र व राज्यभर एक अष्टपैलू आर्टीस्ट म्हणून नावलौकीक मिळवलेल्या मंगेश अनिरुद्ध निपाणीकर या कलाप्रेमीने अफलातून कलाकृती सादर करत पवारांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत . निमित्त होत १२ डिसेंबर या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे . ऐंशी वर्षाचे शरद पवार मराठी मुलूखातील एक ज्येष्ठ नेते असले तरी आजही ते असंख्य तरूणाईसाठी एका दिपस्तंभाप्रमाणे कार्यरत आहेत . गुरूवारी राज्यभर पवार यांचा वाढदिन मोठ्या उत्साहात साजरा केलाजात होता . मात्र , पवारांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेल्या मंगेश निपाणीकर या तरूण कलाकाराने यंदाचा शरद पवार यांचा वाढदिवसा आपल्या कलाकृतीद्वारे ' स्पेशल ' करण्याचा संकल्प केला होता . यासाठी त्यांनी ' ग्रास पेटींग ' या कला माध्यमांची निवड केली . फक्त यावेळी तृणाऐवजी तरकारी व खाद्यान्न प्रवर्गातील बियाण्यांचा वापर करत अंकूरलेल्या बिंजाकूराच्या माध्यमातून पवार ' साहेब ' साकारण्याचा प्रयत्न सुरू केला . यासाठी गावातील सुरेश पाटील व बाळासाहेब पाटील या बंधूच्या निपाणी - नायगाव रस्त्यावरील क्षेत्राची निवड केली . जवळपास साडेचार एकर क्षेत्राची पंधरा दिवस पेरणीपुर्व मशागत केली . यानंतर या जमिनीवर शरद पवार यांची प्रतिमा साकार करण्यासाठी तंतोतंत रेखांकन करण्यात आले . हेरेखांकन ग्राफिक्स डिझाईनवर बेतलेलं होतं . यासाठी विविध आकारमानं परिणामकारकरित्या मांडण्यात आली . यानंतर दिनांक ४ डिसेंबरला यामध्ये कल्पकरित्या बियाणं पेरण्यात आलं . चांगली उगवणक्षमता होण्याकरीता ओलाव्याची काळजी घेतली . याकरीता आवश्यक त्या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला . गुरुवारी केलेल्या कष्टाला यश आले . अखेर सकाळपासून अंकूर फुटण्यास सुरूवात झाली . पुरेसे बिंजाकूर दृष्टीपथात आल्यानंतर आकाशातून यावर नजर टाकली असता साकार झाली ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिमा .

14 December 2019

नवी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात भारत बचाव आंदोलन


नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज भारत बचाव आंदोलनाचं आयोजन केलं  होत. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होणार आहे. या आंदोलनासाठी   काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.या आंदोलनाला बिलोली येथून देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर,विजय येवनकर, उपमहापउपमहापौर देशमुख,गोणे साहेब, व्यंकट मुदिराज बिलोली नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिळीकर,सोबत पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले.

आर्थिक मंदी, शेतकरी विरोधी भूमिका, महिला अत्यााचार, बेरोजगारी आणि संविधानावर केलेले हल्ले या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारला घेरणार आहे. 

13 December 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली येथे रुग्णांना फळे वाटप

बिलोली - बिलोली येथील ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवस निमीत्त रूग्णाना फळे वाटुन वाढदिवस साजरी करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर , ग्रामीण रुग्णालय चे डाँ . तोटावार , डाँ . सिद्दिकी , बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती व्यंकटराव पांडवे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अर्जुनराव अंकुशकर साहेब , तालुका उपाध्यक्ष गिरी महाराज सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष गंगाधर प्रचंड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आनंद गुडमलवार , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव संतोष उत्तरवार ,शुभम निदाने, केशव रानवळकर , सावळी चे पाणी पुरवठा सचिव विनोद देवकरे , ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव जिंकले , माधव वाघमारे , युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सय्यद शकील , रामचंद्र कानासे , कर्मचारी देविदास भोईवार , गायवाड , प्रकाश सोनकाबळे  सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते 

12 December 2019

महाविकास आघाडी सरकारच्या शपथ घेतलेल्या सहा मंत्र्यांचे खातेवाटप झाले जाहीर.

