जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

19 December 2022

भोकर तालुक्यात सर्वाधिक 89.34 टक्के मतदान

नांदेड:दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 89.34 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड तालुक्यात 71.19 टक्के, अर्धापूर तालुक्यात 88.01 टक्के, हदगाव तालुक्यात 84.12 टक्के, हिमायतनगर तालुक्यात 88.06 टक्के, किनवट तालुक्यात 82.25 टक्के, माहूर तालुक्यात 81.96 टक्के, धर्माबाद तालुक्यात 83.63 टक्के, उमरी तालुक्यात 88.84 टक्के, , बिलोली तालुक्यात 85.84 टक्के, नायगाव तालुक्यात 86.82 टक्के, देगलूर तालुक्यात 86.68 टक्के, मुखेड तालुक्यात 73.39 टक्के, कंधार तालुक्यात 81.69 टक्के, लोहा तालुक्यात 86.57 टक्के एवढे मतदान झाले आहे.सार्वत्रिक निवडणूक 160 ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आली. यामध्ये नांदेड तालुक्यात 6 ग्रामपंचायती, अर्धापूरमध्ये 2, भोकर 3, हदगाव 4, हिमायतनगर 1, किनवट 50, माहूर 26, धर्माबाद 2, उमरी 1, बिलोली 8, नायगाव 8, देगलूर 1, मुखेड 14, कंधार 12, लोहा 22 अशा एकुण 160 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबविला गेला. यातील 160 ग्रामपंचायतीसाठी एकुण 489 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यात एकुण 77 हजार 467 स्त्री मतदार तर 84 हजार 563 पुरूष मतदार व इतर दोन मतदार अशी एकुण 1 लाख 62 हजार 32 मतदार संख्या होती. यापैकी 62 हजार 999 स्त्री मतदार, 70 हजार 179 पुरूष मतदार असे एकुण 1 लाख 33 हजार 178 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी टक्केवारी 82.19 एवढी होते.

उद्या सकाळी 9 पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी

नांदेड  :- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून पुढे सुरू केली जाईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह, प्रशासकिय इमारत येथे सकाळी 9 वा. मतमोजणी सुरू होईल. अर्धापूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा., भोकर येथे तहसिल कार्यालय तळमजला येथे सकाळी 10 वा. हदगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वा., किनवट येथे तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 वा., माहूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., धर्माबाद येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू होईल. उमरी येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. , बिलोली येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., नायगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., मुखेड येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., कंधार येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., लोहा येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. तर देगलूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

16 December 2022

जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम

नांदेड :- जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ऑटोरिक्षांची विशेष तपासणी मोहिम सोमवार 19 डिसेंबर ते रविवार 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ऑटोरिक्षा संबंधित सर्व बाबींची काटेकार तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद ऑटोरिक्षा वाहन चालक / मालक यांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना ऑटोरिक्षा, योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेली ऑटोरिक्षा चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारच्या वाहनांची प्रभावीपणे तपासणी व दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागासोबत विशेष ऑटोरिक्षा वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ऑटोरिक्षा चालक/मालकांनी ऑटोरिक्षाचे सर्व विधीग्राह्य कागदपत्रे सोबत बाळगावीत. ऑटो रिक्षा चालकांनी युनिफॉर्म / बॅज घालावे. वाहनांवर मीटर / नो एन्ट्री बार लावून वाहन चालवावे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करु नये. विना परवाना प्रवासी वाहतूक करु नये. धोकादायक पध्दतीने वाहन चालवू नये. वाहनचालकाच्या बाजूला अनधिकृत सीट बसवू नये. नो पार्किंग / नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवू नये असे प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी

नांदेड, :- नांदेड जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी.

राज्य निवडणूक आयोगाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिले. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ऐवजी कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल.मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासन परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी निर्गमीत केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश

नांदेड, :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, टि.डी - 1 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.जिल्ह्यात मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियम, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

09 December 2022

श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड : - माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे . त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 20 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्रीपासून ते 28 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा . पोलीस निरीक्षक माणिक डोके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत . श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र , तेलंगणा , आंध्रप्रदेश , कर्नाटक , इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते . त्या अनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी . अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल . सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा - अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा - अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल . सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये , घाटांत किंवा घाटांवर , सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या , कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये , जत्रा , देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबद्दल . तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी . महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 , 35 ते 40 , 42 , 43 , 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणे कामी योग्य आदेश देण्याबाबत . कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा . पोलीस निरीक्षक माणिक डोके यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख , वेळ , जाहीर सभा , मोर्चे , मिरवणूक , निदर्शने , पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे . परवानगी दिलेल्या जाहिर सभा / मिरवणूका / पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये . हा आदेश लग्नाच्या ठिकाणी , प्रेत यात्रेस लागू नाही . या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल , असे आदेशही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत .

17 November 2022

तंबाखू नियंत्रण पथकामार्फत भोकर येथे 15 विक्रेत्यांवर कारवाई

 नांदेड दि . 17 : - भोकर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने भोकर येथे अचानक धाडी टाकली . या धाडीत 15 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली असून या विक्रेत्यांना 9 हजार 300 रुपयाचा दंड आकारला आहे . ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . नीलकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ . हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . या पथकात जिल्हा सल्लागार डॉ . साईप्रसाद शिंदे , कार्यक्रम व्यवस्थापक डॉ . उमेश मुंडे , मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पी . एन . बाचेवाड आदी होते . सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय , निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास , जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष , जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .

05 November 2022

काँग्रेसचे नेते माजी मंत्री नसीम खान यांचा बिलोलीमध्ये अपघात पायाला दुखापत

बिलोली: महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री आरिफ नसीम खान (Naseem Khan Congress) यांच्या गाडीला बिलोलीमध्ये (Nanded News) अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातात नसीम खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. भारत जोडो यात्रेसाठी (Bharat Jodo) नसीम खान हे हैद्राबादहून नांदेडला येत होते. नसीम खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. ते हैदराबादहून नांदेडच्या दिशेने 7 तारखेला पोहोचत असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निघाले होते.नसीम खान हे नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे प्रभारी असून नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे संपूर्ण व्यवस्थापन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत करत आहेत.  या अपघाताचं वृत्त समजताच ज्येष्ठ नेते एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात व इतर ज्येष्ठ नेत्यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली आहे.अपघातानंतर नसीम खान यांनी म्हटलं आहे की, "माझ्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, मी सुखरूप आहे. भारत जोडो यात्रेचे प्रभारी म्हणून माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी उत्सुक आहे. मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या 3 बैठका पूर्ण केल्या आहेत. आम्ही नांदेडला पोहोचलो आहोत. मला खूप आनंद वाटतो की नांदेड जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत ऊर्जेने आणि प्रेमाने स्वागत होईल.नांदेडमधील बिलोली टोल प्लाझा येथे एका कारची आणि नसीम खान प्रवास करत असलेल्या कारची धडक बसली.  अपघात इतका जोरदार होता की दोन्ही गाड्या चक्काचूर झाल्या आहेत. या घटनेत नसीम खानसह गाडीचा चालक जखमी झाला.
 
घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत आरिफ नसीम खान आणि इतरांना प्रथमोपचार किट देऊन मदत केली. बिलोली काँग्रेसच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्याने बिलोली वाहतूक पोलिस ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली आहे.

02 November 2022

पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड जिल्हा दौरा

नांदेड दि . 2 : - राज्याचे ग्रामविकास , पंचायतराज , वैद्यकिय शिक्षण , क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील . गुरूवार 3 नोव्हेंबर 2022 रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथून रात्री 9 वा . मुखेड तालुक्यातील वसंतनगर येथे आगमन व आमदार डॉ . तुषार राठोड यांच्या निवासस्थानी राखीव . त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण व मुक्काम . शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वा . शासकीय विश्रामगृह नांदेड येथून गुरूद्वारा नांदेडकडे प्रयाण . सकाळी 8.45 वा . गुरूद्वारा नांदेड येथे आगमन . सकाळी 8.45 ते 9.30 वाजेपर्यंत गुरूद्वारा दर्शन . सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत डॉ . अजित गोपछडे यांच्या निवासस्थानी राखीव . सकाळी 10.30 वा . जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण . सकाळी 10.45 वा . जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन . सकाळी 10.45 ते 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राखीव . सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठक . दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी राखीव , स्थळ फुलेनगर नांदेड .दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी राखीव , स्थळ वसंतनगर नांदेड . दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत महानगर जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट , स्थळ भाग्यनगर नांदेड . दुपारी 3 ते सायं . 5 वाजेपर्यंत कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती , स्थळ हॉटेल विसावा पॅलेस एम . आय . डी.सी. नांदेड . सायं . 5 वा . भाजपा जिल्हा कार्यालयास भेट , स्थळ आनंदनगर नांदेड . सायं . 6.15 हजुर साहिब रेल्वे स्थानक नांदेडकडे प्रयाण . सायं . 6.45 वाजता हजुर साहिब रेल्वे स्थानक नांदेड येथे आगमन . सायं 6.50 वा . देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील . 

16 October 2022

शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीसाठी 22 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ

नांदेड  :- राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही आपली - पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या मान्यतेने मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोंबर 2022 पर्यंत वाढचिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी 23 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर 2022 असा करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी करण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ आहे.

जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक तसेच मंडळ कृषि अधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन राज्य समन्वय, ई-पीक पाहणी प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.

राज्यव्यापी केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. सध्या खरीप 2022 हंगामाची पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2022 च्या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई - पीक पाहणीचे 2.0.4 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल अॅपद्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

15 October 2022

हरभरा बियाणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

नांदेड  :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2022-23 अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण (दहा वर्षा आतील वाण) या घटकाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लि. कृषक भारती को ऑप या बियाणे वितरण संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या अनुदानावरील बियाण्याचा लाभ घेण्यासाठी 21 ऑक्टोबर 2022 महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी सहाय्यक मार्फत परमिट देण्यात येत आहे. प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे, महामंडळ राष्ट्रीय बीज निगम व कृषक भारती को. ऑप यांच्या वितरकांकडे परमिट देऊन अनुदान वगळता उर्वरित रक्कम देऊन हरभरा बियाणे खरेदी करावे.

या बियाणास 25 रूपये प्रती किलो अनुदान देण्यात येते. तसेच हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत प्रती शेतकरी एक एकर मर्यादेत अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये 10 वर्षाआतील वाणास (राज विजय -202.फुले विक्रम. फुले विक्रांत, एकेजी - 1109 - पिडीकेव्ही कांचन बीजी - 3062 पुसा पार्वती, बीजीएम 10216 पुसा ) रुपये 25 प्रती किलो व 10 वर्षावरील वाणास (जॉफी -9218 विशाल, दिग्विजय विजय, विराट) रूपये 20 प्रती किलो अनुदान वगळता उर्वरित रक्कम महाबीज वितरकाकडे देऊन खरेदी करावे. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे अंतर्गत 3202 क्विंटल बियाणे व हरभरा ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत 11919 क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

14 October 2022

जिल्ह्यातील नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करण्यास प्रतिबंध

नांदेड  :- जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदी पात्राच्या दोन्ही बाजुस मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांमार्फत नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन व तीच रेती अवैध वाहतुकीद्वारे उपलब्ध होत असल्याचे आढळून येत आहे. परप्रांतीयांच्या माध्यमातून नदी पात्रातून तराफे, बोट इत्यांदीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खनन, साठवणूक व वाहतूक करू नये. यासाठी सदर ठिकाणी 15 ऑक्टोंबर ते 14 डिसेंबर 2022 पर्यंत ट्रॅक्टर मालक, त्यांचे नोकर, ट्रक्टर चालकांना याठिकाणी रेती उत्खनन करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे.

रेतीची वाहतूक, उपसा करण्यास प्रतिबंध करण्यास तसेच नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदी पात्राच्या दोन्ही बाजुस मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करून ट्रक, टिपर, हायवा ट्रॅक्टर मालक व त्यांचे नोकर, चालकांनी रेती उत्खनन करू नये. त्याचप्रमाणे नदी लगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी इतरांनी अवैधरित्या रेतीचा साठा करू नये अथवा करू देऊ नये, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

धर्माबाद, बिलोली, माहूर, लोहा, भोकर, हिमायतनगर तालुक्यातील गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित

लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष
नांदेड :- जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली बिलोली तालुक्यातील आरळी, बावलगाव तसेच माहूर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही वे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंडी, कारेगाव बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, कांगठी, भोसी तसेच लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर, भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डीसीजची लक्षणे आढळून आली आहेत.

भारत सरकारचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त व बाधीत झालेली धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर, भोकर तालुक्यातीलनांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे. कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे. तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व खाजगी पदविकाधारकांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे

उपकर योजनेत कृषी साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड  :- जिल्हा परिषद उपकर योजना 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एच. पी / 5 एच. पी. ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, धान्य प्रतवारी करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, सोयाबीन प्लँटर, फुलशेती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देणे आहे. जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांनी या औजाराचा/कृषी साहित्यांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

09 October 2022

व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपी ताब्यात, अल्पवयीन आरोपीला दिल्ली पोलिसांनी गुजरातमध्ये पकडलं

नांदेड: येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांची 5 एप्रिल 2022 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. उद्योजक संजय बियाणी हत्याकांडातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदेड शहरातील शारदानगर स्थित संजय बियाणी यांच्या घरासमोरच भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. ज्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील नागरिकांत व व्यावसायिकांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शारदा नगर परिसरात सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास उद्योजक संजय बियाणी हे त्यांच्या गाडीने घरासमोर दाखल झाले. दरम्यान पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन मारेकऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली. ज्यात त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला. यातील दोन प्रमुख आरोपींपैकी गोळीबार करणारा आणि मोटारसायकल चालवत येऊन अंधाधुंद गोळीबार करणारा आरोपी दिल्ली पोलिसांनी जेरबंद केला आहे.

