नांदेड:माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनेच्या खांदावर भाजपा महिला आघाडी महानगराध्यक्षपदाची कमान सोपविण्यात आली आहेश. विशेष म्हणजे डॉ. मिनल खतगावकर या जिल्हा परिषद सदस्या असून त्यांची ग्रामीण सक्रिय सदस्य म्हणून नोंदणी असताना महिला आघाडी महानगराध्यक्षपदाची कमान सोपविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाच प्रकारच्या दोन नियुक्त्यांवर भाजपमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या महामारीचा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे असताना नांदेड जिल्ह्यात भाजपाअंतर्गतत पक्ष बांधणीची मशागत सुरु आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा योग साधून भाजपकडून काही पदाधिकार्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉ. मिनल खतगावकर या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ सर्कलच्या भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागच्या वेळी नायगाव मतदारसंघातून त्या इच्छूक होत्या.परंतु भाजपने राजेश पवार यांना उमेदवारी दिली, आणि ते विजयी ही झाले.अभ्यासू तरूण राजकारणी महिला म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातून त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणन नेतृत्व करत असताना पक्षाने त्यांच्यावर महानगराची जबाबदारी सोपविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले किशोर देशमुख यांना भाजप युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तर संजया घोगरे यांच्यावर युवा मोर्चा महानगराध्यक्षपदी नियुक्ती दिली आहे.
—–
नियुक्तीवरून पक्षात नाराजी
नियुक्ती करताना पक्ष पदाधिकार्यांची बैठक किंवा म्हणणे न विचारात घेता नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे पक्षातील काही पदाधिकार्यांचे म्हणणे असून या संदर्भात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन मंत्री भाऊराव देशमुख तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणविस यांच्याकडे ही पक्षातील पदाधिकार्यांनी तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे.







0 comments:
Post a Comment