जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 June 2020

नांदेड शहरात दहा तर मुक्रमाबादमध्ये दोन रुग्णांची वाढ

नांदेड– मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 25 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 12 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दहा रुग्ण हे नांदेड शहरातील तर दोन रुग्ण हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 387 झाली आहे.
कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बाफ ना भागातील 28 वर्षीय पुरुष, आंबेडकरमधील नगरमधील पाच वर्षांची चिमुकलीसह 33 वर्षीय पुरुष, असर्जन परिसरातील 10, 11, 37 महिला व 42 वर्षीय पुरुष, विनायक नगरमधील 34 वर्षीय महिला, वसंतनगर धमील 52 वर्षीय पुरुष तसेच मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 20 वर्षीय पुरुष व 38 महिलेचा समावेश आहे.आजच्या आलेल्या अहवालामध्ये सहा महिला व सहा पुरुषांचा समावेश असून यात 5, 10 व 11 वर्षीय मुलींचा समावेश आहे. यातील बहुतांशी रुग्ण हे जुन्या संपर्कातून बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 387 झाली आहे.

1 जुलै रोजी बांबळी बंधा - याचे दार उघडत असल्याने बंधारा खालील गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

धर्माबाद:तालुक्यातील बाबळी बंधा - याचे  मा . सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार बाभळी उच्च पातळी बंधारा ता . धर्माबाद या बंधा - याचे सर्व दरवाजे दि . 01/07/2020 रोजी उघडणे बंधनकारक आहे . त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार बंधा - याचे दार उघडण्याच्या अनुषंगाने दि . 01/07/2020 रोजी बंधा - यातील पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येणार आहे . तरी गोदावरी नदीच्या पात्रात बंधा - याचे खालील बाजूस कोणतीही व्यक्ती , जनावरे वा इतर कोणतेही साहित्य राहणार नाही . याबाबत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इशारा देण्यासाठी प्रशासनिक स्तरावरून कार्यवाही व्हावी असे संदीय पत्र प्राप्त झाले आहे . त्या अनुषंगाने आपल्या सज्जीतील कार्यक्षेत्रांतर्गत बाधित होणा - या सर्व गावात सूरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व गावक - याना दवंडी पिटवून सावधानतेचा इशारा देण्यात आले आहे .तरी गावकऱ्यांांना जाऊ नये व आपल्याला काही जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी .

29 June 2020

जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल डिझेल च्या दर वाडीमुळे केंद्र शासनाविरुध्द ठिय्या आंदोलन

नांदेड | लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ करून देशाच्या जनतेचा खिसा रिकामा करणाऱ्या केंद्र शासनाविरुध्द आज कॉग्रेस पक्षाने ठिय्या आंदोलन करून या बाबतचे निविदेन जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना दिले आहे . या आंदोलनाचे नेतृत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले .मागील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल या इंधनांच्या किंमतीत सतत वाढ होत आहे . या विरोधात आज देशभर कॉग्रेसने सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष ठिय्या आंदोलन केले . यातील एक भाग नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष ठिय्या आंदोलनाच्या रुपात घडला . या आंदोलनाचे नेतृत्व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले . मागील चार महिन्यापासून जनतेला त्रास सरू आहे . एकीकडे कोरोना विषाणुच्या धास्तीने जगणाऱ्या जनतेच्या खिशातून अतिरिक्त पैसे काढण्याचा बेत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करून केला आहे . कोरोना काळात जनतेच्या नोकऱ्या गेल्या , काम धंदा बंद झाला . उत्पन्न नाही आणि अशा वेळी अनावश्यक दर वाढ करून केंद्र शासन जनतेला छळत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले . या ठिय्या आंदोलनामध्ये आ.अमर राजूरकर , माजी मंत्री डी.पी.सावंत , जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर , दिलीपा पाटील बेटमोगरेकरे , अमित तेहरा , विजय येवनकर , संजय देशमुख , लहानकर , प्रफुल्ल सावंत , सुभाष रायबोळे यांच्यासह असंख्य कॉग्रेस कार्यकर्ते , महिला पुरूष सहभागी झाले . यानंतर आपल्या आंदोलनाच्या संदर्भाचे निवेदन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांना दिले . 

28 June 2020

सूर्यग्रहनाच्या अवघ्या काही दिवसानंतर सूर्याच्या सभोवताली दिसू लागले कंगण

नांदेड | मागील काही दिवसापूर्वी झालेल्या सूर्यग्रहणानंतर शनिवारी आणि रविवारी सकाळी 11 वाजून ते 12 च्या दरम्यान सूर्याभोवती कंगण निर्माण झाल्याचे अनेकांनी अनुभवले आहे . जसजसा वेळ जात होता तसतसे कंगण मोठे होऊन लुप्त होऊन गेले . दरम्यान रविवारी कंगण असलेल्या मध्यभागी एक निळ्या रंगाचा गृह फिरताना पाहावयास मिळाला आहे . हा योगायोग मागील 5 वर्षांपूर्वी दिसून आला होता असे जुने जाणकार सांगतात . या संदर्भात प्रसाद शिंदे यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीपासून सुमारे 9 किलोमीटर उंचीवर कमी घनतेच्या विरळ ढगांमध्ये थंड वातावरणामुळे झालेल्या स्फटिक तयार होतात . त्यावरून सूर्याचे किरण परावर्तित होतात आणि पाहणाऱ्याच्या नजरेशी त्याचा 22 अंशाचा कोन तयार होऊन तेजोवलय दिसू लागते.याला शास्त्रीय परिभाषेत HALO म्हणतात . पावसाळी दिवसांत सहसा हे तेजोवलय दिसते . मात्र , सूर्याला खळं पडल्यास दुष्काळ पडतो , अशी ग्रामीण भागात वदंता असते . यात काही प्रमाणात तथ्य असल्याचंही त्यांनी सांगितलं .पावसाचे ढग हे पृथ्वीपासून साधारण 200 ते 300 मीटर उंचीवर असतात . मात्र तेजोवलय परावर्तित होते , तेव्हा ते ढग अतिशय विरळ आणि सुमारे 8 ते 9 किलोमिटर उंचीवर असतात . आतापर्यंतच्या निरीक्षणांनुसार असे विरळ ढग असतील , तर ते कमी पावसाचे संकेत समजले जातात . एकूणच आजचे दृश्य पाहून अनेकांनी निसर्गाची किमया न्यारी असल्याचे सांगून , ग्रामीण भागात याला सूर्याने खळ केलंय असं म्हणत असल्याचे सांगीतले . ( सूर्याभोवताली झालेल्या कंगण बाबत आणखी काही वेगळे महत्व असू शकते )

बिलोली येथे दैनिक लोकमंच क्रांती या विशेष अंकाचे प्रकाशन

बिलोली :येथिल शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 28 जुन रोजी दैनिक लोकमंच क्रांती वर्धापनदिनानिमित्त विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर,य भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष इंद्रजित तुडमे,पत्रकार राजु पाटील, उपसभापती पत्रकार शेख फारुख, पत्रकार सय्यद रियाज पत्रकार मुंकिदर कुडके यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.यावेळी जेष्ट पत्रकार मुंडकर,व जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी लोकमंच क्रांती दैनिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार मुंकिदर कुडके यांनी सुत्रसंचालन केले व प्रास्ताविक व आभार जिल्हा प्रतिनिधी नागोराव कुडके यांनी मांडले.

गोदावरी नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या ; २४ तासानंतर प्रेत सापडले

धर्माबाद | येथील फुलेनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या शेख वसीम या विद्यार्थ्याने बाभळी बंधाऱ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली . त्याचे शव 24 तासानंतर शोधण्यात यश मिळाले आहे . या घटनेमुळे धर्माबाद परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , शेख वसीम शेख मोईन वय वर्षे २४ हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नांदेड येथे रहात होता . लॉकडाउनच्या काळामध्ये तो गावाकडे आला होता . तो अभ्यास करण्यासाठी दररोज आपली मोटार सायकल घेऊन बंधारा परिसरात जात असे त्याच्या भावाने सांगितले . दिनांक २६ जून रोजी सकाळी १२ वाजता नेहमीप्रमाणे तो बाभळी बंधारावर गेला . चौकीदाराने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु , तो विद्यार्थी दररोज अभ्यासाला येतो व बसून अभ्यास करून परत जातो म्हणून चौकीदाराने याकडे फारसे लक्ष दिले नाही . शेख वसिम याने बाभळी बंधायाच्या मधोमध जाऊन आपली टोपी , चष्मा , मोटार सायकलची चावीवर ठेवून आपल्या भावाला फोन करून सांगितले की , बाभळी बंधायावर येऊन मोटर सायकल , माझा मोबाईल , चष्मा घेऊन जावे मी नदीमध्ये उडी मारीत आहे असे सांगून त्याने नदीमध्ये उडी घेतली . ही घटना कळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड , पो.हे. कॉ . नागुलवार यांनी मच्छीमारांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली . परंतु युवकाचे प्रेत मिळाले नाही . दिनांक २७ रोजी दुपारी मयताचे प्रेत तरंगत वर आल्यामुळे मयतास बाहेर काढण्यात आले . त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मयताचे शव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे . 

देगलूर तालुक्यातील बळेगाव येथील 21 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड:-रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास 46 नमुन्याचा अहवाल आला असून यात सोळा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात नऊ जण हे नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत.

