जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

11 June 2020

पत्रकार अनिल डोईफोडे यांना नुकसान भरपाई द्या : महेंद्र गायकवाड

नांदेड : वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार अनिल डोईफोडे यांना पतंग उडविण्याच्या दोरीने गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आर्थिक मदत करून नुकसानभरपाई देण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . भोकर येथील पत्रकार अनिल डोईफोडे हे वृत्त संकलनासाठी गेले असता अचानक उडत आलेल्या पतंगाच्या मांजाने त्यांचे गाल व हनुवटी कापली गेल्याने बारा टाके पडले असून त्यांचा जीव थोडक्यात बचवला आहे . सोमवार दिनांक 8 जून रोजी कृषी कार्यालय भोकर येथे वृत्त संकलनासाठी जाऊन आपल्या दुचाकीवरून परत येत असताना गांधी चौकात डोईफोडे यांच्यापुढे अचानक एक पतंग त्यांच्या समोरून उडत आली , त्या पतंगास चायना मांजा असल्याने पत्रकार डोईफोडे यांच्या लक्षात आले नाही , त्यामुळे हा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर भोवती लपेटला गेल्याने गाल व हनुवटी एका क्षणात कापली गेली , त्यांना तात्काळ काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उपचारासाठी दाखल केले , तिथे त्यांच्या कापलेल्या भागावर टाके मारण्यात आले असून , गाल व हनुवटी वर एकूण बारा टाके पडले आहेत . सर्वत्र चायना मांजावर विक्रीसाठी बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भोकर शहरात चायना मांजा विक्रीसाठी आलाच कसा ? असा प्रश्न येथील पत्रकार आणि सामान्य नागरिकाना पडला आहे , चायना मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी , व डोईफोडे यांना आर्थिक मदत करून शासनाने नुकसानभरपाई दयावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड , जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील , दक्षिण विभाग प्रमुख प्रशांत बारादे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

0 comments:

Post a Comment