जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 June 2020

आळंदी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 295 वी जयंती साजरी

 बिलोली: तालुक्यातील मौजे.आळंदी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या जयंती निमित्त त्यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.अहिल्याबाई होळकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते .त्याप्रमाणे याही वर्षी ही जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन सुरू असतानाच कोरोना या भयानक व्हायरस ने डोके वर काढले आहे . भारतातही त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोना ने अक्षरशः थैमान घातले आहे . त्याचाच परिणाम म्हणून यावर्षी अहिल्याबाई होळकर  यांच्या जयंती निमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता काही नागरीकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.यावेळी बिलोली- देगलूर विधानसभा युवक काँग्रेस चे सहसचिव संगनाळे ज्ञानेश्वर आळंदीकर, बाळासाहेब चट्टे, गोविंद येसके,सदानंद अब्दागिरे, प्रकाश चिंतले, गंगाधर वडजे व  गावातील सर्व जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

0 comments:

Post a Comment