जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

06 June 2020

लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्मचारी व आरोग्य सेवा देणाऱ्यांची भोजन व्यवस्था करणाऱ्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांचा सन्मान

धर्माबाद - येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात पोलीस प्रशासन , आरोग्य सेवा यांना भोजन आहाराची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी सर्व सेवेकऱ्यांचा सन्मान केला . अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गरूपीठ जिल्हा नाशिक अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र ( दिंडोरी प्रणीत ) धर्माबाद जिल्हा नांदेडच्यावतीने covid 19 कोरोना महामारीमुळे जगभर हाहाकार झाल्यामुळे भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने कलम १४४ अर्थात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे व १२५ कोटी जनता जनार्धन सांभाळ ( सुरक्षा ) करण्याची वेळ पोलीस प्रशासन वर आली . तसेच आरोग्याची जबाबदारी डॉक्टरवर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामाजिक संस्था म्हणून आपण जीच्याकडे अगदी हक्काचे समजतो ती नगरपालिका कर्मचारी यांची काळजी घेण्याची जबाबदारी प . पू . गुरुमाऊलींनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक केंद्राने जमेल त्या पद्धतीने खारीचा वाटा उचलण्यात मोलाची भूमिका बजा वताना आपण डोळ्याने पाहिली . याचाच एक महत्वाचा भाग म्हणून धर्माबाद केंद्राच्यावतीने दिनांक २५ मार्च २०२० रोजी प्रब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंती निमित्त पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नागनाथ सलग्ल्ले यांच्या परवानगीने पोलीस मित्रांना प्रसाद देण्यात आला . ठिकाणी पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील , पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांची सेवेकरी यांच्या सोबत भेट झाल्यामुळे पुढील जेवणासाठी नियोजन ठरले आणि बघता बघता ७० दिवसांपासून कोरोनाशी झुंज देणारे खऱ्या । अर्थाने आजचे यशदायी योद्धे पोलीस कर्मचारी , आरोग्य आधिकारी , नगरपालिका कर्मचारी व गरजूंना धर्माबाद केंद्राच्या माध्यमातून सेवेकऱ्यांच्यावतीने सतत १ / २ / ३ / आणि ४ लॉकडाऊनमध्ये ३१ मे २०२० पर्यंत जेवण ( प्रसाद ) पुरवण्याची संधी मिळाली . हे सर्व करत असताना पोलीस प्रशासन धर्माबाद यांनी दखल घेऊन उत्कृष्ट कार्य बजावले असता धर्माबाद येथील सेवेकऱ्यांचा पोलीस स्टेशनमध्ये मानसन्मान केला . या सन्मानामुळे सेवेकऱ्यांना अधिकच उर्जा प्राप्त झाली असल्याचे बोलले जाते .

0 comments:

Post a Comment