बिलोली (ता.प्रतिनिधी)
राजषीॅ शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लोहगाव च्या वतीने दिलिप पाटील पांढरे यांच्या कार्यालयात जितेशभाऊ अंतापुरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
वाढदिवस म्हटला की खर्च आलाच. मित्रांना पार्टी देणं, मोठमोठे समारंभ, जेवणावळी यावर मोठया प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन ""राजषीॅ शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे""च्या माध्यमातून लोहगाव येथील अनुसूचित जाती जमाती चे विद्यालयात मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आला आश्रम शाळेतील बालकांसमवेत वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला.
या मध्ये जितेश अंतापुरकर हे म्हणाले की या शाळेसाठी जे काही देता येईल ते आम्ही देउ या शाळेसाठी काहीही कमी पडु देणार नाही असेही जितेश अंतापुरकर यांनी सांगितले. या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते दिलिप पाटील पांढरे, प्रल्हाद वानोळे, गजानन लघूळे ,हणमत पा पांढरे, अनिल गोस्वामी, उतम वानोळे, ग्रीरीस चाडकर, शिवप्रसाद स्वामी, मनोज राजूरकर,गोविंद मुदगुरे यांच्या सह मोठ्या प्रमाणात शाळेतील शिक्षक विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते







0 comments:
Post a Comment