❗ *BREAKING.. खातेवाटप जाहीर..!*

👉 

🔸 *एकनाथ शिंदे -*
*गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणीपुरवठा, मृदू व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम*

🔸 *जयंत पाटील -* 
*अर्थमंत्री, गृहनिर्माण, सामाजिक आरोग्य, सहकार व पणन, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास*

🔸 *बाळासाहेब थोरात -*
*महसूल मंत्री, ऊर्जा, वैद्यकीय व शालेय शिक्षण, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय*

🔸 *छगन भुजबळ -*
*ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन.*

🔸 *सुभाष देसाईं -*
*उद्योग व परिवहन खाते, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी व रोजगार हमी*

🔸 *नितीन राऊत -* 
*सार्वजनिक बांधकाम खाते, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, मदत व पुनर्वसन*
💫
*JUST IN - Breaking Updates*
_(Short.... But Important)_
__________________________________

09 December 2019

नांदेड जिल्हातीलअार्थिक दष्ट्या दुर्बळ दिव्यांग व्यक्तीना मोफत शिबीराचे आयोजन

!! *नांदेड जिल्हातीलअार्थिक दष्ट्या दुर्बळ दिव्यांग व्यक्तीना मोफत आवश्यक सहायक उपकरणे उपलव्ध करुन देण्या साठी शिबीरीचे आयोजन करण्यात आले आहे*.खालील प्रमाणे वेळा पञक आहे.
             *-: वेळा-पञक :-*
              01) दिनांक10 डिसेंबर19 -नांदेड
             02)दिनांक.11डिसेंबर19-अर्धापुर
             03)दिनांक.12डिसेंबर19-मुदखेड
             04)दिनांक.13डिसेंबर19-भोकर
            05)दिनांक.14डिसेंबर19-हिमायत नगर
            06)दिनांक.15डिसेंबर19-किनवट
            07)दिनांक.16डिसेंबर19-किनवट
            08)दिनांक.17डिसेंबर19-माहुर
            09)दिनांक.18डिसेंबर19-हदगांव
            10)दिनांक.19डिसेंबर19-लोहा
            11)दिनांक.20डिसेंबर19-कंधार
            12)दिनांक.21डिसेंबर19-नायगांव
            13)दिनांक.22डिसेंबर19-मुखेड
            14)दिनांक.23डिसेंबर19-देगलुर
            15)दिनांक.24डिसेंबर19-बिलोली
            16)दिनांक.25डिसेंबर19 -धर्माबाद
            17)दिनांक26डिसेंबर19-उमरी
वरिल प्रमाणे *नांदेड जिल्हातील दिव्यांग बांधवा साठी अतिमहत्त्वाचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे, सदर कॅम्पमध्ये दिव्यांग बांधवांना विविध उपयोगी साहित्याचा लाभ मिळवून दिला जाणार आहे तरी नांदेड जिल्हातील  सर्व दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा.

  •  सकाळी ८ पासुन संध्याकाळी ५ पर्यत  चालू राहिल
  • नावाची नोंदणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात नोंद करण्यात यावे
  • अपंगाच प्रमाणातपत्र आॕनलाईन केलेल 
  • दोन फोटो 
  • आधार कार्ड 
  • उत्पणाच प्रमाणपत्र 
  • दातांचा विलाज देखील होणार आहे 
  • व्हिल चेअर मोफत मिळणार आहे 
  • वयोवृधाना चष्मा वाटप करण्यात येणार आहे 
  • दोन्ही डोळ्यांनी आधांळ असेल तर त्यांना मार्ग दर्शक काठी मिळणार 

   🔵जिल्हा प्रमुख: *मंगनाळे विठ्ठलराव*
 प्रहार दिव्यांग क्रांती संघटना. नांदेड.मो.9422189762,9834382253माहुर तालुका प्रहार संघटना आधेक्ष किशोर भाऊ हुडेकर मो नं 7499288561

06 December 2019

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार

हैदराबाद, 06 डिसेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे

हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे असं समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती,' असं आरोपीनं म्हटलं होतं.सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी तिचे हातपाय बांधले. तसंच त्या महिलेला जबरदस्ती दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आलं आणि तिथं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्या महिलेला जाळण्यात आलं,' असे खुलासे आरोपीने पोलीस कोठडीत केल्याचं हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे.