नांदेड पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT गठित केली होती. हे पथक देशाच्या सहा राज्यात आणि बाहेर देशाची वारीही करून आले. हे मुख्य आरोपी अटकेत आणण्यासाठी नांदेड पोलिसांनी जंग जंग पछाडले आणि आज दिल्ली पोलिसांनी गुजरातमधून सदर अल्पवयीन मुख्य आरोपीस ताब्यात घेतलं आहे. तब्बल सहा महिन्याच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना यातील मुख्य आरोपी पकडण्यात यश आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील मोहाली येथे गुप्तचर यंत्रणेच्या कार्यलयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. ज्यात सदर आरोपी हा सह आरोपी आहे. नांदेड येथील संजय बियाणी यांच्या हत्येनंतर सदर आरोपीने दिल्ली आणि इतर ठिकाणी असे अनेक गंभीर गुन्हे केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान सदर आरोपी हा 18 वर्षे वयोगटाच्या आतील अल्पवयीन आरोपी आहे. सदर अल्पवयीन आरोपी हा उत्तरप्रदेश येथील फैजाबाद येथील रहिवासी आहे. ज्यास दिल्ली स्पेशल सेलने गुजरात मधून ताब्यात घेतले आहे.

15 September 2022

मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने केला मामाचा खून

नांदेड - मामाच्या मुलीसोबत लग्न व्हावे यासाठी मामाला विचारलं असता मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिला , म्हणून भाच्याने मामाचीच हत्या केली . हि धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे . या प्रकरणातील आरोपी भाच्यास पोलिसांनी अटक केली आहे . पोलिसांकडून सध्या या प्रकरणी पुढील कारवाई केली जातेय . भाचा काहीही काम करत नाही , म्हणून मामाने आपली मुलगी देण्यास त्याला नकार दिला होता . ' हुंडा नको , पण लग्नासाठी मुलगी दे ' , अशी मागणी घालत भाचा मामाजवळ आला होता . पण मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भाच्याने टोकाचं पाऊल उचललं . नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली . अर्धापूर तालुक्यातील चाभरा इथं 9 सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर बालाजी दिगंबर काकडे हे झोपले होते . त्यावेळी त्यांच्यावर एकाने कुऱ्हाडीने वार करत हल्ला केला . गंभीर जखमी झालेल्या बालाजी काकडे याची निर्घृण हत्या करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला . हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला . त्यानंतर पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली होती . अखेर पोलिसांनी पाच दिवसांच्या आतच या हत्येचा छडा लावला आहे .या हत्याकांडप्रकरणाचं गूढ उकलण्यातही पोलिसांना यश आलंय.पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा लागला होता . त्यानुसार पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या बालाजी काकडे यांचा भाचा एकनाथ बंडू जाधव याला अटक केली होती . पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर एकनाथ जाधव याने गुन्हा कबूल देखील केलाय . हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं वय अवघं 19 वर्ष आहे.एकनाथ जाधव याने मामाकडे मुलीचा हात मागितला होता . पण एकनाथ काहीच काम करत नसल्याने मामाने मुलगी देण्यास नकार दिला होता . याचा राग मनात ठेवून एकनाथ याने मामा बालाजी यांचा खून केला . हत्या केल्याच्या 50 तासांत पोलिसांनी आरोपी एकनाथ याला बेड्या ठोकल्या होत्या . आता त्याने हत्येची कबुलीही दिली आहे . पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावला .

23 August 2022

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध

 नांदेड दि . 23 : - जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढला आहेत . जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 ( 1 ) अन्वये 31 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / धारक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे . या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत : चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी . हा आदेश 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 9 सप्टेंबर रोजी 24 वाजेपर्यंत श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील , डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले , वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास , ऱ्हदयास आरोग्यास , जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरीक्षततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / धारक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे . असेही आदेशात नमुद केले आहे .

मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि . 23 : - मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागतनगर , मालेगाव रोड नांदेड येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक , उच्च माध्यमिक , पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना नुतन प्रवेशासाठी 30 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत . यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही . अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी , असे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे . अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रक , सन 2021-22 या वर्षाचे तहसिलदार कार्यालयाने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्राची सत्यप्रत साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे . प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 22 ते 30 ऑगस्ट 2022 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील . या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील . विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल . या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे . विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो . मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  20 टक्के जागा राखीव आहेत . प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही , असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे .

अग्नीवीर भरतीतील उमेदवारांना प्रशासनाकडून उत्तम सोयी सुविधा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

 औरंगाबाद : देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेल्या तरूणांना लष्कर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे . औरंगाबाद शहरात होत असलेल्या अग्नीविरांच्या भरतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी भरतीतील उमेदवारांना सोयी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे . ही स्तुत्य अशी बाब आहे . जिल्हा प्रशासनानेही भरतीत सहभागींसाठी उत्तम
 भोजन , वाहतूक , स्वच्छता गृहे आदींची चोख व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले . महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळावा , मातृभूमीची सेवा आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवीर जनरल ड्युटी ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर ट्रेडसमन ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर तांत्रिक ( सर्व शस्त्र ) , अग्नीवीर लिपिक , भांडारपाल तांत्रिक ( सर्व शस्त्र ) या पदांसाठी भरती प्रक्रिया 13 ऑगस्टपासून शहरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानांवर सुरू झालेली आहे . भरती प्रक्रिया 08 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे . या निवड प्रक्रियेत पात्र उमेदवारांना 13 नोव्हेंबर रोजी सामाईक प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे . शिस्तबद्ध पारदर्शक , नि : पक्षपाती पद्धतीने व योग्य नियोजनाने भरती प्रक्रिया भरती अधिकारी प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे . औरंगाबाद , बुलडाणा , हिंगोली , जळगाव , जालना , नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील तरूण या भरतीत सहभागी झालेले आहेत . या भरतीत सहभागी उमेदवारांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी भोजनाची व्यवस्था केली आहे . भरतीत सहभागींना स्वयंसेवी संस्थांकडून भोजन देण्यात येते आहे . 
भरती प्रक्रिया परिसरात स्वच्छता राखली जावी , या उद्देशाने महानगर पालिकेने पाण्याची व्यवस्था , परिसर स्वच्छता , फिरते शौचालये आदींची याठिकाणी व्यवस्था केलेली आहे . भरती ठिकाणाहून उमेदवारांना बस स्थानक , रेल्वे स्थानक अथवा भरतीच्या दिवशी असलेल्या गावांमध्ये पोहोचविण्याची सोयही राज्य परिवहन महामंडळाने केलेली आहे . या सुविधेमुळे भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाने चांगली व उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाचे आभारही मानले आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाने भरती दरम्यान मैदानावर आवश्यक प्रकाश योजनेसाठी दोन जनरेटर्स , जिल्हा परिषदेने 10 शिक्षक , भरतीत कुणास इजा झाल्यास तत्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी , रुग्णवाहिका , पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मैदाने , राहण्याची व्यवस्था , एनआयसीद्वारा इंटरनेट सुविधा आदी सोयी भरती कालावधीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत . दररोज मध्यरात्री 12 वाजता भरती प्रक्रिया सुरू होऊन सकाळी सहा वाजेपर्यंत शिस्तबद्धरित्या व पारदर्शकपणे पार पाडल्या जात असल्याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी समाधानही व्यक्त केले आहे .

22 August 2022

कंत्राटी पदासाठी माजी सैनिकांची निवड चाचणी

 नांदेड दि . 22 : - औरंगाबाद स्मार्ट सिटी जड वाहन वाहतूक परवानाधारक अनुभवी 20 माजी सैनिक कंत्राटी ड्रायव्हर - कंडक्टरची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येणार आहे . ही निवड प्रक्रिया 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा . जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , नंदनवन कॉलनी , औरंगाबाद येथे राबवली जाणार आहे . यासाठी पात्रताधारक माजी सैनिक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ( डिस्चार्ज बुकची प्रत , आर्मी व सिव्हिल हेव्ही व्हेहिकल ड्रायव्हिंग लायसन्स आर्मी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इत्यादी ) उपस्थितीत रहावे . निवड चाचणीसाठी पात्रता सैन्य दलातील ट्रेड DSV ( Spl Veh ) / AM - 50 / Dvr / Dvr ( MT ) / DMT / Dvr GNR / Dvr ( AFT ) यापैकी असावा . दहावी / बारावी उत्तीर्ण आणि आर्मी ग्रॅजुएट शैक्षणिक आर्हता आवश्यक आहे . वैध प्रवासी बस वाहतूक परवाना PSVBUS ( TRV - PSV - Bus ) धारकास प्राधान्य . निवडक उमेदवारांनी MV Act नुसार कंडक्टर बॅच ( बिल्ला ) निवडीच्या / नियुक्तिच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत तयार करावा . सैन्य दलात हेवी व्हेहिकल ड्रायव्हिंगचा किमान 15 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे . मेडिकल कॅटेगरी SHAPE - I . वयोमर्यादा 48 वर्षे आहे . माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय , 41 , नंदनवन कॉलनी , औरंगाबाद दुरध्वनी 0240-2370313 या पत्यावर / दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा . निवड प्रक्रियेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा प्रत्यक्ष सहभागी नाही , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

दर्गाहच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला एकाच कुटुंबातील ५ भाविकांचा तलावात बुडून मृत्यू