शनिवार दि.27 जून रोजी सायंकाळपर्यंत अहवाल प्रलंबित होते.मात्र आठ वाजून 40 मिनिटांनी प्रशासनाकडून अहवाल कळविण्यात आला आहे. यामध्ये 46 नमुन्यामध्ये 18 अहवाल निगेटिव्ह,10 अहवाल अनिर्णित,2 अहवाल नाकारण्यात आले,तर 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात 16 पैकी 9 अहवाल एकट्या विष्णुपुरी येथील एकाच बड्या राजकीय कुटूंबातील सदस्याचा समावेश आहे. यामध्ये सहा महिला व तीन पुरुषाचा समावेश आहे.

नऊ जणांमध्ये 5 वर्षाची मुलगी,6 वर्षांचा मुलाच समावेश आहे. तर 19 व 35 वर्षीय पुरुष, तसेच 29,45,57 व 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त गवळीपुरा येथील 41 वर्षीय, चैतन्य नगर येथील 48 वर्षीय पुरुष, पिरबुऱ्हाण नगरमधील 4 वर्षीय बालक, सिडको भागातील तीन पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये मुभा मशीद येथील 43 वर्षीय महिला व 24 तसेच 50 वर्षीय पुरुष आहे.तसेच देगलूर तालुक्यातील बळेगाव येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 365 झाली आहे.

27 June 2020

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह !

नांदेड : माजी महापौर व त्यांच्या चिरंजीवांच्या संपर्कात आलेले नांदेडचे एक काँग्रेस आमदार कोरोनाने बाधित झाल्याचे वृत्त पुढे आले आहे . नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाने पूर्णतः बरे होऊन शुक्रवारी नांदेडला परतले . त्यानंतर काँग्रेस आमदारच कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समजल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . प्रथमच निवडून आलेले हे आमदार आहेत . माजी महापौर व त्यांच्या चिरंजीवाच्या संपर्कात आले असल्याने रविवारपासून ते क्वारंटाईनमध्ये होते . शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रात्री नऊ वाजता त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेतली . त्यावेळी शंका आल्याने त्यांनी आपल्या लाळेचे नमुनेही दिले . मध्यरात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . हे आमदार आपल्या मतदारसंघात कोरोना उपाययोजना कामातही खूप मेहनत घेत होते . त्यांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे .

24 June 2020

बिलोली येथील बड़ी मस्जिद समोरील सी.सी.रस्ता नुतनीकरण करण्यासाठी निवेदन

बिलोली: शहरातील ऐतिहासिक बडी मस्जिदला जाणाऱ्या रस्ता हा खराब झाला असून विशेष रस्ता अनुदानातुन या रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे निवेदन नगर परिषदेचे  मुख्याधिकारी यांना देण्यात आले.बिलोली शहरातील ऐतिहासिक बडी मस्जिद (जामा मस्जिद )ला जाणाऱ्या भारत हार्डवेयर ते बडी मस्जिद समोर ते गांधी चौक पर्यतचा रस्त्याचे अत्यंत दुर्दशा झाली असून मस्जिद ला ये जा करणाऱ्या नागरिकांना फार त्रास होत असून या रस्त्याचे विशेष अनुदानातुन या रस्त्याचे नुतीकरन करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन नगर सेवक अनुप अंकुशकर, नगरसेविका सौ.शशिकला खांडेकर,नगरसेवक मिर्झा शाहेद बेग ईनामदार,माजी अध्यक्ष न.प.विजय कुंचनवार, मौलाना अहमद बेग ईनामदार,मुतवली मिर्झा अजीज बेग ईनामदार,शौकत बेग ईनामदार,शेख फारुख अहमद,शेख चाँद भाई,डॉ.केंचे, मुज्जु बेग ईनामदार,संतोष शेकापुरे,नबाजी वाघेकर,बाबुराव गिरी,संतोष पाटील,मैनुद्दीन क़ुरैशी,शेख घुडू, शेख वाजीद, सयाजी वाघेकर,अब्दुल वाजीद अब्दुल मन्नान ,सय्यद मकसूद देसाई व  नगरसेवक व या परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदनद्वारे करण्यात आले

या भागातील दोन कोरोनाचे रुग्ण वाढले

नांदेड:- बुधवारी सकाळी 41 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 37 निगेटिव्ह,दोन अहवाल अनिर्णित तर दोन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 323 इतकी झाली आहे.आज आलेल्या नमुन्यातील 2 रुग्ण हे देगलूर नाका व गुलजार बागेतील असून दोघांचे वय हे 67 इतके आहे. मनपा प्रशासनाने माजी महापौर व नगरसेवक पुत्राच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे अहवाल घेण्यात आले, असून या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे.मंगळवारी सुद्धा चार जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते,यात एक डॉक्टरचा समावेश आहे. तर सात रुग्ण बरे झाले होते.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या 323,बरे झालेले रुग्ण 245,उपचार घेत असलेले 64 तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रेमीयुगलांनी संपविली जीवनयात्रा

बिलोली :तालुक्यातील केरूर येथील विवाहित तरूणी आणि किनाळा येथील तरूणाने देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रामध्ये उडी घेऊन जीवयात्रा संपविली.ही घटना मंगळवार दि. 23 जून रोजी घडली.मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित भाग्यश्री पिराजी चिमणापुरे (वय.19 वर्षे.) हिचे विवाहपूर्व संबंध किनाळा येथील तरूण प्रविण त्र्यंबक कौठकर (वय.21 वर्षे) याच्याशी होते. मागच्या महिन्यात या विवाहितेचा विवाह धर्माबाद तालुक्यातील चोंडी येथील तरूणासोबत झाला होता. सदरच्या विवाह त्या विवाहितेचा विरोध होता.मयत विवाहित भाग्यश्री व तिचा प्रियकर प्रवीण याने पलायन करून देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रात एकमेकांना ड्रेसच्या ओढणीने घट्ट बांधून दुपारी एक वाजेच्या सुमारास नदीपात्रामध्ये उडी मारली.या घटनेची माहिती होताच नदीपात्रा भोवती लोकांनी गर्दी केली होती.इच्छेविरुद्ध हा विवाह करण्यात आल्याने मयत भाग्यश्री सासर येथून माहेरी जाते म्हणून दि.22जून च्या मध्यरात्री घरातून निघून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले.आपण एकमेकांपासून दुरावलो, अशी भावना मनात त्यांच्या निर्माण झाली. त्यामुळे दि.23 जून रोजी नदी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली.
मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.मयत मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मूत्युची नोंद करण्यात आली.

23 June 2020

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आंतराज्य टोळीस वनविभागाने केले जेरबंद

बिलोली| खवल्या मांजराची तस्करी करणार्या सात जणांना वनविभागाच्या पथकाने बिलोली येथे देशमुख नगर भागातील एका घरात छापा मारुन दोन वर्ष वयाचे मादी जातीचे खवल्या मांजर व त्याचे सहा महिण्याचे पिल्लु वनविभागाने जप्त केले . शेजारील राज्यातुन तस्करीच्या उद्देशाने बाळगलेले दोन खवल्या मांजर वनविभागाच्या पथकाने मोट्या शिताफीने आंतराज्य टोळीला मंगळवार रोजी देशमुख नगर भागात पकडले.वण्य प्राण्यामधील अनुसूची क्र.एक मध्ये गणल्या जात असलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराची शेजारील राज्यातुन तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली मिळालेल्या माहितीवरुन उपवन संरक्षण अधिकारी आशिष ठाकरे व सहाय्यक वन संरक्षण अधिकारी डी.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खवल्या मांजराची तस्करी करणार्या सात जणांना देशमुख नगर भागातील एका घरात पकडले ज्यात गुन्हेगार रविंद्र संतोष स्वामी , रतन भिवाजी हनवते , सुनिल साहेबराव वायकोळे , फकीर महेबुब शेख , तोहित पाशा शेख इस्माईल , तकीयोद्दीन खैरोद्दीन खतीब , मुजीगोद्दीन खैरोद्दीन खतीब आशी सात आरोपींची नावे आहेत .या सातही आरोपी यांच्यावर वन्यजिव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ चे कलम ५,१६ अ.ब.क.कलम ९ , ३ ९ , ४४ व कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भातील कार्यवाही परिमंडळ बिलोली यांच्या कार्यालयात करण्यात आली असुन वरील सात आरोपी वनपाल बिलोली यांच्या ताब्यात आहेत .

अल्पवयीन बालीकेवर रात्रभर अत्याचार

नायगाव | कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन बालीकेवर ऊसाच्या शेतात रात्रभर अनेकदा अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे . कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे . नायगांव तालुक्यातील एका गावातील राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे ( 22 ) या युवकाने 21 जूनच्या रात्री 1 वाजता अल्पवयीन 14 वर्षाच्या बालीकेला पळवून नेले . मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे सांगत तीच्यावर रात्रभर ऊसाच्या शेतात अत्याचार केला . तीला 22 जून 2020 रोजी सकाळी 5 वाजता सोडले.तीने घडलेली हकीकत आपल्या पालकांना सांगीतली . त्यानंतर कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली . कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 108/2020 कलम भारतीय दंड विधानातील कलमे 363,366 ( अ ) , 376 ( 3 ) आणि पोक्सो कायदा कलम 4 आणि 6 नूसार दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक दिनेश येवले यांच्याकडे देण्यात आला आहे . त्यांना पोलीस हवालदार अशोक दामोदर आणि पोलीस शिपाई साई सांगवीकर मदत करीत आहेत .सुत्रांकडून प्राप्त माहितीनूसार अल्पवयीन बालीकेवर रात्रभर अन्याय करणारा गुन्हेगार राजू उर्फ छोटू धोंडीबा उर्फ पांडूरंग भदरगे ( 22 ) यास ताब्यात घेतले आहे . आजच नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्या एका युवकाला 10 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली आहे .

महान सुफी संत हजरत खाजा मोईनोदीन चिश्ती ( रह.) विरुध्द अपशब्द वापरुन बदनामी करणार्या टि. व्ही. अन्कर अमिश देवगन विरुध्द कारवाई ची मागणी.

