जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 June 2020

कुंडलवाडी खून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

बिलोली(ता.प्र): कुंडलवाडी येथील पोतन्ना आरसेवार यांचा खून केवळ एकाच व्यक्तीने केला नसून या खुनात आणखी काही लोकांचा असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी , अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे . कुंडलवाडी येथील पोतन्ना भुमन्ना आरसेवार यांचा ( ता . पाच ) मे रोजी कुंडलवाडी येथील त्यांच्या नवीन बांधकामाच्या घराशेजारील रस्त्यावर रात्रीच्या वेळेत डोक्यात कु - हाडीने वार करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली होती . दरम्यान , त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले असता तीन दिवसांनंतर म्हणजेच आठ मे रोजी दवाखान्यात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले . याप्रकरणी कुंडलवाडी पोलिस ठाण्यात प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र , पोलिसांनी प्राथमिक चौकशी असता मयत पोतन्ना आरशेवार यांचा खून चुलत पुतण्याने केल्याची माहिती उघड झाली . त्यानंतर पोलिसांनी या खुनास जबाबदार गणपत आरसेवार यांना अटक केली . आरोपी गणपत आरशेवार यांनी खून केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली . न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती . या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी केली जात असताना आरोपीने अन्य काही लोकांची नावे घेतल्याची चर्चा कुंडलवाडी होत आहे . मात्र , कुंडलवाडी पोलिसांनी राजकीय दबावाला व आर्थिक प्रलोभनाला बळी पडून केवळ गणपत आरसेवार या एकास ताब्यात घेऊन पुढील चौकशीला पूर्णविराम दिल्याची तक्रार मयताचा मुलगा अनिल पोतन्ना आरसेवार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांसह राज्याचे गृहमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . कुंडलवाडी येथील आरसेवार खून प्रकरणात अन्य चार ते पाच लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी , अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे .


0 comments:

Post a Comment