कंधार दि  : राज्यासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत . तसेच धरणे तलाव जलाशय हे देखील फुल्ल भरले आहेत . आणि अश्यामध्ये नांदेड , खुदबईनगर येथून कंधार येथील बडी दर्गाहच्या दर्शनासाठी आलेल्या ५ भाविकांचा जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला . ही घटना रविवार ( दि . २१ ) दुपारी एकच्या सुमारास घडली . मृत एकाच कुटुंबातील असून तलावाकाठी जेवण करण्यासाठी गेले होते . मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार ( वय ४५ ) यांचा मुलगा मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन ( वय १५ ) , सय्यद सोहेल सय्यद वाहिद ( वय २० ) , सय्यद नवीद सय्यद वाहिद ( वय १५ ) , मामा मोहम्मद विखार ( वय २३ सर्व रा . खुदबईनगर नांदेड ) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत . नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार , मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार हा नांदेड येथे बेकरी व्यवसाय करत होते . सर्व आपल्या नातेवाईक व कुटुंबासह कंधार येथील हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम ( बडी दर्गाह ) च्या दर्शनासाठी दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता आले होते . सर्वांचे दर्शन झाल्यानंतर कुटुंबातील एक महिला जेवण करण्यासाठी तलावाच्या काठावर गेले . जेवण झाल्यानंतर प्लेट धुण्यासाठी तलावाच्या काठावर गेले असता त्यातील एकाचा पाय घसरुन तलावात पडला . त्यास  वाचविण्यासाठी एकएक करुन पाचही जण तलावात बुडू लागले .
 यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एका महिले पाहिले असता तिने ही माहिती दर्गाहमध्ये असलेल्या त्यांच्या इतर नातेवाईकांना दिली . घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भोई समाजातील व्यक्तींच्या मदतीने पाचही मृतदेह तलावातून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला . तात्काळ त्यांना रुग्णवाहिका व रिक्षातून कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले . मात्र , डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करुन मृत घोषित केले . त्या नंतर सर्व मृतदेह कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले . या घटनेमुळे कंधार शहरासह देगलूर नाका भागात शोककळा पसरली आहे . 

21 August 2022

केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

 नांदेड  : - केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना , महाविद्यालयीन व विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना , दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येतात . सन 2022-23 साठी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरुन 20 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत तर महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करण्याचा अंतीम दिनांक 15 नोव्हेंबर 2022 हा आहे . केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना राज्यातील मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , बौध्द , पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर ( पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती योजना राबविली जाते . शिष्यवृत्तीसाठी वर्ग 11 ते पीएचडी व्यावसायिक डी.एड् . , बी.ए. , एम . एड् . , आय . टी . आय . , सर्व डिप्लोमा व अकरावी / बारावी स्तरांवरील एम . सी.व्ही.सी. अभ्यासक्रम ( तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून ) इतर सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी पात्र आहेत . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखापेक्षा अधिक नसावे . महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी / नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 4 लाख 50 हजारापेक्षा अधिक नसावे . महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना वर्ग 11 वी , 12 वी , पोस्ट मॅट्रिक डिप्लोमा / सर्टिफिकेट पदवी , पदव्युत्तर डिग्री / डिप्लोमा तसेच डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे . सर्व महाविद्यालयांनी त्यांची केवायसी व आधार डेमो ऑथेटिंफीकेशन व स्वत : ची नोंदणी चालू वर्षात करावी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी करावी . शिष्यवृत्ती योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र व इच्छुक विद्यार्थ्यानी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठीचे अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे . नॅशनल स्कॉलरशिप ( एनएसपी ) या मोबाईल अॅपवर अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे . या योजनेबाबत लाभ पात्रता व स्वरुप याबाबतची माहिती संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . एनएसपी पोर्टलवरील पात्र शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन विभागीय सहसंचालक ( उच्च शिक्षण ) नांदेड विभाग , नांदेड कार्यालयाने केले आहे . 

20 August 2022

संतापजनक! नांदेडमध्ये हुंड्याच्या रकमेसाठी विवाहितेला सासरच्यांनी पाजलं विष, 22 वर्षांच्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु


नांदेड : देशात हुंडाविरोधी (Dowry Case) कायदा आणला असला, तरिही त्याचा वचक किती आहे, यावर सवाल उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded Crime News) घडलेल्या संतापजनक घटनेवरुन हुंडाबळीचा मुद्दा आजही तितकाच गंभीर असल्याचं स्पष्ट झालंय. एका विवाहीत तरुणीला चक्क विष पाजण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. नांदेडमधून उघडकीस आलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच संताप व्यक्त केला जातोय. या संतापजनक घटनेतील पीडित विवाहित तरुणी मृत्यूशी झुंज देतेय. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी (Nanded Police) गुन्हाही दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक कऱण्यात आलेली नाही. पीडित तरुणीच्या नातलगांनी या संपूर्ण प्रकरणी तीव्र शब्दांत रोष व्यक्त केलाय. सासरच्या लोकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे

मृत्यूशी झुंज सुरु

नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना समोर आलीय. 22 वर्षांच्या तरुणीला तिच्या सासरच्या लोकांनीच विष पाडलं. हुंडची रक्कम मिळावी नाही, म्हणून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं असा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पीडित तरुणी गंभीर असून तिची प्रकृत्य अत्यंत नाजूक असल्याचं कळतंय. या विवाहीत तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु आहे.