चौकशीदरम्यान आरोपीनं सांगितलं होतं की, 'आम्हाला वाटलं बलात्कारानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा ती महिला जोरदार ओरडू लागली. त्यानंतर पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहचू नये म्हणून आम्ही तिला मारून टाकलं.'काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.

05 December 2019

विद्यार्थी नापास का होतात?

वर्षाचे एकूण दिवस ३६५ 
३५ दिवस दिवाळी आणि 
नाताळची सुटी उरले दिवस ३३० 
५० दिवस उन्हाळ्याच्या सुटीत जातात
 उरले २८० दिवस एका वर्षात एकूण ५२ रविवार असतात 
उरले २२८ दिवस विद्यार्थी आठ तास झोपतो म्हणजे वर्षातून १२२ दिवस झोपतो
 उरले १०६ दिवस कपडे बदलणे , आंघोळ , जेवण यामध्ये दररोज अडीच तास जा तात म्हणजे ३८ दिवस
 उरले ६८ दिवस खेळण्यासाठी दररोज १ तास  म्हणजे १५ दिवस
 उरले ५३ दिवस आजारपण , यात्रा , कार्यक्रम यासाठी १० दिवस 
उरले ४३ दिवस सणासाठी वर्षातून १५ दिवस सुटी 
उरले २८ दिवस टिव्ही पाहणे यासाठी किमान १ तास म्हणजे १५ दिवस 
उरले १३ दिवस परीक्षा १२ दिवसांची उरला १ दिवस आणि तोही दिवस निकाल पाहण्यात जातो मग तुम्हीच सांगा विद्यार्थी नापास होणार की पास ?

02 December 2019

पंकजा मुंढे यांच्या फेसबुक, ट्विटर वरून भाजप गायब

रविवारी फेसबुक पोस्ट करून पंकजा मुंढेनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन तयार होण्याची शक्यता दर्शवली . " 12 डिसेंबर , लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस . . . त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त . . . जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं , बघावं वाटतं . . तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं . मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय . . . तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे . . नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी ? तुमच्याशिवाय माझं कोण आहे ? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू असा या पोस्ट चा शेवट होता . आणि आज पंकजा मुंडेंच्या फेसबुक आणि ट्विटर करून भाजप गायब झाल्याचे दिसत आहे . या सगळ्या घडामोडीमुळे मुंडे भाजप सोडाणार का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे .

पंकजा मुंडे भाजप सोडणार?; त्यांच्या भावाचा मोठा खुलासा!

बीड | विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंनी आज प्रथमच फेसबुकवर  भावनिक पोस्ट केली आहे. पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या पोस्टमुळं राजकीय वर्तुळात पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र पंकजा मुंडे यांचे मानलेेले भाऊ विधानपरिषदेचे आमदार महादेव जानकर यांनी या वृत्ताचं खंडण करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

पंकजाताई या कुठेही जाणार नाही. त्या भाजपमध्येच राहणार आहेत. सोशल मीडियावर काहीही अफवा पसरवल्या जात आहेत. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील, असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.आगामी काळात पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्यासमोर येणार आहे, अशी भावनिक पोस्ट पंकजा मुंडे सकाळी नऊच्या सुमारास केली होती.

दरम्यान येत्या 12 तारखेला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर कोणता निर्णय घेणार?, काय बोलणार?, याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

