जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 June 2020

सात लाख लुटले पण; काही तासात पोलिसांच्या हाती लागले

नायगाव:– पाळत ठेवून असलेल्या तिघा जणांनी दुचाकीवर जाणार्‍या दुचाकीस्वारांचा पाठलाग करत हवेत गोळीबार आणि व्यापार्‍यांना चाकीचा धाक दाखवून सव्वा सात लाख रुपये लुटले, मात्र तासाभरात ते तिघे रामतीर्थ पोलिसांच्या हाती लागले, ही घटना नरसीपासून एक किलोमीटर अंतरावर बिलोली रोडवर दि. 1 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासराळी येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांचे मुखेड येथील एका व्यापार्‍याकडून 7 लाख 24 हजार रुपये येणे होते. उपलंचवार यांचा मुनीम असलेल्या आनंदा सोमवारी सायंकाळ मुखेड येथे जाऊन रक्कम रात्री नरसी येथे आला. तेथून उपलंचवार व आनंदा हे दोघे मोटरसायकलवर कासराळीकडे जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करत लोहगावच्या वळणावर मोटारसायकल आडवून मुनीमाच्या हातातील पैशाची बँग हिसकावून घेतली.

मुनीम बँग सोडत नसल्याने चाकूचा धाक दाखवताच मुनीम बँग सोडून पळाला. मात्र उपलंचवार यांनी एका दरोडेखोराला पकडून ठेवताच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला.त्यामुळे उपलंचवार यांना दरोडेखोराला सोडून द्यावे लागले. पैशाची बँग हिसकावून त्यांनी पळ काढला. तिनही दरोडेखोरांनी मोटारसायकल जाग्यावरच सोडून लोहगाव शिवाराच्या दिशने पळ काढला.
घटनेची माहिती समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या पथकाने नरसी शिवारातून तिघांना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ता राठोड यांनी रात्रीच नरसी व घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

0 comments:

Post a Comment