कारवाईची मागणी

नांदेडमधील विमानतळ पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतलाय. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. आपल्या मुलीसोबत घडलेल्या या घटनेनं पीडित मुलीचे नातलग प्रचंड संतापलेत. त्यांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांत तक्रार देत सासरच्या लोकंवर अटकेची कारवाई व्हावी, दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


तीव्र संताप

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जातोय. देशात याआधीही हु्ंड्यासाठी छळ करुन अनेक विवाहीत स्त्रियांनी आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता तर थेट सासरच्याच लोकांनी विष पाजत तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत पुढे नेमकी कुणावर कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.



19 August 2022

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बंपर भरती

  पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या 386 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे . दरम्यान कोणती पदे भरली जाणार ? वयाची अट काय ? अर्ज करण्याची मुदत काय ? पाहूयात . भरती दरम्यान अतिरिक्त कायदा सल्लागार 01 , विधी अधिकारी 01 , उपमुख्य अग्निशमन अधिकारी 01 , विभागीय अग्निशमन अधिकारी 01 , उद्यान अधीक्षक ( वृक्ष ) 01 , सहाय्यक उद्यान अधीक्षक 02 , उद्यान निरीक्षक 04 , हॉर्टिकल्चर सुपरवायझर 08 , कोर्ट लिपिक 02 , अॅनिमल कीपर 02 , समाजसेवक 03 , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41 , लिपिक 213 , आरोग्य निरीक्षक 13 , कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) 75 , कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) 18 जागा भरण्यात येणार आहे . वयाची अट 8 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे अशी देण्यात आली आहे . तर मागासवर्गीय / अनाथांसाठी पाच वर्षे सूट असेल . नोकरीचे ठिकाण पिंपरी - चिंचवड देण्यात आले आहे . खुल्या प्रवर्गासाठी फी एक हजार रुपये तर मागासवर्गीयांसाठी 800 रुपये असेल . माजी सैनिकांनाकडून फी घेण्यात येणार नाही . ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 8 सप्टेंबर 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आली आहे . ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये होईल . अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/

18 August 2022

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची नागपूर येथे बदली

  नांदेड: नांदेडचे जिल्हाधिकारी (Nanded Collector) विपीन इटनकर (Vipin Itankar) यांची राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलीय. निश्चित कालावधीपेक्षा कमी काळात त्यांची बदली झाल्याने त्यांच्या बदलीमागे स्थानिक राजकीय ताकत असल्याचे सांगण्यात येतंय. मात्र नागपूर (Nagpur) सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात त्यांची बदली झाल्याने इटनकर यांच्या कामाची दखल घेतल्याचे सांगण्यात येतंय. इटनकर यांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा चांगले अधिकारी नांदेडला टिकवल्या जात नाहीत हा नेहमीचा आरोप याही वेळा केला जातोय. लातूर इथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेल्या विपीन इटनकर यांची सव्वा दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली होती. आता ते नागपूरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त होतील.कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी
विपीन इटनकर हे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच कोरोनाची लाट आली. मात्र या लाटेत स्वतः डॉक्टर असलेल्या विपीन इटनकर यांनी प्रभावीपणे काम केलं, कोरोना काळात मृत्यदर कमी राखण्यात ते सर्वांच्या मदतीने यशस्वी झाले होते. त्यासोबतच कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयातच उपचार मिळावेत यासाठी त्यांचे कायमच प्रयत्न होते. त्यामुळे कोरोनाच्या लाटेत ते नांदेडमध्ये लोकप्रिय झाले. त्या दरम्यान उद्भवलेल्या कोरोना काळात रेमडीसीवीर आणि ऑक्सिजनच्या टंचाईत अहोरात्र जागून त्यांनी काम केले, जिल्हाधिकारी असूनही अनेकदा ते यासाठी रात्री बेरात्री रस्त्यावर उतरले होते.

कुटुंब वत्सल आणि सायकल प्रेमी
विपीन इटनकर यांनी स्वतःच्या पत्नीची प्रसूती महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात केली होती, त्यांचा हा साधेपणा फार चर्चिल्या गेला. फिटनेसच्या बाबतीत इटनकर कायम दक्ष असतात, त्यामुळेच ते रात्रीबेरात्री सायकल चालवताना शहरात नागरिकांना भेटत असत. तरुणांनी शरीरस्वास्थ्य आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावे असा त्यांचा आग्रह असायचा.