01 December 2019

चव्हाणांनी यदाकदा मंत्रीपद नाकारल्यास आ.जवळगावकरांना मिळु शकते संधी

माजी मुख्यमंत्री अशोकराब चव्हाण यांनी महत्वाचे मंत्रीपद किंबहूना खाते मिळत नसल्याच्या नाराजीतुन यदाकदा मंत्रीपद नाकारले तर हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आ . माधवराव पाटील जवळगावकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातुन व्यक्त केली जात आहे . जिल्ह्याच्या राजकारणात आ . जवळगावकर हे चव्हाणांचे विश्वासू समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात . राज्यात शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झालेली आहे . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे मंत्रीपदाची शपथ घेतील असाअनेकांचा कयास होता . मात्र त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली . त्यांच्याऐवजी नितीन राऊत यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली . आता मंत्रीमंडळ विस्तारात काँग्रेसच्या कोट्यातील एका महत्वाच्या मंत्री पदावर अशोकराव चव्हाण यांची निश्चित वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे . कोणत्याही परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या वाट्यास एक मंत्रीपद येणार है | सुध्दा निश्चित आहे . परंतु महसुल यासारखे महत्वाचे मंत्रीपद यदाकदा मिळाले नाही तर , माजी | मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे दुसऱ्या कोण्या मंत्रीपदावर समाधान मानतील , असे अनेकांना |वाटत नाही . वास्तविक पाहता जिल्ह्याच्या विकासाच्या रचाने अधिक गती घ्यावी , यासाठी अशोकराव चव्हाण यांना महत्वाचे मंत्रीपद मिळावेच म्हणून आ . माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह आ . अमर राजुरकर , आ . मोहनराव हंबर्डे , आ . रावसाहेब अंतापूरकर यांनी साकडे घातलेले आहे . परंतु त्यांचा हा नवस पूर्णत्वास जातो अथवा कसे , हे येत्या दिवसातच कळणार आहे . दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना महसुल या सारखे महत्वाचे मंत्रीपद मिळाले नाही तर , ते नांदेड जिल्ह्याच्या वाट्यास येणारे अन्य कोणतेही मंत्री पद विश्वासु समर्थक असलेल्या आ . माधवराव पाटील जवळगावकरांच्या पदरात टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही .

30 November 2019

डॉ. प्रियंका खून आणि बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे

हैद्राबाद– निर्भया प्रकरणानंतरही देशभरात बलात्काराच्या घटना सुरुच आहेत. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास तेलंगणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. हैदराबाद शहराच्या बाहेरील शमशादनगर परिसरात एका 26 वर्षीय डॉक्टर तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला. ही तरुणी कोल्लुरु येथील एका पशु वैद्यकीय दवाखान्यात काम करत होती.

डॉ. रेड्डी यांच्यावर सामुहीक बलात्कार केल्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.

सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

भाजपचा ‘हा’ खासदार अजित पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मुंबई | काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज महाविकास आघाडीची विधानसभेत बहुमत चाचणी होणारी आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.

नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळ जवळ एक तास चर्चा झाली. चिखलीकर आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.पवार आणि चिखलीकर यांच्यात काय चर्चा झाली याबाबत तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, प्रतापराव चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या भेटीची चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, अजित पवारांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली होती.

पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जाळून मारल्याची घटना

# LIVE NEWS Update : - दि . 29 नोव्हेंबर 2019 हैदराबादेत पुन्हा निर्भयाकांड पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जाळून मारल्याची घटना तर सोशल मीडियावर # RIPRIYANKATEDDY असा ट्रेंड सुरू ? # हैदराबाद । बुधवारी रात्री टोल प्लाझाजवळ दुचाकी पंक्चर झाल्यामुळे थांबलेल्या 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या प्रियांका रेड्डीची हत्या करण्यात आली . गुरुवारी सकाळी डॉक्टरचा जळालेला मृतदेह सापडला . सुरुवातीच्या तपासणीनंतर पोलिसांना असा संशय आहे की खुनापूर्वी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता . या प्रकरणी साइबरबाद पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे . पशुवैद्यकीय डॉक्टर शदनगर येथे राहत असत आणि येथून सुमारे 30 किमी अंतरावर शमशाबादमधील पशुवैद्यकीय रुग्णालयात काम करीत होती . हैदराबाद - बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील टोंडुपल्ली टोल प्लाझावर ती दररोज दुचाकी उभी करायची आणि तेथून एक टॅक्सी घेऊन दवाखान्यात जात असे . # बुधवारी रात्री दुचाकीचा टायर पंक्चर दिसला त्या मुळे ती टोल प्लाझावर थांबली . बुधवारी डॉक्टर पशुवैद्यकीय रुग्णालयातून टोल प्लाझावर परत आली आणि तेथून दुस ? या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी निघून गेले . रात्री 9 . 22 वाजता , डॉ . प्रियांकाने तिच्या बहिणीला फोनवर सांगितले की तीच्या दुचाकीचा टायर Play Marathi पंक्चर आहे . एका व्यक्तीने त्याला मदतीची ऑफर दिली आहे . थोड्या वेळाने , तीने पुन्हा फोन केला आणि सांगितले की मदत देणारी व्यक्ती असे सांगत आहे की आजूबाजूची सर्व दुकाने बंद आहेत आणि पंक्चर निश्चित करण्यासाठी गाडी दुस ? या ठिकाणी नेली पाहिजे . # डॉक्टर प्रियंकाने जेव्हा तिच्या बहिणीला फोन के ला तेव्हा ती खूप घाबरलेली होती . कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , जेव्हा डॉ . प्रियंकाने तिच्या बहिणीला फोन केला तेव्हा ती खूप घाबरलेली होती . तेंव्हा बहिणीने तेथे स्कुटी सोडून कॅब बुक करुन घरी परत जाण्यास सांगितले परंत महामार्गावरील टोल प्लाझावर वाट पाहत बसल्याने भीती वाटत असल्याचे प्रियंकाने सांगितले नंतर प्रियांकाने आपल्या बहिणीला सांगितले की आजूबाजूला अनोळखी माणसे आहेत ते त्याच्याकडे घुरून बघत आहेत आणि तिला भीती वाटत आहे . जवळच एक लॉरी उभी आहे , जिथे काही लोक उपस्थित आहेत . प्रिंकाने आपल्या बहिणीला सांगितले की तू माझ्याशी फोनवर बोलत राहा नंतर रात्री 9 : 44 वाजता प्रियांकाचा फोन स्विच ऑफ होता . कुटुंबीयांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली . # एका शेतकऱ्याने तिचा जळलेला मृतदेह पाहिला वेटरनरी डॉक्टर हैदराबाद - बेंगळुरू महामार्गावरील टोल प्लाझापासून 30 किमी अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी अखेर तिचा जळलेला मृतदेह पाहिला त्याने पोलिसांना याची माहिती दिली हरवलेल्याअहवालाच्या आधारे पोलिसांनी प्रियंकाच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले . तिच्या मृतदेहाची ओळख अर्ध जळालेल्या स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटद्वारे झाली . पोलिसांना परिसरातून दारूच्या बाटल्याही सापडल्या . # चार संशयितांना ताब्यात शमशाबादचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांच्या माहितीनुसार , _ _ " पशुवैद्यकीय डॉक्टर पप्रियंकाला रॉकेलने पेटविण्यात आलं आहे . " तपास करण्यासाठी पोलिसांनी 10 पथके तयार केली आहेत . " हैदराबादचे कमिशनर वीसी सज्जनर म्हणाले की चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे . अर्धवट जळालेल्या स्थितीतील या महिला डॉक्टरच्या मतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे 
. या घटनेमुळे पुन्हा दिल्लीच्या निर्भया कांडाची आठवणी ताज्या केल्या आहे . तर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत . # RIPRIYANKArEDDY असा ट्रेंड सुरू झाला असून महिला डॉक्टर करीता न्यायाची मागणी केली जात आहे . त्या संदर्भातील काही स्क्रिन शॉट आम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये देत आहोत .
संशयीत आरोपी 

29 November 2019

आदर्श प्ररकरणाची कोणतीही चौकशी नाही असे ED ने स्पष्ट केले

ईडीच्या पत्रात  लिहिले आहे की
अंमलबजावणी संचालनालय २.1.११.२०१ Press प्रेस नोट आदर्श सोसायटी घोटाळ्यावरील वृत्तान्त केलेल्या बातम्यांवरील स्पष्टीकरण हे स्पष्ट करण्यासाठी की आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नवीन चौकशी केली गेली नाही.  माध्यमांमध्ये नुकतेच प्रसिद्ध झालेले अहवाल हे सट्टेबाज आणि कोणत्याही गुणवत्तेशिवाय आहेत.असे स्पष्ट पणे ईडी कडुन पत्रातून सांगितले आहे.काल पासुन सोशल मिडिया वर ईडी कडुन आदर्श घोटाळ्याची  चौकशी होणार आहे असे संदेश forward होत होते.पण आत्ता ईडीने स्पष्ट पणे सांगितले  आले आहे . 

