मुंबई:- राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली, असून त्यांना गुरुवार दि. 4 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला. सदरची बातमी नांदेड जिल्हयात समजताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला.अशोक चव्हाण हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई येथे पंधरा दिवस वास्तव्यात होते. त्यानंतर ते मुंबईवरून नांदेड येथे आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. कोरोना स्वॅबची तपासणी केली असता, त्यांचा स्वॅब दि. 25 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. एक खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल झाले होते.
दहा दिवसांच्या उपचारानंतर अशोक चव्हाण यांना मुंबई येथील खासगी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यापूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी सुद्धा कोरोनाच्या संसर्गाला पळवून लावले आहे. यासंबंधीची अधिकृत माहिती माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी एका व्हिडिओच्याव्दारे दिली.







0 comments:
Post a Comment