नांदेड:– नांदेडकरांना कोरोनाच्या दृष्टीने चटका लावणारा दिवस ठरला आहे. बुधवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर दहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला.
दिवसभराच्या प्राप्त झालेल्या 60 अहवालांमध्ये 49 अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. तर दहा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 203 झाली आहे. तर दिवसभराच्या काळात तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले. हे सर्वच्या सर्व रुग्ण हे यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील आहेत.बरे झालेल्या रुग्णांची संख्या 137 झाली.
—–
नवे दहा रुग्ण
आज सापडलेले दहा रुग्णांमध्ये आठ जण हे पुरुष आहेत. यामध्ये 12, 43, 45, 47, 48, 54,55 व एका सहा महिन्याच्या बालकाचा सुद्धा समावेश आहे. यातील पाच रुग्ण हे चौफ ाळा परिसरातील आहेत. एक रुग्ण मालेगाव रोड, तर दोन रुग्ण सिडको परिसरातील स्त्री आहेत. याचे वय हे 50 व 10 वर्षे आहे.
—–
दोघांचा मृत्यू
बुधवारी सकाळी चौफ ाळा येथील एका 65 वर्षीय वृद्ध इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुपारी वसमत येथील नांदेड येथे उपचार घेणार्या 45 वर्षीस इसमाचा सुद्धा मृत्यू झाला. एका दिवसात दोघ जण मरण पावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची संख्या 11 झाली आहे.







0 comments:
Post a Comment