बिलोली:-महान सुफी संत व मुस्लीम धर्मगुरु  हजरत खाजा मोईनोदीन चिश्ती (रह.) यांचे विषयी न्युज ईन्डीया 18 टि. व्ही. चेनल चे अन्कर अमिश देवगण यानी अपशब्द बोलुन मुस्लीम धर्माच्या भावना दुखवल्या प्रकरणी बिलोली येथील मुस्लीम समाजा तर्फे कडक कारवाई करण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे.
 **दि.१५ जुन रोजी सांयकाळी ७-३० वाजता न्युज इन्डीया वृत्त वाहिनीवर अमिश देवगण नावाचे अन्कर डिबेट घेत असताना सुप्रसिध्द अजमेर दर्गा चे खाजा मोईनोदिन चिश्ती बध्धल खालील प्रकारचे अपशब्द वापरुन मुस्लीम समाजाचे भावना दुखावल्या आहेत."अक्रान्ता चिश्ती आया ,लुटेरा चिश्ती आया. इसके बाद धर्म बदले. असे शब्द वारंवार वापरुन अपमान करण्यात आला. हजरत खाजा हे जगप्रसिध्द धर्मगुरु आहेत.आज ही भारतात   करोडो  हिन्दु- मुस्लीम बांधव त्याचें अनुनायी आहेत. एवढेच नव्हे तर देशाचे पंतप्रधान कार्यालयातुन अजमेर दर्गाला फुलांची चादर दरवर्षी पाठवली जाते. लाकडाउन च्या काळात महान सुफी संताची बदनामी करुन  समाजात तेढ निर्माण  करण्याचा मुध्धाम कट कारस्थान केले आहे. अन्कर देवगण च्या कुटील कारस्थाना चा सर्व थरातुन निषेध होत असुन.बेअकली अॅन्कर अमिश देवगण जाणुन बुजुन टिप्पणी केले आसुन त्वरीत अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बिलोली येथील अल्पसंख्याक सेल चे तालुका अध्यक्ष शेख सुलेमान सेठ, नगरसेवक जावेद कुरेशी,  समतादुत ईर्षाद मौलाना ,एकबाल ईनामदार, आ.रहीम कुरेशी ,संदिप कटारे,  मुखीद कुरेशी, बाबा कुरेशी ,रशीद आ. खादर कुरेशी  यानी आपल्या स्वाक्षरीने तहसिलदार विक्रम राजपूत, पोलीस निरिक्षक व उपविभागीय अधिकारी याना निवेदन दिले. 

22 June 2020

कोरोना ब्रेकिंग; बारा नवे;एकोणीस बरे

नांदेड:- नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.22 जून रोजी 19 रुग्ण बरे झाले,तर नव्याने बारा रुग्णांची भर पडली. यामध्ये रविवारी रात्री आलेल्या चार रुग्णांचा समावेश आहे. प्रत्यक्षात सोमवारी 8 रुग्ण आढळले आहेत.आज उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांमुले आकडा ही घटला आहे.मागच्या काही दिवसांमध्ये एकेरी संख्येत वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्यने आज दुहेरी आकडा गाठला असून एकाच दिवशी 12 रुग्णांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 317 झाली आहे.आज घेतलेल्या 59 अहवालापैकी 45 अहवाल निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 10 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.

पुरुषामध्ये शहरातील गाडीपुरा येथील 40 वर्षीय, रहेमत नगर 22,बिलाल नगर येथील 57 व 37,पिरबुऱ्हाण नगर येथील 26,29 व 31,भगतसिंग नगर 58, पिपळगाव ता.नांदेड येथील 18,38, तर महिलांमध्ये चिखळभोसी 54 व रिसनगाव येथील 19 मुलीचा समावेश आहे.
——
कोरोना रुग्ण संख्या-317
कोरोना मुक्त रुग्ण-238
उपचारार्थ रुग्ण-65
मृत्यू झालेले रुग्ण-14

21 June 2020

माजी महापौर,नगरसेवकसह अन्य दोघे कोरोना पॉझिटिव्ह

नांदेड- दिवसभराच्या काळात कोरोनाने विश्रांती दिल्यानंतर रात्री आठ वाजता 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक माजी महापौर व नगरसेवकाचा समावेश आहे.सायंकाळी पाच वाजेपर्यंत 35 अहवाल तपासण्यात आले. तर रात्री 14 अहवाल आले आहेत. यामध्ये 09 अहवाल निगेटिव्ह आले.एक अहवाल अनिर्णित आले तर 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.चार जणांमध्ये सर्वांच्या सर्व जण हे पुरुष आहेत. धोबी गल्ली एक,रहेमत नगर एक व बिलाल नगर येथील दोघा जणांचा समावेश आहे.बिलाल नगर येथील जे दोन रुग्ण आढळले आहेत.यामध्ये माजी महापौर व त्यांच्या कुटूंबातील एका नगरसेवकाचा समावेश आहे. माजी महापौर असलेले 57 वर्षीय व्यक्ती ही अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या सभागृहात सदस्य राहिली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 308 झाली आहे.

योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा - जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर

 - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून प्रशासनाने दिला योगाभ्यासाचा कृतीशील मंत्र नांदेड दि . 21 : - पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्येची भारताने संपूर्ण जगाला अनमोल देणगी दिली आहे . सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासासारखे सहज सोप्या पद्धतीने व कोणताही खर्च न लागणारे असे प्रभावी माध्यम प्रत्येकाजवळ उपलब्ध आहे . कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाची जीवनशैली प्रत्येकाच्या अंगी रुजल्यास आपल्याला अधिक सुरक्षित होता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी व्यक्त केला . आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी शासनाच्या निर्देशाचे पालन करीत जिल्हाधिकारी प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन हा संदेश घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला . हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाच्या https : [ /www.facebook.com/dionanded/ YT 145ch पेजवरुन लाईव्ह करण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत जागतिक योग दिवसाचा कृतिशील संदेश पोहोचविणे शासकीय झाले . आंतरराष्ट्रीय योगासन साधक श्रेयस मार्कंडेय व डॉ शर्मीली पाटील यांनी योगाभ्यासाचा सराव घेतला . यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ . यशवंत पाटील ,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ , जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ . शरद मंडलिक हे सुरक्षित या त्राचे नियम पालन करीत सहभागी झाले . योग ही जीवनशैली असून ती प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे अशी अपेक्षाही डॉ विपीन यांनी व्यक्त केली . निरोगी आयुष्यासाठी शारीरिक , मानसिक आणि अध्यात्मिक एकात्मता तेवढीच आवश्यक असते . या तीन सुत्रांना योगाभ्यासाद्वारे स्वत : च्या मनावर ताबा मिळविता येणे शक्य होते . शारीरिक स्वास्थाबरोबर मनस्वास्थही अधिक महत्वाचे असून योगाभ्यासाद्वारे हे सहज साध्य होते , असेही डॉ . विपीन यांनी सांगितले . यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ . यशवंत पाटील यांनी योगाचे महत्व विशद केले .

20 June 2020

दुपारपर्यंत दोन सापडले एक दगावला

नांदेड- दुपारपर्यंत 76 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला आहे. यामध्ये दिवसभराच्या काळात तीन रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आले आहेत. यातील पीरबुर्‍हाण नगर भागात राहणार्‍या एका कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी आठरा नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला आहे. यामध्ये सतरा नमूने निगेटीव्ह आले तर एक अहवाल त्या रुग्णांचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटीव्ह आला आह. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे. तर दुपारी प्राप्त झालेल्या 58 अहवालांपैकी 45 अहवाल निगेटीव्ह, 11 अहवाल अनिर्णीत ठेवण्यात आले तर 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रहमत नगर येथील 48 वर्षीय इसम व भगतसिंग रोडवरील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेच्या कुटुंबातील एक सदस्य यापूर्वीच पॉझिटीव्ह आला होता.तर रहमतनगर येथील एक पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा भांडे व्यापारी आहे.

19 June 2020

आनंदाची बातमी | नांदेडात सहा महिन्याचा चिमुकला झाला कोरोनामुक्त .. !

दिवसभरात 5 ची सुट्टी , एकाची भर . 6 रुग्ण संदर्भित . # नांदेड दि 19। नांदेडकरांसाठी 19 जून शुक्रवार हा दिवस थोडासा आनंदायी ठरला आहे , कारण आज " एका सहा महिन्याच्या चुकल्याने " कोरोनावर मात केली आहे . गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये रुग्णांचे वाढते आकडे पाहता नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते , पण आजच्या दिवशी एका सहा महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर यशस्वी मात करून नांदेड करांसाठी जणू काय गुड न्यूजच दिली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मध्ये सध्या तरी दिलासादायक वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे . शुक्रवार दिनांक 19 जून 2020 रोजी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार घेत असलेला 6 महिन्याचा बालक बरा झाल्यामुळे व तसेच डॉ . पंजाब भाव कोविड केअर सेंटर नांदेड येथील 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे . त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतचा रुग्णांची संख्या 186 एवढी झाली आहे . व तसेच शुक्रवार 19 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 48 पैकी 47 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले , व एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 297 एवढी झाली आहे . सदरील रुग्ण हा पुरुष असून त्याचे वय वर्षे 28 आहे . व तो नांदेड शहरातीलच सुंदर नगर या भागातील आहे . आतापर्यंत 297 रुग्णांपैकी 186 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे . उर्वरित 98 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे . या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत . तर 6 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे . 

