बिलोली(शुभम निदाने)
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात शुक्रवारी बिलोली येथे बिलोली बंद करण्यात आले.सर्वधमीॅय आणि सर्व पक्षीय'आयोजीत करण्यात आलेल्या आंदोलन दुपारी नमाजानंतर गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. ' या आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व संबंधित कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.याप्रसंगी मौलाना अहमाद बेग इनामदार, मौलाना मुबेन मौलाना, मारोती पटाईत, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, अनुप अंकुशकर, गौसोडिन कुरेशी, राजेंद्र कांबळे, जावेद कुरेशी, शेख सुलेमान, वाल्योदिन खानवाडी, वल्लिओदिन फारूखी,आदींनी यावेळी आपले विचार मांडले संतोष कुलकर्णी, माधव जाधव, शेख फारुख, ए.जी. कुरेशी, धम्मपाल गावंडे,संदेश जाधव, मुकरराम फारुखी, गंगाधर सोनकांबळे, शेख सलीम, मजीद सर, संतोष पाटील, शेख एरशाद, हजप्पा पाटील, अझर कुरेशी, आदी उपस्थित होते.
यामध्ये निवेदनाद्वारे संबंधित कायद्याचा निषेध करण्यात आला.सर्वधमीॅय आणि सर्व पक्षाच्या वतीने नागरिकता संशोधन विधेयक (कॅब)-२०१९ जातीय सलोख्यामध्ये तेढ निर्माण करणारे असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो. हे विधेयक भारतीय नागरिकता सिद्ध करण्यासाठी धर्माच्या नावावर कायदेशीररित्या आधार बनवत आहे. हे विधेयक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या अल्पसंख्याकांना भारतामध्ये आश्रय देत आहे आणि याचा उद्देश धर्माचा आधार घेऊन भेदभाव निर्माण करण्याचा आहे आणि विविध धर्मियांमध्ये यामुळे दरी निर्माण करीत आहेत. अशा प्रकारचे हे विधेयक भारताच्या अखंडता व एकतेला आघात पोहोचवत आहे,' असे म्हणणे यात मांडण्यात आले आहे. 'भारत देश सर्व जातीधर्माच्या लोकांना समान दर्जा प्राप्त करून देतो, भारतीय नागरिकता मिळण्यासाठी धर्माची अट ठेवण्यातून इतिहासाला तडा दिला जात आहे व भारतीय घटनेच्या मूळ रचनेच्याविरुद्ध आहे,' असेही स्पष्ट केले गेले आहे. हा अन्याय रोखावा अशी विनंतीही यात करण्यात आली आहे.







0 comments:
Post a Comment