जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 June 2020

आजपासून केस कर्तनालय बंद;अंत्यविधीला नियम लावले

नांदेड: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नवे आदेश जारी केले, असून यामध्ये सोमवार दि. 1 जून पासून केश कर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटीपार्लर चालू ठेवण्यासंदर्भात दिलेली मुभा रद्द करण्यात येत असल्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे उद्यापासून केस कर्तनालय आदी दुकाने चालू ठेवता येणार नाहीत.मागच्या आठवडयात दि. 22 मे रोजी काही अटी व नियमांना अधिन राहून केश कर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटीपार्लर चालू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दुकाने ही सुरु झाली होती. परंतु या स्वतःच्या आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे रविवार दि. 31 मे रोजी रात्री उशिरा बदल करत नवे आदेश काढले आहेत. त्याच सोबत टाळेबंदीच्या काळात सायंकाळी नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यामध्ये मात्र अधिकारी/कर्मचारी व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मुभा असणार आहे.
—–
अत्यंविधीच्या नियमात ही सुधारणार
जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दि. 22 मे रोजी अंत्यविधीसाठी पन्नास लोक एकत्र येऊ शकतात, असे आदेश दिले होते. यात ही सुधारणा करत यापुढे अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक लोक एकत्र येता नसल्याचे डॉ. इटनकर यांनी आदेशात नमूद केले. या नव्या आदेशामध्ये टाळेबंदीबाबत अधिक नियम कडक केले आहेत.

0 comments:

Post a Comment