जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

05 June 2020

उमरीत दोन घर फोडले ; 55 हजारांचा ऐवज लंपास

उमरी :येथील आपले घरबंद करून दोन कुटूंब बाहेरगावी गेले होते . याचा फायदा घेत चोरट्यांनी दोन्ही घरे फोडून त्यातील 55 हजारांचा ऐवज लंपास केला आहे .ईस्लामपूरा , उमरी येथील रहिवासी हनमनलू मारोती कोंडेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जूनच्या सायंकाळी 6 ते 3 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान ते आणि साक्षीदार अर्थात त्यांचया शेजारचे व्यक्ती आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते . चोरट्यांनी या दोन्ही घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 40 हजार रुपये रोख रक्कम आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी 15 हजार रुपयांची असा 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे . उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत .

0 comments:

Post a Comment