जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 June 2020

दोन रुग्णांचा स्वॅब पुन्हा पॉझिटीव्ह

नांदेड:- यापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या दोन रुग्णांचा दुसरा अहवाल सुद्धा पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. तर दिवसभराच्या काळात नवीन एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 190 झाली आहे.

जिल्ह्यातील 75 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 59 अहवाल निगेटीव्ह, 12 अहवाल नाकारण्यात आले. एक अहवाल अनिर्णित तर 3 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये फे र तपासणीमध्ये एका 23 व 80 वर्षांच्या इसमांचा दुसरा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. तर इतवारा येथील हनुमान टेकडी परिसरातील एक रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 190 झाली. आतापर्यंत 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 56 जणांवर उपचार सुरु आहेत, तर आठ जणांचा यापूर्वी कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हयात कोरोनाच्या संसर्गामुळे चार रुग्णांची प्रकृती गंभीर अ आहे. यामध्ये दोन महिला ज्याचे वय. 52 व 65 तसेच दोन पुरुषांचे वय हे 38 व 65 इतके आहे.

0 comments:

Post a Comment