नांदेड:-कोरोनाच्या आजारावर मात करून घरी परतलेले माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. मुंबईला घेऊन जाण्यास विमान आले असते, बारा तासांचा प्रवासाचा त्रास आणि वेळ नक्की वाचला असता. परंतु; विमान का आले नाही, हे मला माहित होऊ शकले नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना दि. 22 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. त्यापूर्वी एक दिवस व रात्र अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे उपचार घेतले. चव्हाण यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाणून घेत आपल्या मुंबई येण्याची सोय करतो असा निरोप दिला होता.मात्र सोमवारच्या रात्री किंवा मंगळवारी सकाळी विमान न आल्याने चव्हाण यांनी बाय रोड मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. यासाठी बारा तास प्रवास करावा लागला. कोरोनाच्या रुग्णांना विमान मिळत नाही, असे समजले. त्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मी विमानाने नांदेडला आलो होतो. तेव्हा माझी टेस्ट झालेली नव्हती. मात्र विमान प्रवास का नाकारण्यात आला. हे समजू शकले नाही. मी सुद्धा त्या भानगडीत पडलो नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोण कुठे उपचार घ्यावे हा वैयक्तीक प्रश्न
नांदेडमधील सामान्य माणसांचे संदेश आले बरे व्हावे लवकर म्हणून, आजारी माणसाबद्दल राजकारण करणे गलिच्छपणा आहे. हे राजकारण कोण केले हे मला माहित आहे. कुणी कुठे उपचार घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे चुकीचे,असून अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते असे प्रतिउत्तर चव्हाण यांनी विरोधकांना दिले.कोरोनाच्या संसर्ग लवकर लक्षात येत नाही. मी आजाराला तोंड देऊन बाहेर पडलो. कोरोनाच्या आजाराला सहजपणे बघू नये, घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावा, शक्यतो गर्दीत जाणे टाळले पाहिजे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.







0 comments:
Post a Comment