आज होणार्‍या दलितवस्तीच्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष

नांदेड- जिल्हा परिषदेच्या दलितवस्ती विकास निधीच्या वाटपासंदर्भात अनियमितता झाल्याचा ठपका भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. पुनम पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली, असून या याचिकेवर शुक्रवार दि.19 जून रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, काही अधिकारी व सदस्यांसह कंत्राटदार व सरपंचाचे लक्ष लागले आहे.कोरोनाच्या महामारीचा जिल्हा सामना करता असताना जिल्हापरिषदेत पदाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची दलितवस्तीचे आदेश काढण्याबाबत लगीन घाई सुरु होती. आदेश काढताना यापूर्वी विना ठराव क्रमांकाचा कार्यरंभ आदेश काढण्यात आले. मात्र बोबाटा उडाल्यानंतर अधिकार्‍यांनी सुधारणा केली.

आदेश देताना नियमांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला गेला. नियमात बसत नसताना वाढीव दहा टक्के निधीचे आदेश काढले गेले. अनेक बाबींच्या बाबतीत पुनम पवार यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली होती. यावर दि.16 जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु जिल्हापरिषदेचे प्रकरण पुढे आले नव्हते. तारीख वाढवून मिळाली होती. या प्रकरणी शुक्रवार दि. 19 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते, याकडे सगळयांचे लक्ष असणार आहे.

18 June 2020

बिलोलीत बॅकेचा अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

बिलोली : बिलोली येथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला . एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा अहवाल १६ जून रोजी पॉझिटिव्ह आला . सदर शाखा व्यवस्थापक नांदेडहून अप - डाऊन करीत होते . श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना शुक्रवारी नांदेडच्या कोरोना सेंटरमध्ये क्चारंटाईन करण्यात आले होते . नांदेड शहरातील विशालनगरात ते राहतात . त्यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला . त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असून , त्यांची प्रकृती ठणठणीत आहे . गेल्या आठवड्यापासून शाखा व्यवस्थापक बिलोलीवासियांच्या संपर्कात न आल्याने घाबरण्याची गरज नाही , मात्र | काळजी घ्या , असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ . नागेश लखमावार , | नायब तहसीलदार डॉ . ओमप्रकाश गोंड , मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी केले .शाखेतर्गत असलेल्या अंजणी , बामणी , हिंगणी , दर्यापूर , बडूर , | पोखर्णी , चिंचाळा या गावांतील शेकडो खातेदार संपर्कात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे . १७ | जून रोजी सदर बँक उघडलीच नाही . नगरपरिषदेकडून ' त्या ' परिसरात निर्जतुकीकरण करुन ते क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले . पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यावरुन बँकेतील शाखा व्यवस्थापक , लिपीक व २ सेवकांना बिलोलीच्या कोविड सेंटरमध्ये विलगिकरणमध्ये ठेवून त्यांचा स्वब वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली . यापूर्वी केरूरचा पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह आल्याने बिलोली तालुका कोरोनामुक्त झाला होता ; पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही .

जिल्‍हा वासियांसाठी लवकरच आणखी एका अद्ययावत रुग्‍णालयाची सुविधा- पालकमंत्री अशोक चव्हाण

व्हिडीओ कॉन्‍फरन्सिगद्वारे पालकमंत्र्यांनी घेतला उपाययोजनांचा आढावा
नांदेड,  :- आजच्‍या घडीला जिल्‍ह्यातील कोवीड -19 संदर्भातील परिस्थिती आटोक्‍यात जरी असली तरी शासन पातळीवर भविष्‍यातील स्थितीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यादृष्टिने जिल्‍हा पातळीवर शक्‍य त्‍या उपाययोजना करण्‍याचे निर्देश जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्‍हाण यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले. जिल्‍ह्यातील सर्व विभागांच्‍या नियोजन व पुढील कामांच्‍या दिशासंदर्भात आज व्हिडीओ कॉन्‍फरन्‍सद्वारे बैठक आयोजित करण्‍यात आली होती.जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या या बैठकीस जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेड महापालिकेचे आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने, जिल्‍हा परिषदेचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा उपनिबंधक सुधीर फडणीस, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. चंद्रकांत मस्‍के,  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर व इतर विभागांचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.कोविड -19 बाधितांवर उपचार होण्‍यासाठी खाजगी रुग्‍णालयांचा शासनाने विचार करुन काही निर्देश दिले होते. जिल्‍हा व तालुका पातळीवर असलेले हे खाजगी रुग्‍णालय आकाराने लहान असल्‍यामुळे अशा ठिकाणी कोविड- 19 बाधित व्‍यक्‍तींना उपचारासाठी ठेवणे अधिक आव्‍हानात्‍मक होईल, असे पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी स्‍पष्‍ट केले. लहान रुग्‍णालयांना यात समाविष्‍ठ करण्‍याऐवजी एखाद्या मोठ्या जागेवर मोठ्या स्‍वरुपाचे उपचार केंद्र निर्माण केले आणि त्‍याठिकाणी खाजगी वैद्यकीय तज्‍ज्ञांना गरजेनुरुप जर उपचार देण्‍यासाठी निमंत्रित केले तर हे सर्वार्थाने योग्‍य ठरेल, असे निर्देश त्‍यांनी देवून याबाबत जिल्‍हा पातळीवर नियोजन करण्‍याचे सांगितले.
नांदेड जिल्‍ह्यात डॉ. शंकरराव चव्‍हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 रुग्‍णांच्‍या उपचाराची सुविधा तर जिल्‍हा रुग्‍णालयात 50 रुग्‍णांची सुविधा उपलब्ध आहे. यात आणखी 100 बाधितांची सोय होवू शकेल अशी अतिरिक्‍त  तयारी करण्‍यात आली आहे. एनआरआय कोविड सेंटर येथे 300 बाधितांच्‍या उपचाराची तर पंजाब भवन येथे 100 बाधितांच्‍या उपचाराची सर्व ती तयारी जिल्‍हा प्रशासनातर्फे केली असल्‍याची माहिती त्‍यांना देण्‍यात आली.जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या परिसरात एक चांगले रुग्‍णालय जिल्‍हा वासियांसाठी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशिल होतो. कोविड-19 च्‍या लॉकडाऊन काळात मागील तीन महिन्‍यात हे काम युध्‍द पातळीवर केल्‍याने लवकरच या नव्‍या रुग्‍णालयाची जिल्‍ह्यात भर पडत असल्‍याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
 जिल्‍ह्यात दाखल झालेला मान्‍सून, पेरणीच्‍या प्रक्रिया, ग्रामीण भागातील दरवर्षी निर्माण होणारे साथीचे आजार, अतिवृष्‍टी झाली तर धोकादायक स्थितीत अडकणारी गावे, अपघात प्रवण रस्‍त्‍यावरील लहान, मोठे पूल, शेतकऱ्यांकडे उपलब्‍ध असलेल्‍या शेतमालासाठी हमीभाव खरेदी केंद्रे, ग्रामीण भागातील प्रा‍थमिक आरोग्‍य केंद्राची स्थिती, शालेय शिक्षण आदीबाबत पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी त्‍या-त्‍या विभागाच्‍या प्रमुखांकडून आढावा घेत जिल्‍ह्यातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत निर्देश दिले.
जिल्‍ह्यात शेतकरी बांधव अति‍शय चांगल्‍या दर्जाच्‍या कापसाचे उत्‍पादन घेतात. तथापि जिल्‍ह्याच्‍या विस्‍तीर्ण भौगोलिक रचनेनुसार व कापसाच्‍या उत्‍पादनानुसार जिल्‍ह्यात पाहिजे त्‍या प्रमाणात जिनिंग प्रेसिंग मिल्‍स उपलब्‍ध नसल्‍याने शेतकऱ्यांची कापूस वाहतुकीसाठी ओढाताण होते. ही ओढाताण रोखण्‍यासाठी व जिल्‍ह्यातील उद्योजकतेला चालना दिली जाईल, असेही पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी सुतोवाच केले. शहरातील दाटीवाटीत असलेल्‍या बाजारपेठेतील गर्दी टाळण्‍यासाठी ज्‍या-ज्‍या ठिकाणी शहराच्‍या जवळ एमआयडीसीच्‍या खुल्‍या जागा आहेत, त्‍या खुल्‍या जागेवर नवीन बाजारपेठा आकारात याव्‍यात यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.कापूस वाहतुकीच्‍या प्रश्‍नाला सोडविण्‍यासाठी जिल्‍ह्यातून जाणाऱ्या रेल्‍वे मार्गाचा उपयोग आपल्‍याला करुन घेता येण्‍या सारखा आहे. किनवट आणि भोकर या ठिकाणी रॅकची सुविधा निर्माण केली तर या दोन तालुक्‍यासह आजूबाजू इतर गावातीलही शेतकऱ्यांचा मोठा प्रश्‍न सुटेल. यासाठी त्‍यांनी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना स्‍वतः लक्ष घालून लवकरात लवकर ही सुविधा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्‍यास सांगितले. वरिष्‍ठ पातळीवर यापुर्वी मी पाठपुरावा केला असून हे काम प्राधान्‍याने सोडविले जाईल, असेही पालकमंत्री अशोक चव्‍हाण यावेळी म्‍हणाले.
गोदावरी नदीवरील प्रदुषणाबाबत त्‍यांनी चिंता व्‍यक्‍त करुन प्रदुषणाला रोखण्‍यासाठी ज्‍या काही मोठ्या योजना लागतील त्‍यावर तात्‍काळ काम सुरु करण्‍याचे निर्देश त्‍यांनी नांदेड मनपा आयुक्‍त डॉ. सुनिल लहाने यांना यावेळी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला पावसाळा ग्रामीण भागात काही आव्हाने निर्माण करू शकतो. शेतकरी बांधवांना वेळेवर बी-बियाणे, निविष्ठा याची कमतरता पडणार नाही याची वेळोवेळी खातरजमा अधिकाऱ्यांनी करून घेतली पाहिजे. शहरासह योग्य त्या खबरदारी घेत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.

