जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 June 2020

बिलोली नर्सी महामार्गावर अपघात:दोन ठार एक गंभीर जखमी

बिलोली :तालुक्यातील कासराळी येथून काही अंतरावर अंतरावरील कमल पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकी स्वारांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याने २ जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . बिलोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या कमल पेट्रोल पंपाजवळ गेल्या अनेक वर्षापासून अपघातांचे प्रमाण वाढत चालले असून कासराळी पासुन ते विजयनगर पर्यंत च्या भागातील झालेल्या आजपर्यंतच्या अपघातात अनेक जणांचा जीव गेला आहे , त्याचप्रमाणे आज गुरूवार रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास कासराळी येथिल ठक्करवाड यांच्या पेट्रोल पंपासमोर अतिवेगात दोन दुचाकी स्वारांनी गाडी चालवल्याने एकामेकांची समोरासमोर धडक झाली . हा अपघात इतका गंभीर होता की यात दोन्ही दुचाकीच्या अक्षरशः चुराडा झाला .यामध्ये बिलोली तालुक्यातील धुप्पा येथील गौस खान अब्दुल खान  व कुडंलवाडी येथील सिध्देश्वर विश्वनाथ स्वामी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सय्यद फराज सय्यद खमरोद्दीन रा . रंजेलबेस ता . बोधन जि . निझामाबाद हे गंभीर जखमी झाले आहेत . यातील जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.न. १०२/२०२० कलम २७ ९ / ३३७ / ३३८ / ३०४ भादवी नुसार बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केंद्रे हे करित आहेत .

0 comments:

Post a Comment