नांदेड दि . 17 : - जिल्ह्यात आज सायं . 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 13 अहवालांपैकी 13 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले . एकही बाधित न आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 286 वर स्थिरावली . 286 पैकी आतापर्यंत 180 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . उर्वरीत 93 बाधित व्यक्तींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली औषधोपचार चालू आहेत . औषधोपचार चालू असलेल्या 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे . आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे . नांदेड जिल्ह्यात 93 बाधित व्यक्तींपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16 , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 59 , मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . बुधवार 17 जून रोजी 236 व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल . जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे . सर्वेक्षण -1 लाख 45 हजार 568 ,घेतलेले स्वब 5 हजार 457 , निगेटिव्ह स्वब 4 हजार 643 , आज पॉझिटिव्ह स्वब संख्या- निरंक , एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 286 , स्वब तपासणी अनिर्णीत संख्या 220 , स्वब नाकारण्यात आलेली संख्या -86 , मृत्यू संख्या- 13 , रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या -180 , रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 93 , स्वब तपासणी चालू व्यक्तींची 236 एवढी संख्या आहे . कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर " आरोग्य सेतृ अॅप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे अॅप सतर्क करेल असे डॉ . निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे .







0 comments:
Post a Comment