जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 June 2020

अवैध वाळू वाहतूकवर तहसील प्रशासनाची धडक कार्यवाही अजून एक अवैध वाळूचा ट्रक जप्त

भोकर:संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी भोकर तालुका प्रशासन काटेकोर प्रयत्न करून प्रशासकीय कामात व्यस्त आहेत याचाच गैरफायदा घेत  तालुक्यातील वाळू माफिये रेती  घाटातुन अवैध वाळू उत्खनन जोमात करून उत्खनन करण्यात आलेले अवैध वाळू साठा छुप्या मार्गाने तालुक्यात आणून जास्तीच्या दराने विकत आहेत.नुकतेच मागील आठवड्यात तहसील कार्यालया मार्फत एक अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली होती. तहसिल प्रशासन एवढे कारवाया करून सुद्धा अवैध रेती वाल्यांना कोणताच धाक बसत नाही याचे कारण काय असावे..? रोज रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक सुरूच आहे. आणखी एक ट्रक पकडण्यात आला आहे.दिनांक ५ जून 2020 च्या रात्री ११ च्या दरम्यान मौ.भोसी येथे एक टिप्पर अवैध रीत्या  वाळू   वाहतूक करताना आढळून आला  नायब तहसिलदार संजय सोलंकर यांना तपासणी दरम्यान आढळून आला सदरील वाहन क्रमांक एम.एच.,२६, ए.डी., १२५४, वाहन मालक  पिंटू पाटील,रा.वासरी,ता.मुदखेड व वाहन चालक विठ्ठल भुजंग उमाटे रा.वासरी,ता.मुदखेड,  यांच्यावर दंडात्मक कार्यवाही साठी ते वाहन जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे सदरील कार्यवाहीसाठी पथकात सुरेश कपाटे (मंडळ अधिकारी मातुळ)यांचा सहभाग होता.सदरील वाहन भोकरचे उपजिल्हाधिकारी पवन चांडक यांच्या आदेशाने व सूचनेनुसार करण्यात आले आहे.गेल्या आठवड्या पासून तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली. सर्वसाधारणपणे खुल्या ट्रक, ट्रॅक्‍टर व डंपरमधून वाळू वाहतूक केली जाते. परंतु ही वाहने खुली असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे सहज शक्‍य होते. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी आता त्यावर इलाज शोधून वाळू वाहतुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. मालवाहू बंदिस्त ट्रकमधून वाळू वाहतूक होत असून, ट्रक बंदिस्त असल्याने वाळू दिसत नाही आणि इतर वाहनांपेक्षा अधिक साठा वाहून नेला जाऊ शकतो,  म्हणून ही पद्धत अलीकडे सर्रास सुरू आहे.असेच काही मालवाहू बंदीस्त वाहन ज्यांच्यावर धनलक्ष्मी आहे ते वाहन किनवट रोड ने हिमायतनगर च्या पुढे जात आहेत या कडे प्रशासना ने लक्ष द्यावे अशी चर्चा भोकर शहरात होत आहे

0 comments:

Post a Comment