बिलोली - तालक्यातील मौ .पाचपिंपळी येथे गेल्या बारा वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षी दि . २३ डिसेंबर रोजी कै.गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे २२० नाव नोदणी झाली त्यामधील ४४ वयोवृद्धाचे शस्त्रक्रिया होणार आहे . व्हिजन फाउंडेशन इंडिया उदयगिरी लॉयन्स नेञ रुग्णालय उदगीर व श्री साई शिक्षण संस्था पाचपिंपळी यांच्या संयुक्त विद्यमानाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून कै . गंगाबाई रावसाहेब पाटील पाचपिंपळी यांच्या पुण्यतिथी निमित्त गेल्या बारा वर्षापासून सदर शिबिराचे आयोजन करण्यात येत असून , तालुक्यातील व परिसरातील हजारो गोरगरीब या शिबिराचा लाभ घेतात .दि . २३ डिसेंबर २०१९ रोजी गंगाबाई पाटील नर्सिंग स्कूल पाचपिंपळी येथे पार पडला. शिबिराचा आयोजन श्री साई शिक्षण संस्थेचे सचिव तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रा . शिवाजी पाटील पाचपिंपळीकर व उपसरपंच कमलकिशोर पाटील पाचपिंपळीकर _ _ यांनी केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, (पं.स.सदस्य)शंकर यंकम, हानमंत इंगळे,दिलिप पा.पांढरे,हाज्जपा पाटील,पांडुरंग पाटील रामपुरे सर,अविनाश पा पत्के,तिरूपती हिवराळे प्रविण पाटील,बाबुराव इंगळे,डॉ.शंकरराव पाटील,अशोक पा.जाधव,विठ्ठल पा.धुप्पेकर, आनंदराव पा. डॉ.ठाकुर साहेब,डॉ.विलास,पांचाळ सर,पवार सर,शिंदे सर,सय्यद सर, वानखेडे सर,केशव रानवळकर व शिक्षक, विद्यार्थी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
23 December 2019
Home »
बिलोली
» कै.गंगाबाई रावसाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचपिंपळी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर








0 comments:
Post a Comment