17 June 2020

कोरोनाचा एकही नवीन बाधित नाही

नांदेड दि . 17 : - जिल्ह्यात आज सायं . 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 13 अहवालांपैकी 13 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले . एकही बाधित न आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 286 वर स्थिरावली . 286 पैकी आतापर्यंत 180 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . उर्वरीत 93 बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत . औषधोपचार चालू असलेल्या 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे . नांदेड जिल्ह्यात 93 बाधित व्यक्तींपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16 , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 59 , मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . बुधवार 17 जून रोजी 236 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल . जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 45 हजार 568 ,घेतलेले स्वब 5 हजार 457 , निगेटिव्ह स्वब 4 हजार 643 , आज पॉझिटिव्ह स्वब संख्या- निरंक , एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 286 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 220 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या -86 , मृत्यू संख्या- 13 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या -180 , रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 93 , स्वब तपासणी चालू व्यक्तींची 236 एवढी संख्या आहे . कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतृ अॅप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करेल असे डॉ . निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे .

अंत्यविधीला गेले अन् पॉझिटिव्ह झाले!

मुखेड:-अंत्यविधीला गेलेले मुखेड येथील १३ जण पॉझिटिव्ह आढळल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आमदारांसह अनेक लोकांना क्वारंटाईन होण्याची वेळआली असून काही संशयितांचा अहवाल अद्याप अनिर्णित असल्याने त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.मागील आठवड्यात मुखेडच्या एकाच कुटुंबातील दोन जण बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील शंभराहून अधिक जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात आधी पाच आणि नंतर
सहा जणांचे पॉझिटिव्ह आले. यात मुखेड येथील राजकीय पक्षाच्या एका डॉक्टर आणि व्यापाऱ्याचा समावेश होता. हे सर्व जण मुखेड येथील एका
अंत्यविधीसाठी गेले होते. आता या १३ जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वब घेणे सुरू झाले असून ५४ आणि २५ जणांचे स्वब वेगवेगळ्या टप्प्यात तपासणीसाठी पाठविल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यातील एका आमदाराचा स्वब देखील तपासणीसाठी घेतला असता त्यांच्यासह मुखेड येथील बऱ्याच राजकीय मंडळींना क्वारंटाईन होण्याची
वेळ आली आहे. मुखेड येथील ८० नमुने प्रलंबित असल्याचे समजते.

16 June 2020

बाललैगिक शाैषण प्रकरणी एका 20 वर्ष सक्तमजुरी

मुखेड,:-  अल्पवयीन मुलगी टीव्ही पाहण्यासाठी आली असता तिचेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी साक्षीपुराव्यानंतर अतिरिक्त जिल्हा व
सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी आराेपीस 20 वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

एप्रिल 2018 मध्ये शहरातील गायत्री गल्ली येथील एक सहा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरची टीव्ही खराब झाल्यामुळे शेजारी असलेल्या घरी गेली असता आराेपी
संताेष उर्फ बंटी राम घाेगरे याने तुला चाॅकलेट देताे असे म्हणून आतील घरात नेऊन चिमुरडीवर अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी मुखेड पाेलिसांत दिली हाेती.याबाबत बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पाेलिस उप निरीक्षक कविता जाधव यांनी तपास करून न्यायालयात दाेषाराेप सादर केले होते.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांच्या समाेर सरकार पक्षाकडून अॅड. महेश कागणे यांच्याकडून सहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तसेच
पिडीत मुलीचा जबाब व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायाधिश श्री. त्रिभुवन यांनी आराेपी बंटी उर्फ संताेष राम घाेगरे यास 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

मनपा हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढले

नांदेड: शहरात रविवार व सोमवार कोरोनाने साखळी तोडलेली असताना मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 14 रग्णांची भर पडली आहे. त्यामुळे 280 इतकी झाली आहे.

मंगळवार दि. 16 जून रोजी 180 नमून्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये मनपाच्या हद्दीमध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी रात्री 118 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला होता. यामध्ये एकटया मुखेडमधील विठ्ठल मंदिर परिसरातील यापूर्वीच्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नव्याने चार रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या 266 झाली होती. यात महापालिकेच्या हद्दीतील 14 रुग्ण वाढले, असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 280 इतकी झाली आहे. यामध्ये त्या महिला बँकेच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कातील बारा जणांचा समावेश आहे.
——
जिल्ह्यातील कोरेानाची रुग्ण संख्या-280
कोरोनामुक्त झालेले रुग्ण संख्या-177

नांदेडनंतर मुखेडमध्ये रुग्ण वाढले

मुखेड- चार दिवसांपूर्वी कोरेानामुक्त झालेल्या मुखेड तालुक्यात तब्बल नऊ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी दि. 15 जून रोजी पाच तर रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 4 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुखेडमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 9 झाली आहे.

जिल्ह्यातील 118 नमून्यांचा अहवालसमोर आला. 111 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 3 अहवाल नाकारण्यात आले. तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये मुखेड तालुक्यताल पाखंडी येथील 50 वर्षीय महिलेचा ही समावेश असून तर तिघे विठ्ठल मंदिर परिसरातील असून यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. या रुग्णांचे वय हे 30, 11 व 38 वर्षे असे आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 266 झाली आहे.
——
मनपा हद्दीत दोन दिवसात कोरोनासंख्या शून्य
महापालिकेच्या हद्दीत रविवार व सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी रोजच्या रोज मनपा हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडत होते.

दिनेश एडके यांच्या वाढदिवसा निमित्य रक्तदान शिबीर

बिलोली:देशासह राज्यात देखील कोरोना विषाणूने पाय पसरले आहे.व दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे पुढील काळात रूग्णाना रक्ताची कमतरता भासणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहेत.त्यामुळे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख महाराष्ट्र् राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य बिलोली येथे  युवासेना उपशहर प्रमुख दिनेश ऐडके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दिनेश एडके,अकाश धनगरे यांनी रक्तदान करून सुरूवात केली.या कार्यक्रमासाठी युवासेना जिल्हायुवाधिकारी मा.विक्रम सुभाषराव साबणे व मा.श्री.  भिमराव जेठे साहेब (मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक बिलोली), शिवसेना उपजिल्हा प्रमुख मा.श्री विश्वनाथ पा.समन, विधानसभा संघटक मा.श्री शंकर मावलगे, बिलोलीचे पोलीस निरिक्षक मा.श्री शिवाजी डोईफोडे, मा.श्री रमेश देशमुख (शिवसेना उपतालुकाप्रमुख बिलोली), युवासेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मा.श्री रज्जाक धुंदी, विद्यार्थीसेना उपजिल्हा प्रमुख धनाजी जोशी, जिवन आधार रक्त पेढी नांदेड चे सर्व सन्माननीय सदस्य, दिनेश ऐडके यांचे सर्व मित्र परिवार  या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

15 June 2020

मुखेडमध्ये सर्वाधिक तर नांदेडमध्ये एक जण

नांदेड:-नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.15 जून रोजी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये पाच 5 रुग्ण हे मुखेड तर एक रुग्ण हा नांदेड शहरातील आहे.

नवीन आलेले सहा रुग्णांमध्ये मुखेड तालुक्यातील बाऱ्हाली येथील तिघांचा समावेश आहे, तिघे ही पुरुष असून त्यांचे वय हे 62,52 व 47 असे आहे. मुखेड शहरात दोन महिला आहेत,यांचे वय 55 व 52 असे आहे. या सर्व रुग्णांना मुखेड मधील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले.

नांदेड शहरातील बरक्तपुरा येथील 32 वर्षीय युवकास ही कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 262 झाली आहे. डिस्चार्ज झालेले रुग्ण हे 177,उपचार घेत असलेले रुग्ण 72 आहेत,तर आतापर्यंत 13 जण मरण पावले आहेत.

14 June 2020

मृत माशांच्या अहवालाकडे नांदेडकरांचे लक्ष

नांदेड- गोदावरी नदीपात्रामध्ये हजारो मासे मरून पडल्याने मोठी खळबळ उडाली होती.मासे कशामुळे मरून पडली, यासंबंधची माहिती मिळविण्यासाठी भुजल, प्रदुषण विभाग व मस्य प्रशासनाने नमूने प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. या नमून्यांचा अहवालाकडे संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

गोदावरी नदी पात्रातील गोवर्धन घाट पुल ते शिवमंदिर इतक्याच परिसरामध्ये मासे मरूण पडले होते. हजारो माशांचा खच पाण्यावर तरंगत असल्याने मोठी दुर्गंधी व पाणी प्रदुषित होत होते. या प्रकाराकडे मनपाने शनिवारी लक्ष दिले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गोदावरी नदीवरील घाटाचा पाहणी करून अहवाल कळविण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

नदी पात्राच्या विशिष्ट भागातच मासे का मरण पावले, याची माहिती शास्त्रीय दृष्टया समजली पाहिले, या उद्देशाने मस्य अभ्यासकांनी मासे नमूने तपासणीला पाठविली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ व भुलसर्व्हेशन विभागाने पाणी नमूने तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविले आहेत. सदरचे अहवाल कधी येतात, प्रशासन या अहवालासंबंधी काय माहिती देते, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
——

दुषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू-प्रा. डॉ. शिल्लेवार

गोदावरी नदी पात्रामध्ये दुषित पाणी मिश्र होत आहे. यातून मोठया प्रमाणात जलप्रदुषण होत असल्याने मागच्या दोन दिवसांच्या काळात हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांनी याकडे लक्ष घालून गोदावरीनदी पात्र प्रदुषणमुक्त करण्याची मागणी सायन्स कॉलेज मस्य शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. किरण शिल्लेवार यांनी केली.

