नांदेड:- नांदेडमध्ये उपचार घेणार्या एका 65 वर्षीय इसमाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 10 जून रोजी घडली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 10 झाली.
शहरातील इतवारा भागात राहणार्या हनुमान चौक भागातील 65 वर्षी इसमाचा अहवाल दि. 6 जून रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरु होते. सुरुवातीपासून या इसमाचा प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान बुधवारी निधन झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 10, कोरोनाग्रस्तांची संख्या195, डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण संख्या 134, उपचार घेत असलेले रुग्ण 51 इतकी आहे







0 comments:
Post a Comment