नांदेड : राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठनेते डी.पी.सावंत यांनी गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे जनतेची सेवा केली आहे.तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विविध कामे त्यांनी मार्गी लावले आहेत . त्यांनी उत्तर विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यात विकासाची गंगा आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.श्री.सावंत हे उच्चशिक्षित व अभ्यासु व्यक्तिमत्व असुन सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , शेतकरी ,दीनदुबळ्यांचा आवाज म्हणुन ओळखले जातात . त्यांच्या आजवरच्या कार्यकाळातला अनुभव पक्षाचा हितासाठी फायदेशीर ठरेल आणि भविष्यातही कार्यकर्त्यांना बळ मिळेल . काँग्रेस पक्ष वाढविण्यात त्यांचे योगदान हे लक्षणीय आहे . मागील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधे काँग्रेसने जी विक्रमी मजल मारली.त्यात माजीमंत्री सावंत यांचा मोलाचा वाटा आहे.माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्व.बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सावंत यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आपले जीवन पक्षाला समर्पित केले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा जनतेची कामे करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी , अशी मागणी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी मागासवर्ग विभागाचे उपाध्यक्ष अजय एडके यांनी पक्षश्रेष्ठिना केली आहे .
13 June 2020
Home »
» माजी मंत्री डि पी सावंत यांची विधानपरिषदेवर निवड करावी :अजय एडके







0 comments:
Post a Comment