नांदेड:– करबला नगर येथे राहणार्या एक इसम व त्यांच्या घरातील सहा महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक कोरोनबाधित झाले होते. नऊ दिवसांनंतर बालिकेचे घेतले स्वॅब हे निगेटीव्ह आले आहे. सहा महिन्याची छकुली कोरोनामुक्त करण्यास वैद्यकीय टीमने योग्य उपचार केल्यामुळे छकुली कोरोनामुक्त झाली आहे.
मागच्या महिन्यात दि. 24 मे रोजी करबला नगर येथे राहणार्या सहा महिन्याची बालिका व तिचे काका हे दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. बालिकेची प्रकृती खालावत चालल्यामुळे तिची तपासणी करण्यात आली होती. त्यात बालिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. तिला सुरुवातीला पंजाब भवन येथे भरती करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती केले गेले.
डॉक्टरांच्या टीमने योग्य उपचार व काळजी घेतल्याने नऊ दिवसात बालिका निगेटीव्ह आली. तसेच नवव्या दिवशी त्या बालिकेच्या आईची सुद्धा तपासणी केली, असता निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. या बालिकेस रुग्णालयातून सुट्टी देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे जातीने हजर होते. या वेळी उपचार करणार्या डॉक्टरांच्या टीमचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ.चंद्रकांत मस्के, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, डॉ. संजय मोरे, डॉ. वाय.एस. चव्हाण आदींची उपस्थिती होती.







0 comments:
Post a Comment