नांदेड:- रविवारी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. 8 जून रोजी सकाळी घडली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे.
नांदेड शहरात रविवारी दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते. यामध्ये गुलजार बाग येथे राहणार्या एका 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. या महिलेची प्रकृती रुग्णालयात आणण्यापूर्वीच गंभीर होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना सोमवार दि.8 जून रोजी मृत्यू झाला.
——
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 192 झाली. 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 52 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला.







0 comments:
Post a Comment