जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

07 June 2020

शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानदाराकडुनच खते,बियाणे खरेदी करावीत ;देगलूर कृषी विभागाचे आवाहन

देगलूर - येथील बाजारामध्ये पुरेशा प्रामाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत . शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना अधिकृत दुकानदारांकडूनच खरेदी करावीत . दुकानदारांकडून पक्के बील घ्यावे व बियाणाचे बील , पिशवी व लेबल जपून एम.आर. पी . पेक्षा जादा दराने बियाणे / खते खरेदी करू नयेत . जर कोणी दुकानदार एम.आर.पी.पेक्षा जादा दराने विक्री करीत असेल तर लगेच कृषी विभागाशी संपर्क साधावा , असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे . तालुक्यातील शेतकऱ्यांनी पे रणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत . देगलूर तालुक्याचे लागवाडीलायक क्षेत्र ५८८१३ हे असून , या खरिपामध्ये ५७४५० हे क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे . यामध्ये सोयाबीन हे मुख्य पीक असून कापूस , तूर , मूग , उडीद , ख . ज्वारी या पिकांची पेरणी केली जाते . यंदा सरासरी एवढा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे . शेतकरी बाजारामधून खते व बियाणे खरेदी करीत आहेत . बाजारा मध्ये पुरेसे प्रामाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत . शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना अधिकृत दुकानदारांकडूनच खरेदी करावित . दुकानदारांकडून पक्के बील घ्यावे व बियाणाचे बील , पिशवी व लेबल जपून ठेवावे . एम . .आर.पी.पेक्षा जादा दराने बियाणे / खते खरेदी करू नयेत , जर कोणी दुकानदार एम.आर.पी पेक्षा जादा दराने विक्री करत असेल तर लगेच कृषी विभागाशी संपर्क साधावा . शेतकऱ्यांनी ७५-१०० मीमी पाऊस पडल्यानंतरच पेरणीस सुरवात सुरवात करावी . पेरणी करताना उताराला आडवी पेरणी करावी . पिकांची फेरपालट करावी . पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशक व जैविक संघाची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी . सोयाबिन , तूर , मूग व उडीद या पिकांची BBF पेरणीयंत्राद्वारे पेरणी करावी . Bbf वर पेरणी केल्यास पाऊस कमी झाल्यास किंवा जास्त झाल्यावरही फायदा होतो . सोयाबिन पिकाचे बाबतीत शेतकऱ्यांनी घरचे पेरणीयोग्य बियाणे पेरणीसाठी वापरावे . घरचे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवणशक्ती तपासावी . उगवणशक्ती ७० % आल्यास एकरी ३० किलो बियाणे पेरावे व उगवणशक्ती ६० % आल्यास एकरी ३५ किलो बियाणे पेरावे . ६० पेक्षा कमी उगवणशक्ती आल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये . त्याचबरोबर बियानास पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करावी . कापूस पिकामध्ये मूग / उडीद ही आंतरपिक घ्यावे . कपाशीची ठिबकवर लागवड केल्यास उत्पन्नात वाढ होते . शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कडुलिंबाच्या झाडावरील वाळलेल्या निंबोळ्या गोळा करून ठेवाव्यात . या निंबोळ्याचा वापर पिकावरील किडनियंत्रणासाठी करता येणार आहे . शेतकरी गटामार्फत निविष्ठा खरेदी कराव्यात तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कोरोना आजाराचे पार्श्वभूमीवर खरिप पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा ( बियाणे , खते किटकनाशके ) खरेदीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी एकएकट्याने बाजारामध्ये येऊन येऊन गर्दी करू नये . शेतकऱ्यांनी एकत्रीतपणे शेतकरी गटामार्फत / समूहामार्फत निविष्ठा खरेदी कराव्यात . शेतकरी गट / समूहामधील फक्त एका सदस्याने बाजारामध्ये येऊन सर्व शेतकऱ्यांच्या निविष्ठा खरेदी कराव्यात . यामुळे बाजारामधील गर्दी टाळता येईल व शेतकऱ्यांचा वाहतूक वेळदेखील वाचणार आहे , असे आवाहन कृषी विभाग देगलूरच्यावतीने करण्यात आले आहे .


0 comments:

Post a Comment