13 June 2020

माजी मंत्री डि पी सावंत यांची विधानपरिषदेवर निवड करावी :अजय एडके

नांदेड : राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठनेते डी.पी.सावंत यांनी गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे जनतेची सेवा केली आहे.तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विविध कामे त्यांनी मार्गी लावले आहेत . त्यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यात विकासाची गंगा आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.श्री.सावंत हे उच्चशिक्षित व अभ्यासु व्यक्तिमत्व असुन सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , शेतकरी ,दीनदुबळ्यांचा आवाज म्हणुन ओळखले जातात . त्यांच्या आजवरच्या कार्यकाळातला अनुभव पक्षाचा हितासाठी फायदेशीर ठरेल आणि भविष्यातही कार्यकर्त्यांना बळ मिळेल . काँग्रेस पक्ष वाढविण्यात त्यांचे योगदान हे लक्षणीय आहे . मागील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधे काँग्रेसने जी विक्रमी मजल मारली.त्यात माजीमंत्री सावंत यांचा मोलाचा वाटा आहे.माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्व.बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सावंत यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आपले जीवन पक्षाला समर्पित केले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जनतेची कामे करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी , अशी मागणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी मागासवर्ग विभागाचे उपाध्यक्ष अजय एडके यांनी पक्षश्रेष्ठिना केली आहे .


देगलूर पोलीसांची धडक कारवाई 19 लाख 44 हजार किंमतीचा गुटखा जप्त

देगलूर: - देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये वजीर गुटखा 40 बोरी प्रत्येक बोरीमध्ये 6 छोटया बॅग , बॅगमध्ये 54 पॅकेट असे एकत्रीत 12 हजार 960 पॅकेट किंमत एकुण 19 लाख 44 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक , वाहतूक , विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या , चोरट्या पद्धतीने विक्री , उत्पादन , साठा , वाहतुक करु नये , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु . चं . बोराळकर यांनी केले आहे . देगलूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र . एमएच 18 अॅअॅ 1666 या वाहनातील प्रतिबंधित अन्न पदार्थाची 12 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर यांनी ही तपासणी केली आहे . वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोमीनपुरा येथील आरोपी वाहन मालक गुलामखान गौसाखान व कंधार तालुक्यातील गउफळ आंबुलगा येथील वाहन चालक बालाजी नागोराव श्रीमंगले वय वर्षे 50 यांच्याविरुद्ध देगलूर पोलीस स्टेशन देगलूर येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे . मा . न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास संबंधितास आजीवन तुरुंगवास आणि 10 लाख रुपये पर्यंत शिक्षेची तरतूद आहे . अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु . चं .बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुनिल जिंतूरकर व संतोष कनकावाड तसेच नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी पोलिस निरीक्षक बी . एम . धबडगे , पोलिस उपनिरीक्षक एम.एस. ठाकूर तसेच पो . कॉ . श्री . लुंगारे , श्री . यमलवाड यांचे सहकार्याने केली आहे . 

12 June 2020

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे.सदरचे वृत्त मराठवाड्यात खळबळ उडवून देणारे आहे.

यापूर्वी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. या संसर्गातून दोन मंत्री व एक माजी मंत्री बरे होऊन घरी परतल्यानंतर विधमान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.

परळी येथील जगतकर गल्ली येथील एक महिला कोरोना पिझिटिव्ह आली होती.त्या महिलेच्या कुटूंबियाची संपर्कात धनंजय मुंडे आले होते.मात्र त्यावेळी मुंडे यांचा समावेश लो रिस्क गटात करण्यात आला होता.त्यामुळे मुंडे यांचे स्वब घेण्यात आले नव्हते.मात्र हायरिस्क गटातील रुग्णांचे सर्व स्वब हे कोरोना निगेटिव्ह आले होते.

यानंतर धनंजय मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई येथील कोरोना निदान प्रयोग शाळेचे उदघाटन ही झाले होते.तसेच बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली होती. या वृत्तास बीडच्या प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नसला,तरी त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

कुंडलवाडी खून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

बिलोली(ता.प्र): कुंडलवाडी येथील पोतन्ना आरसेवार यांचा खून केवळ एकाच व्यक्तीने केला नसून या खुनात आणखी काही लोकांचा असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी , अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे . कुंडलवाडी येथील पोतन्ना भुमन्ना आरसेवार यांचा ( ता . पाच ) मे रोजी कुंडलवाडी येथील त्यांच्या नवीन बांधकामाच्या घराशेजारील रस्त्यावर रात्रीच्या वेळेत डोक्यात कु - हाडीने वार करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली होती . दरम्यान , त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले असता तीन दिवसांनंतर म्हणजेच आठ मे रोजी दवाखान्यात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले . याप्रकरणी कुंडलवाडी पोलिस ठाण्यात प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र , पोलिसांनी प्राथमिक चौकशी असता मयत पोतन्ना आरशेवार यांचा खून चुलत पुतण्याने केल्याची माहिती उघड झाली . त्यानंतर पोलिसांनी या खुनास जबाबदार गणपत आरसेवार यांना अटक केली . आरोपी गणपत आरशेवार यांनी खून केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली . न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती . या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी केली जात असताना आरोपीने अन्य काही लोकांची नावे घेतल्याची चर्चा कुंडलवाडी होत आहे . मात्र , कुंडलवाडी पोलिसांनी राजकीय दबावाला व आर्थिक प्रलोभनाला बळी पडून केवळ गणपत आरसेवार या एकास ताब्यात घेऊन पुढील चौकशीला पूर्णविराम दिल्याची तक्रार मयताचा मुलगा अनिल पोतन्ना आरसेवार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांसह राज्याचे गृहमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . कुंडलवाडी येथील आरसेवार खून प्रकरणात अन्य चार ते पाच लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी , अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे .


11 June 2020

माळाकोळी पोलीसांची धडक कारवाई 18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त संबंधितांवर गुन्हा दाखल

नांदेड दि . 11 : - लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक , वाहतूक , विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या , चोरट्या पद्धतीने विक्री , उत्पादन , साठा , वाहतुक करु नये , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु . चं . बोराळकर यांनी केले आहे . लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र . के . ए . 38-6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली . यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला . गुलबर्गा ( कर्नाटक ) जिल्ह्यातील पडसावली ( ता . आळंदा ) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला . मा . न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे . अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु . चं बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड , सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली. 

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 13.99 मि.मी. पाऊस

नांदेड दि . 11 : - जिल्ह्यात गुरुवार 11 जून 2020 रोजी सकाळी 8 वा संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 223.84 मिलीमीटर पाऊस झाला आहे . तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 47.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . जिल्ह्यात आतापर्यंत 5.38 टक्के एवढा पाऊस झाला आहे . जिल्ह्यात 11 जून 2020 रोजी सकाळी 8 वा संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड -26.63 ( 85.89 ) , मुदखेड- 15.67 ( 42.34 ) , अर्धापूर- 12.00 ( 45.00 ) , भोकर 11.25 ( 62.50 ) , उमरी -3.00 ( 25.00 ) , कंधार- 7.00 ( 39.17 ) , लोहा- 13.83 ( 49.16 ) , किनवट- 13.00 ( 29.28 ) , माहूर -17.75 ( 39.00 ) , हदगाव -10.71 ( 64.28 ) , हिमायतनगर 12.00 ( 71.67 ) , देगलूर -31.50 ( 65.26 ) , बिलोली 7.00 ( 21.00 ) , धर्माबाद- 11.33 ( 41.99 ) , नायगाव 2.60 ( 24.00 ) , मुखेड- 28.57 ( 60.99 ) . आज अखेर पावसाची सरासरी 47.91 ( चालू वर्षाचा एकूण पाऊस 766.53 ) मिलीमीटर आहे .

पत्रकार अनिल डोईफोडे यांना नुकसान भरपाई द्या : महेंद्र गायकवाड

नांदेड : वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार अनिल डोईफोडे यांना पतंग उडविण्याच्या दोरीने गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आर्थिक मदत करून नुकसानभरपाई देण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . भोकर येथील पत्रकार अनिल डोईफोडे हे वृत्त संकलनासाठी गेले असता अचानक उडत आलेल्या पतंगाच्या मांजाने त्यांचे गाल व हनुवटी कापली गेल्याने बारा टाके पडले असून त्यांचा जीव थोडक्यात बचवला आहे . सोमवार दिनांक 8 जून रोजी कृषी कार्यालय भोकर येथे वृत्त संकलनासाठी जाऊन आपल्या दुचाकीवरून परत येत असताना गांधी चौकात डोईफोडे यांच्यापुढे अचानक एक पतंग त्यांच्या समोरून उडत आली , त्या पतंगास चायना मांजा असल्याने पत्रकार डोईफोडे यांच्या लक्षात आले नाही , त्यामुळे हा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर भोवती लपेटला गेल्याने गाल व हनुवटी एका क्षणात कापली गेली , त्यांना तात्काळ काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उपचारासाठी दाखल केले , तिथे त्यांच्या कापलेल्या भागावर टाके मारण्यात आले असून , गाल व हनुवटी वर एकूण बारा टाके पडले आहेत . सर्वत्र चायना मांजावर विक्रीसाठी बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भोकर शहरात चायना मांजा विक्रीसाठी आलाच कसा ? असा प्रश्न येथील पत्रकार आणि सामान्य नागरिकाना पडला आहे , चायना मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी , व डोईफोडे यांना आर्थिक मदत करून शासनाने नुकसानभरपाई दयावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड , जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील , दक्षिण विभाग प्रमुख प्रशांत बारादे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

नांदेड शहरात रुग्ण संख्येत वाढ

नांदेड,- नांदेड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवार दि. 11 जून रोजी पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची 208 झाली आहे.

टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर नांदेड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवार दि. 10 जून रोजी दोन रुग्णांचा मृत्यू तर दहा नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.त्यानंतर गुरुवारी सकाळी पाच रुग्ण आढळून आले, असून हे सर्वच्या सर्व रुग्ण हे नांदेड शहरातील आहेत.

यामध्ये इतवारा भागात दोन पुरुष आहेत. त्यांचे वय हे 28 व 65 असून त्यांच्यावर एन.आर.आय. यात्री निवास येथे उपचार सुरु आहेत.खाजा कॉलनीमधील 67 वर्षीस इसमावर खासगी रुग्णालय, फ रांदे नगर येथील 52 वर्षीय इसमावर मेडिकल कॉलेजर तर चौफ ाळा येथील 52 वर्षीय महिलेवर सुद्धा मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरु आहेत.

चौकट
बाधित रुग्णसंख्या 208
मृत्यू-11
डिस्चार्ज 137
उपचार-60

राष्ट्रवादी वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिरास 98 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा कार्यालयात डॉक्टरलेन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ . सुनील कदम यांनी स्वतः रक्तदान करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन या रक्तदान शिबिरास 98 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . कोरोना व्हारयसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करून व मास्क व सॅनिटाईझर वापरून नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा 21 वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टरलेन येथे कार्यालयामध्ये दि . 10 जून रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते . या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष डॉ . सुनील कदम , नांदेड शहराचे उपाध्यक्ष प्रा . जांभरूनकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड ग्रामीणच्या महिला अध्यक्षा प्रांजली रावणगावकर , सामाजिक न्याय विभाग नांदेड राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहूल जाधव , कार्यकारिणी सदस्य मनबिरसिंघ ग्रंथी यांच्यासह 98 जणांनी रक्तदान केले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्पनाताई डोंगळीकर , उपाध्यक्ष बंटी लांडगे , सरचिटणीस गणेश तादलापूरकर , ओबीसी सेलचे नांदेडचे अध्यक्ष पांडूरंग काकडे , अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ . मुजाहिद खान , राष्ट्रवादी विद्यार्थीचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैय्या कदम , धनंजय सूर्यवंशी , साईनाथ सज्जन आदी जणांची उपस्थिती होती . सदर रक्तदान शिबिरामध्ये प्रकाश घोगरे , मोदानिश , अॅड . सचिन जाधव , गजानन पाटील , अमोल राजगोरे , मुकुंद मोरे , श्रीकांत आडेकर , ज्ञानेश्वर पवळे , दामोधर सूर्यवंशी , गजानन सूर्यवंशी , चांदोजी माधव , विनोद सूर्यवंशी , गजानन , रामकिशन सूर्यवंशी , तुकाराम सूर्यवंशी , शिवशंकर सूर्यवंशी , रामानंद सूर्यवंशी , दीपकसिंह कौशिक , आईनाथ कळकेकर , शुभम ठाकूर , शंकर ठाकूर , शरद शिंदे , सतीश सूर्यवंशी , योगेश गुमलवाड , गणेश सूर्यवंशी , राजू धुमाळ , गजानन धुमाळ , संदीप क्षिरसागर , कृष्णा कदम , बालाजी सूर्यवंशी , सुदाम पांचाळ , सचिन बोकारे , आदीनाथ शिंदे , अजय शिंदे , उमाकांत , करण सावंत , सोपान सूर्यवंशी , शेषेराव सूर्यवंशी , संदीप सूर्यवंशी , यशवंत सूर्यवंशी , शिवाजी सूर्यवंशी , संतोष कदम यांच्यासह 98 जणांनी रक्तदान केले . तर रक्तसंकलनाचे काम जीवन आधार रक्तपेढीच्या डॉक्टरांच्या टिमने रक्त संकलित केले.या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आले . 

10 June 2020

नांदेडकरांना कोरोनाच्या दृष्टीने चटका लावणारा दिवस ठरला; दिवसभरात दोन मृत्यू तर दहा पॉझिटीव्ह

नांदेड:– नांदेडकरांना कोरोनाच्या दृष्टीने चटका लावणारा दिवस ठरला आहे. बुधवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला.

दिवसभराच्या प्राप्त झालेल्या 60 अहवालांमध्ये 49 अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. तर दहा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 203 झाली आहे. तर दिवसभराच्या काळात तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. हे सर्वच्या सर्व रुग्ण हे यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 137 झाली.
—–
नवे दहा रुग्ण
आज सापडलेले दहा रुग्णांमध्ये आठ जण हे पुरुष आहेत. यामध्ये 12, 43, 45, 47, 48, 54,55 व एका सहा महिन्याच्या बालकाचा सुद्धा समावेश आहे. यातील पाच रुग्ण हे चौफ ाळा परिसरातील आहेत. एक रुग्ण मालेगाव रोड, तर दोन रुग्ण सिडको परिसरातील स्त्री आहेत. याचे वय हे 50 व 10 वर्षे आहे.
—–
दोघांचा मृत्यू
बुधवारी सकाळी चौफ ाळा येथील एका 65 वर्षीय वृद्ध इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुपारी वसमत येथील नांदेड येथे उपचार घेणार्‍या 45 वर्षीस इसमाचा सुद्धा मृत्यू झाला. एका दिवसात दोघ जण मरण पावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या 11 झाली आहे.

कोरोना संसर्गामुळे 65 वर्षीय इसमाचा मृत्यू

नांदेड:- नांदेडमध्ये उपचार घेणार्‍या एका 65 वर्षीय इसमाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 10 जून रोजी घडली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 10 झाली.

शहरातील इतवारा भागात राहणार्‍या हनुमान चौक भागातील 65 वर्षी इसमाचा अहवाल दि. 6 जून रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरु होते. सुरुवातीपासून या इसमाचा प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान बुधवारी निधन झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 10, कोरोनाग्रस्तांची संख्या195, डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण संख्या 134, उपचार घेत असलेले रुग्ण 51 इतकी आहे

बिलोलीच्या नगराध्यक्षा सौ मैथिली कुलकर्णी यांनी दिले दोन महिन्याचे मानधन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांच्या कडे सुपूर्द

बिलोली:देशासह राज्यात देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.त्यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे.केंद्र आणि राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करून सर्व नागरीकांना घरात राहण्यासाठी सक्ती केली आहे.याच पार्श्वभूमीवर बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी यांनी दोन महिन्याचे मानधन कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.यावेळी आ.अमरनाथ राजुरकर , माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. लॉकडाऊन च्या काळात बिलोली च्या नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी या | दाम्पत्याने शहरातील गोरगरिब | जनतेला आपल्या स्वखर्चाने | अन्नधान्य वाटप केले आहे . | तसेच संतोष कुलकर्णी मित्रमंडळाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची सामाजिक सेवा करण्याचा उपक्रम मित्रमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे .

अभिजीत तुडमे यांच्या वाढदिवसानिमित्त होमिओपॅथी गोळ्याचे वाटप

बिलोली:(ता.प्र) बिलोली युवा सेना तालुका प्रमुख अभिजित यादवराव तुडमे यांच्या वाढदिवसाचे औचित साधुन बिलोली शहरातील नगरपालिका हद्दीतील 17 वार्डामधील 5 हजार नागरीकांना होमिओपॅथी गोळ्याचे वाटप करण्यात आले.8 जुन रोजी बिलोली युवा सेना तालुका प्रमुख यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून पुर्ण भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातला असल्याने आपल्या वाढदिवसानिमित्त बिलोली शहरातील नागरीकांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथी गोळ्या अर्सेनिक अल्बम 30’ च्या 5 हजार नागरीकांना वाटप करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला.यावेळी इंद्रजित तुडमे,प्रताप अंकुशकर, रवी कल्यानकर,साईनाथ शिरोळे,सुनील फालके,विश्वजीत तुडमे,सय्यद रियाज,अरशद देशाई, बाबु कुडके,दिनेश एडके,मिलिंद पटाईत,शेख फेसल आदींची उपस्थिती होती.

रात्रीतून आलेले अहवाल पॉझिटिव्ह

नांदेड:- मंगळवारी रात्री पावणे आकार वाजेच्या सुमारास 11 अहवाल आले आहेत.यामध्ये 2 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 30 पैकी 29 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला,सदरचा रुग्ण हा शासकीय रुग्णालयात वैधकीय अधिकारी,असून ते शाहू नगर भागात राहतात

रात्री आलेल्या अकरा अहवालात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये नायगाव तालुक्यातील तकबीड येथून असून या रुग्णाचे वय हे 47 वर्षे इतके आहे. तर नांदेड येथील चौफला येथील 50 वर्षीय महिला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.या दोन्ही रुग्णांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 195 इतकी झाली.कोरोनामुक्त 134 तर 52 रुग्ण उपचार तर आतापर्यंत 9 जण या संसर्गामुळे दगावले आहेत

09 June 2020

आ.अंतापुरकर यांनी मतदारसंघातील विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांची घेतली भेट

बिलोली :(ता.प्र)देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी मतदारसंघाच्या विविध समस्या घेऊन नांदेड जिल्हाधिकार्याची घेतले भेट.कोरोना विशाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कार्यकाळात आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी सतत मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व तसेच मतदारसंघात कोरोना विषयी जनजागृती करून लोकांना घरीच रहा व सुरक्षित रहा अशा प्रकारच्या सुचना दिल्या.व तसेच आज दिनांक 9 रोज मंगळवार रोजी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची भेट घेऊन आक्टोबर नोव्हेंबर 2019 मध्ये अतिवृष्टीची राहिलेले अनुदान तात्काळ शेतकर्यांना वाटप करा, व देगलूर बिलोली मतदारसंघातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा कापुस CCI  केंद्रावर त्वरित खरेदी केंद्र चालू करावा,देगलूर बिलोली मतदारसंघातील गेल्या दोन वर्षांपासून मंजूर झालेल्या व अर्धवट घरकुलांचे बाधकाम झालेल्या व तसेत शासकीय कामासाठी व दलित वस्ती सुधार योजनेसाठी व इतर बांधकामासाठी रेती त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी व विविध विकास कामावर चर्चा करून वरील कामाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना देण्यात आले व यावेळी  जि प बांधकाम सभापती संजय बेळगे हे उपस्थित होते .