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची निवड

मुंबई | विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने हंगामी अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता वळसे पाटलांची निवड झाली आहे.महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी मांडण्याची शक्यता आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना कोणतीही अडचण होऊ नये आणि कोणताही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी वळसे पाटलांची निवड झाली आहे.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांना संसदीय राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात विधानसभेचं अध्यक्षपद भुषवलं आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाराज!

मुंबई | गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर सहा जणांचा शिवाजी पार्कवर शपथविधी पार पडला. मात्र, शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे.

शपथविधी सोहळ्यात प्रोटोकाॅलनुसार व्यवस्था करण्यात आली नव्हती. शपथविधी सोहळ्याची व्यवस्था प्रशासनाला करु दिली नाही. त्यामुळे मंचावर अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शपथ घेताना आमदारांनी सुरुवातीला आपल्या नेत्यांची नावं घेतली, यावरही भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. भविष्यात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात असे प्रकार घडू नयेत. अशा कृत्यांमुळे सोहळ्याची प्रतिष्ठा खालावते, असं राज्यपालांचं म्हणणं आहे.

शपथविधीदरम्यान मंचावर असणाऱ्या अव्यवस्थेवर राज्यपालांना नाराजी व्यक्त केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत आक्षेप नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’; मंत्रालयातील केबिनबाहेर लागली पाटी

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हजारोंच्या जनसमुदायासमोर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज ते मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेणार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या केबिनबाहेर ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी पाटी लावण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मंत्रालयात जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांचे केबिनही सजवण्यात आले असून त्यांच्या नावाची पाटी दरवाजावर लावण्यात आली आहे.उद्धव ठाकरे महाराष्ट्र विकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतली. 20 वर्षानंतर महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभला असून उद्धव ठाकरे सैनेचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.

दरम्यान, शिवसेनेनं भाजपसोबत युती करत विधानसभा लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजप-सेनेमध्ये बिनसलं. उद्धव ठाकरे यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. आघाडीच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे.

काँग्रेस च्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले उद्धव ठाकरे यांना पत्रा द्वारे शुभेच्छा

 
  आदित्यने मला काल भेट दिली आणि आज संध्याकाळी मुंबईतल्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आपले निमंत्रण दिले. मला खंत वाटते की या उत्सवात मी उपस्थित राहू शकत नाही.  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्र येत आहेत  अशा वेळी असाधारण परिस्थिती जेव्हा देशाला भाजपकडून अभूतपूर्व धोक्यांचा सामना करावा लागतो.  राजकीय वातावरण विषारी झाले आहे आणि अर्थव्यवस्था कोलमडली आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एका समान कार्यक्रमास सहमती दर्शविली आहे आणि लाम यांना विश्वास आहे की हा कार्यक्रम पत्र व भावनेने राबविण्यासाठी सर्व तिन्ही पक्ष प्रयत्नशील असतील.  आघाडीने एकत्रित, हेतूपूर्ण, जबाबदार, जबाबदार, पारदर्शक व प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करुन द्यावी ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे आणि या अपेक्षांची पूर्तता व्हावी यासाठी आमचा सामूहिक प्रयत्न निःसंशयपणे होईल.  तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन डाव साकारला म्हणून मी तुम्हाला वैयक्तिक शुभेच्छा देतो. 
 विनम्र विनम्रतेने, विनम्र  श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री - मंत्रिमंत्रिम 

शिवतिर्थावरील शपथसोहळ्यात उद्धव ठाकरेंसोबत ‘या’ नेत्यांनीही घेतली शपथ!

मुंबई | बरोबर सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29 वे तर शिवसेनेचे 3 रे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकूण सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मी जयंत कुसुम राजाराम पाटील असं म्हणत आणि शरद पवार साहेबांना वंदन करून शपथ घेतो की, असं म्हटलं. यावेेळी शिवतिर्थावर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसंच राष्ट्रवादीचे दुसरे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचं स्मरण केलं. त्याचबरोबर भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही अभिवादन केलंदुसरीकडे काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. तर विदर्भातले काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत आणि तथागत गौतम बुद्ध यांना साक्ष ठेवत मंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

