नांदेड दि . 11 : - लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये गोवा गुटखा 30 बोरी अंदाजे 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक , वाहतूक , विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून अन्नपदार्थाची कोणीही छुप्या , चोरट्या पद्धतीने विक्री , उत्पादन , साठा , वाहतुक करु नये , असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तु . चं . बोराळकर यांनी केले आहे . लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्र . के . ए . 38-6482 या वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थाची 10 जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी तपासणी केली . यावेळी 1 हजार गोवा गुटखा 30 बोरी जवळपास 18 लाख 72 हजार किंमतीचा आढळून आला . गुलबर्गा ( कर्नाटक ) जिल्ह्यातील पडसावली ( ता . आळंदा ) येथील आरोपी रुखमोद्दिन इमाम इमानदार वय वर्षे 28 यांच्या विरुद्ध माळाकोळी पोलीस स्टेशन येथे अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला . मा . न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुगंवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे . अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु . चं बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड , सुनिल जिंतूरकर व नमुना सहायक अमरसिंग राठोड यांनी केली.
11 June 2020
Home »
» माळाकोळी पोलीसांची धडक कारवाई 18 लाख 72 हजार रुपयाचा गुटखा जप्त संबंधितांवर गुन्हा दाखल







0 comments:
Post a Comment