कोरोना महामारिच्या नावाने दरवाड नागरिकांची पिळवणूक

बिलोली- मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणूने विळखा घातल्याने केंद्र सरकारने टप्प्या टप्प्याने ४ लॉक डाऊन आणि पाचव्यांदा जीवनावश्यक व देश चालविण्यासाठी आर्थिक उत्पन देशाला आवश्यक असल्याने थोडी शिथिलता देत अनलॉक -१ सुरु केले . पाचव्या टप्प्यात प्रक्रिया उद्योग , दळणवळण व अत्यावश्यक बाबीला सुट मिळाली असली तरी काही संधीसाधू लोकांनी लॉकडाऊनचा बागुलबुवा उभा करीत प्रक्रिया उद्योग थांबले , दळणवळणामुळे वाहतूक दर वाढल्याचे कारण देत प्रत्येक वस्तूवर सवा , दीड ते दुपटीने दरवाढ करून नागरिकांना महागाईचा जोरदार धक्का देत असल्याचे निदर्शनास येत आहे .महामारीच्या संकटात तरी प्रतिज्ञेमधील सारे भारतीय माझे बांधव आहेत या वाक्याला स्मरून इमानदारीने व्यवसाय करून देशसेवा करण्याची संधी या व्यवसायिकांना लाभली असली तरी अनेक व्यवसायिक खड्डे मे जाये जनता , अपना काम बनता , हे धोरण अवलंबत बेईमानीने लक्ष्मीचे पुजारी बनत समाजसेवा देशसेवेला कोलदांडा देत असल्याने जनता कोरोना संकटाबरोबरच महागाईने होरपळत असल्याने अनेकांचे घरात दैनंदिन लागणाऱ्या खर्चाचे मासिक आर्थिक बजेट कोलमडत असून आधीच ७५ दिवसापासून लॉकडाऊनमुळे रोजगाराला बाधा येऊन आर्थिक उत्पन्नाला खीळ बसल्याने प्रपंचगाडा चालवितांना नाकी नऊ येत आहे . यावर प्रशासनाने उपाययोजना आखल्या असतांना प्रत्येक दुकानवर दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश व्यवसायिकांना दिलेले असतांनाही बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही . तर कोरोना अद्यापही आटोक्यात आलेला नसल्याने प्रशासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी सोशल डीस्टन्स , फिजिकल डीस्टन्स , निर्जंतूकिकरण करून व्यवसाय चालविण्याची मुभा दिली आहे . याचाच गैरफायदा अनेक व्यवसायिक घेतांना दिसत असून प्रक्रीया उद्योगाचे व वाहतुकीचे कारण देत ग्राहकांना हवे ते साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगून व्यापाऱ्यांना जास्त मुनाफा देणारे पर्यायी लोकल साहित्य ग्राहकांच्या माथी मारत असल्याचेही प्रकार सर्रास घडत आहेत .ग्राहकही सगळे काही समजून उमजून “ आता समय आगया बाका , तो गधे को बोलना काका " या उक्तीप्रमाणे नावडते साहित्य खरेदी करून वेळ भागवत आहेत हे कुणीही नाकारणार नाही . एकंदरीत कोरोना संकटामुळे एकीकडे कोरोनाने जगाला माणुसकी शिकवली असल्याचा कांगावा जरी काही बुद्धिवादी करत असले तरी नाण्याची दुसरी बाजू पाहू जाता समाजात एक संधीसाधू लोकांचाही एक मोठा समूह समाजसेवा , देशसेवा थोतांड मानून आपला गल्ला कसा भरेल हेच धेय्य ठेवत कोरोना महामारीच्या संकटाचा गैरफायदा घेण्यात मशुल आहे . एक बाजूने विचार केला तर काही अंशी त्यांचे म्हणणेही खरे आहे . मात्र ते जेवढे अवास्तव दर्शवतात तेवढे मात्र नक्कीच नाही . तेव्हा जिल्हा प्रशासनाने या बाबीला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात गौणखनिज , राशन , केरोसीन च्या धर्तीवर राजकारणविरहीत दक्षता समित्या स्थापन करून अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व कोरोनामुळे उदभवलेल्या कृत्रिम महागाईला आळा घालणे गरजेचे आहे मात्र लक्षात घेतो कोण !


08 June 2020

कॉग्रेस पक्षाच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30’ गोळ्यांचे वाटप

देगलूर :देशासह राज्यात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत देखील आता वाढ होत आहे. मृत्यूदर जरी कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे.नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा दररोज पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या वाढ होत आहे.त्यातल्या त्यात काही दिवसांपूर्वी देगलूर तालुक्यातील आमदापुर येथे सुध्दा एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे.दरम्यान, कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर आज देगलूर शहरातील होमिपॅथिक डॉक्टर असोशियन यांच्या सहकार्याने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी अर्सनिक अल्बम ३० या औषधांचे देगलूर येथे वाटप करण्यात आले.यावेळी  विधान परिषदेचे आमदार श्री अमरभाऊ राजूरकर,देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री रावसाहेब अंतापूरकर,जि प बांधकाम सभापती श्री संजय आप्पा बेळगे,जि प समाज कल्याण सभापती श्री रामराव नाईक,देगलूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री मोगलाजी शिरशेटवार,बिलोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर,देगलूर शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष श्री शंकर कतेवार,डॉ शमी खान,दिनेश मुनगीलवार,सेवानिवृत्त डिवाएपी रमेश कंतेवार,खैसर देशमुख,सुरेश देशमुख देगावकर,शंतनू महाराज पेटनया सावकर बालाजी थडके, राधेश्याम जालनेकर, शंकर वदेवार, अजय वानखेडे ,पाशा भाई ,दिनेश महाराज आदि उपस्थित होते...


कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

नांदेड:- रविवारी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. 8 जून रोजी सकाळी घडली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे.

नांदेड शहरात रविवारी दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. यामध्ये गुलजार बाग येथे राहणार्‍या एका 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. या महिलेची प्रकृती रुग्णालयात आणण्यापूर्वीच गंभीर होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना सोमवार दि.8 जून रोजी मृत्यू झाला.

——
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 192 झाली. 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 52 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला.

रात्री आलेल्या अहवालात कोरोनाचे रुग्ण पॉझिटीव्ह

नांदेड,- रविवारी दिवसभराच्या काळात 59 अहवाल प्राप्त झाले, यामध्ये दोन अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तर 57 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

पाच वाजता प्राप्त झालेल्या सर्वच्या सर्व 27 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभराच्या काळात एकही अहवाल पॉझिटीव्ह न आल्याने समाधान व्यक्त केले जात असताना रात्री दहा वाजता 32 अहवाल आले आहेत. यामध्ये दोन जण कोरोना पॉझिटीव्ह आले, असून यामध्ये देगलूर नाका भागातील उमर कॉलनीमध्ये राहणार्‍या 54 वर्षीय इसमाचा समावेश आहे. तसेच गुलजार बागमधील 55 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 192 इतकी झाली आहे. अजून 27 स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे.

07 June 2020

ट्रक अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

नायगाव:बाचोटी येथुन लग्न आटपून घुंगराळ्यात येताच दुचाकीस भंगार घेऊन नांदेडला जाणा-या भरधाव ट्रक ने उडवल्याने बाप लेकीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर  झाली. घटना आज दिनांक 7 जुन रोजी 6 च्या दरम्यान घुगराळा बस्थानकावर घडली आहे .

नायगांव तालुक्यातील घुंगराळा येथील बालाजी शिताराम सुगावे वय (40 ), नातेवाईकाच्या लग्नासाठी पत्नी संगीता बालाजी सुगावे (वय 35), रूतुजा बालाजी सुगावे( वय 13 ), हे तीघे ही मोटारसायकल क्र एम.एच.26 ए.ए . 684 या वर बाचोटी येथील लग्न आटोपून 6 वाजता च्या सुमारास घुंगराळा बस्थानकावर येताच नायगांव येथुन भंगार घेऊन भरधाव वेगात जाणा-या ट्रंक क्र .एम.एच .26 एच .8724 याने दुचाकीस जोराची धडक दिल्याने बालाजी शिताराम सुगावे व त्यांची 13 वर्षाच्या रूतुजा बालाजी सुगावे बाप आणि लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे .

दोन्ही मृतदेह कुंटुर पोलीसांनी उतरीय तपासणीसाठी नायगांव ग्रामीन रूग्णालयात नेण्यात आले आहे . या तील गंभीर जखमी संगीता सुगावे याना पुढील उपचारासाठी नांदेड येधे नेण्यात आले आहे .ट्रक चालकास कुंटुर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .हे वृत्त लिहीपर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुंटुर पोलीस ठाण्यात सुरू होती.