28 November 2019

देवेंद्र फडणवीस यांची सरकार स्थापन झाल्या वर पहिली टीका

लाईव्ह न्युज अपडेट: मागील सरकार पेक्ष्या ह्या सरकारचा विरोधी पक्ष सक्षम असल्याचा प्रत्यय सरकार
स्थापन झाल्या च्या काही तासात
आला आहे. फडणवीस यांनी ट्विटर वर सरकार विरोधात जोरदार हल्ला चढवला असून पुन्हा विदर्भाचा राग आळवला असल्याचं समोर आलं आहे.फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारे माप घोषणा असल्या तरी मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटेवर वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख ही सुद्धा असू नये हे दुर्दैवी आहे. असं म्हणत नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा करू असं ट्विट केलं आहे.
राज यांनी जस म्हंटल होत राज्याला सक्षम विरोधी पक्ष्याची गरज आहे. तो राज यांनी जरी दिला नसला तरी भाजप सर्वात मोठा पक्ष असून ही विरोधात बसण्याची वेळ आल्या मूळे राज्याला सक्षम विरोधी पक्ष भेटला असून त्याची चुणूक ही लगेच सरकार स्थापन होताच दिसून आली असून हे राज्याचा हिता साठी चांगलंच म्हनाव लागेल नाही का?

महाविकासआघाडीचा खातेवाटप फॉर्मुला ठरला

शिवसेना प्रमुख तथा भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तास्थापन होणाऱ्या ' महाविकासआघाडीचा ' खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे . या खातेवाटपात काँग्रेसच्या वाट्याला जादा कॅबिनेट मंत्रीपद आले आहे . महाराष्ट्र विकासआघाडीचा खातेवाटपचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे . या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं अशी १६ मंत्रीपदे आली आहेत . तर राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं अशी १५ मंत्रीपदं आणि काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत आहेत . दरम्यान , आधी काँग्रेसला ९ कॅबिनेट १ राज्यमंत्री मिळणार होते . आता एक कॅबिनेट पद वाढले आहे . उपमुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात एक कॅबिनेट मंत्रीपद जास्तीचे मिळाले आहे .

27 November 2019

सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले: एकनाथ खडसे

मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई | बंडखोरीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांचं या बैठकीकडे लक्ष लागले आहे.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद ट्रायडेंट हॉटेलला पार पडली. या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार तातडीने सिल्व्हर ओकवर रवाना झाले होते.

दरम्यान, अजित पवार ही त्यांच्या निवासस्थानाहून सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना  झाले होते.

शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठकीला छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.

26 November 2019

बिलोली येथील विद्यानिकेतन शाळेत संविधान दिन साजरा

 (बिलोली): येथील विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय  येथे आज संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व  डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या वेशभूषेत दोन विद्यार्थी होते. व संविधानातील मुलभुत अधीकार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री. अशोक दगडे सर,बालाजी वारघडे सर,पाटील सर,कापावार सर, रामचंद्र मोरे सर,बुद्वेवाड सर,दुप्पे सर,भास्कर गौड सर व शाळेतील शिक्षक विद्यार्थी , जेष्ठ नागरिक उपस्थित होते .

जे भल्याभल्यांना जमलं नाही ते भाऊजी सदानंद सुळेंनी करून दाखवलं ?

 मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभार घेण्यापूर्वीच अजित पवार ( Ajit Pawar resigns as DCM ) यांनी राजीनामा दिला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मॅरेथॉन भेटी घेत अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीतच ठेवण्यात यश मिळवलं आहे . सर्व दिग्गजांनी भेटी घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांची भेट अजित पवारांसाठी ( Ajit Pawar resigns as DCM ) निर्णायक ठरली सदानंद सुळे यांनी आज सकाळी हॉटेल ट्रायडंटमध्ये अजित पवारांची भेट घेऊन , त्यांचं मन वळवलं . अखेर 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी 3 दिवसात पदभार न स्वीकारताच राजीनामा दिला . सदानंद सुळेंच्या भेटीनंतर अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर जाऊन त्यांनी आपला राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे . अजित पवारांचा राजीनामा हा भाजपसाठी मोठा धक्का तर राष्ट्रवादीसाठी तितकाच मोठा दिलासा आहे .