नांदेड:– प्रयोगशाळेकडून 43 चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 39 स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह तर 3 अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. यामध्ये शिवाजी नगर एक रुग्ण हा शिवाजी नगर तर दोन रुग्ण हे देगलूर नाका भागातील आहेत.
सोमवार दि. 1 जून रोजी 43 स्वॅबचा अहवाल समोर आले आहेत. यात तीन नवे जण कोरोनाबाधित असून यामध्ये तिघे पुरुष आहेत. देगलूर नाका भागातील डॉक्टर वय(45,)व सहायक (वय25) व शिवाजी नगर भागातील रुग्णाचे वय 40 वर्षे आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 149 इतकी झाली आहे. 104 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर आजघडिला उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 37 वर पोहचली आहे. रविवारी दोन कोरेानाचे रुग्ण सापडले होते, तर एक रुग्ण बरा होऊन घरी परतला होता. तसेच चार रुग्णांची अद्यापही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.







0 comments:
Post a Comment