जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 June 2020

दिवसभरात तीन वाढले; सोळा घरी परतले

नांदेड: कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी यातील समाधानकारक बाब म्हणजे, दिवसाकाठी कोरोनाच्या आजारातून बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण वाढत असून दिवसभराच्या काळात कोरोनामुळे उपचार घेत असलेल्या सोळा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत.आजच्या 116 अहवालांपैकी 108 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

सोमवार दि.1 मे रोजी सकाळी 24 स्वॅब तपासण्यात आले होते. यामध्ये 3 स्वॅब कोरेाना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये तिन्ही पुरुषांचा समावेश आहे. दोन रुग्ण देगलूर नाका व एक रुग्ण शिवाजी नगर भागतील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 149 इतकी झाली आहे. सोमवारी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 8, मुखेड-2, उमरी-4, माहुर येथील एक व विवेक नगर भागातील मुंबई संदर्भित एक असे सोळा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णालयातून सुट्ट देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 120 तर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख 21 इतकीच राहिली आहे.

यापूर्वी चार रुग्णांची प्रकृती गंभीर होती. यातील एक रुग्ण धोक्याबाहेर आला, असून तीन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यात दोन महिला ज्यांचे वय प्रत्येकी 52, 65 व एका पुरुष (38) समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.

0 comments:

Post a Comment