धर्माबाद | येथील फुलेनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या शेख वसीम या विद्यार्थ्याने बाभळी बंधाऱ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली . त्याचे शव 24 तासानंतर शोधण्यात यश मिळाले आहे . या घटनेमुळे धर्माबाद परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , शेख वसीम शेख मोईन वय वर्षे २४ हा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नांदेड येथे रहात होता . लॉकडाउनच्या काळामध्ये तो गावाकडे आला होता . तो अभ्यास करण्यासाठी दररोज आपली मोटार सायकल घेऊन बंधारा परिसरात जात असे त्याच्या भावाने सांगितले . दिनांक २६ जून रोजी सकाळी १२ वाजता नेहमीप्रमाणे तो बाभळी बंधारावर गेला . चौकीदाराने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु , तो विद्यार्थी दररोज अभ्यासाला येतो व बसून अभ्यास करून परत जातो म्हणून चौकीदाराने याकडे फारसे लक्ष दिले नाही . शेख वसिम याने बाभळी बंधायाच्या मधोमध जाऊन आपली टोपी , चष्मा , मोटार सायकलची चावीवर ठेवून आपल्या भावाला फोन करून सांगितले की , बाभळी बंधायावर येऊन मोटर सायकल , माझा मोबाईल , चष्मा घेऊन जावे मी नदीमध्ये उडी मारीत आहे असे सांगून त्याने नदीमध्ये उडी घेतली . ही घटना कळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड , पो.हे. कॉ . नागुलवार यांनी मच्छीमारांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली . परंतु युवकाचे प्रेत मिळाले नाही . दिनांक २७ रोजी दुपारी मयताचे प्रेत तरंगत वर आल्यामुळे मयतास बाहेर काढण्यात आले . त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मयताचे शव कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे .
28 June 2020
Home »
» गोदावरी नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या ; २४ तासानंतर प्रेत सापडले







0 comments:
Post a Comment