जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 June 2020

गोडी ऑनलाइन शिक्षणाची;अडथळा अ‍ॅन्ड्राईड मोबाईलची

बिलोली:-कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन कुठल्याही निर्णयापर्यंत अद्याप पोहचू शकले नाही. मात्र शिक्षणात विद्यार्थ्यांच्या खंड पडता कामा नये, यासाठी ऑनलाईन धडे देण्याची शासनाची तयारी असली, तरी अ‍ॅन्ड्राईड मोबाईल त्यातील सर्वात मोठी अडचण व अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे एका विशिष्ट वर्गातील मुलांची सोय करणारे ठरू शकते,त्यामुळ गोडी ऑनलाइन शिक्षणाची आणि अडथळा अ‍ॅन्ड्राईड मोबाईचा अशी गत आहे.

शाळा सुरु होणार्‍या नसल्याने राज्यस्तरीय शिक्षण परिषदेकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाची तयारी करून घेण्याचे प्रयत्न चालविले जात आहेत. यासाठी ऑनलाइन शिक्षण देणारे अ‍ॅप ही विकसित करण्यात आलेले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मास्टर ट्रेनर हे जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देणार ते प्रशिक्षण घेतलेले शिक्षण तालुकास्तरावर जिल्हा परिषदमधील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ऑनलाईन पाठयक्रमाचा अभ्यास पूर्ण करणार आहेत.

या सगळया प्रक्रियेत शिक्षण देण्यासाठी लेकरांच्या हातामध्ये अ‍ॅन्ड्राईड मोबाईल आवश्यक असणार आहे. ग्रामीण भागात शंभर टक्के पाल्यांच्या पालकांकडे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असू शकतात, असे थोेडे आहे. तरी शासनाने प्रत्येक पालक हे त्यांच्या मुलांना अ‍ॅन्ड्राईड मोबाईल घेऊन देतील, किंवा त्यांच्याकडे मोबाईल देऊन टाकतील, असा अंदाज बांधला असावा, कदाचित त्यामुळे ऑनलाइन शिक्षण अ‍ॅन्ड्राईड मोबाईलवर देण्याचा धाडसी निर्णय सरकारने घेतला असवा.

या संदर्भात राज्यस्तरीय शिक्षण परिषदने प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकार्‍यांची व्हिडिओ कॉन्फ रंसिंग घेतली आहे. इजी टेक अ‍ॅपव्दारे लिंक पाठवून विशिष्ठ ठरलेल्या कालावधीत शिकवणी दिली जाणार आहे. सदरचा प्रयोग खासगी शाळांनी सुुरु केला, असून राज्य शासन जिल्हा परिषदमधील शाळांसाठी अवलंब करण्यास तयार झाले आहे. या ऑनलाइन शिक्षणास विद्यार्थी व पालकांचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

0 comments:

Post a Comment