लसीकरण आणि महसूल उत्पन्नात वाढ
विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या दोन्ही साथी जवळून अनुभवल्या होत्या, त्यामुळे त्यांनी लसीकरणासाठी स्वतःला झोकून दिले होते. त्यासोबतच महसूल उत्पनात त्यांच्या काळात वाढ झाली होती.

नागपूर मिळाल्याने आश्चर्य
जिल्हाधिकारी म्हणून विपीन इटनकर यांनी नांदेडला प्रथमच काम केले. मात्र या दरम्यान त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी थेट नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली केलीय. आता इटनकर नागपुरात थेट फडवणीस यांच्या जवळ जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी

बिलोली:कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी : म . ज्यो . फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग ग्रामीण भागात राहणारे अनेक व्यक्ती रोगाचे निदान न होऊ शकल्याने किंवा लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची जोड करू न शकल्याने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात . पुढे तो दुर्धर बनतो आणि रुग्णाचा अंत होतो . याविषयी जनजागृती व्हावी आणि गरजू व्यक्तींना उपचारासाठी योग्य ते सहकार्य करता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक आ . कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर यांच्या वतीने आज ( दि . १७ ऑगस्ट ) सगरोळी येथील माणिकप्रभू मठात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . अस्थिरोग , सगरोळी व परिसरातील १०३ महिला , ९ बालके यासह ३२७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली . सर्वसाधारण आजारासह कान , नाक , घसा , कर्करोग , बालरोग आदी रुग्णांनी याचा लाभ घेतला . डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड , अपेक्षा क्रिटीकल केअर व मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नांदेड , नंदीग्राम हॉस्पिटल नांदेड व लोटस हॉस्पिटल नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांनी यात सहभाग घेतला . शिबिरात रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली व गरजेनुसार १६ रुग्णांना पुढील तपासणी तसेच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला . संस्थेचे विश्वस्त श्री . सुनिलरावजी देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए चे विभागीय प्रमुख श्री . शरद पवार यांनी पिवळी शिधापत्रिका धारक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करताना शिबीर आयोजनासाठी सगरोळी संस्थेचे आभार मानले . कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर येथील सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने हे शिबीर यशस्वी झाले , असे विचार संस्थेचे वैद्यकीय अधिकारी तथा सचिव डॉ . जयंत जकाते यांनी मांडले .

05 August 2022

दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण सोडत निश्चित

 नांदेड दि . 5 : - जिल्ह्यातील नगरपरिषद देगलूर , मुखेड , कंधार , बिलोली , कुंडलवाडी , धर्माबाद , उमरी , भोकर , मुदखेड व हदगाव या दहा नगरपरिषद व हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग , नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला ) व सर्वसाधारण ( महिला ) आरक्षण सोडत निश्तिच करण्यात आले आहे . या कार्यक्रमानुसार संबंधित नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या अंतिम आरक्षणाची प्रसिध्दी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर , इतर कार्यालयातील सूचना फलक , तहसिल कार्यालयातील सूचना फलक व नगरपरिषद , नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे . तसेच विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक औरंगाबाद यांनी नमूद नगरपरिषदा / नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चिती राजपत्रात प्रसिध्द केली आहे . 

02 August 2022

असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई - श्रम कार्डसाठी नोंदणी करावी

  नांदेड  दि . 2 : - ई - श्रम कार्डच्या नोंदणीसाठी राज्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे . नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ . सय्यद यांनी केले आहे . नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( सीएससी ) वर जाऊन नोंदणी करावी . नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे . नांदेड जिल्ह्यासाठी 13 लाख 27 हजार 855 एवढे उद्दीष्ट दिलेले आहे . त्यापैकी 3 लाख 10 हजार 167 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे . उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा . नोंदणी कोण करु शकतो.  घरकाम करणाऱ्या महिला , रस्त्यावरिल विक्रते , दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी , ऑटो चालक , मेकॅनिक , शिलाइ मशीन कामगार , न्हावी कामगार , आशा वर्कर / अंगणवाडी सेविका , सुतारकाम करणार व्यक्ती , पेंटर , प्लंबर कामगार , इलेक्ट्रीशियन , ब्युटी पार्लर , वृत्तपत्र विक्रेते , हॉटेल चालक , प्रिंटींग काम करणारी व्यक्ती , भाजी विक्रेते , बिडी कामगार , सेंट्रींग कामगार , बांधकाम कामगार , पशुपालन करणारे , लहान व सिमांत शेतकरी , मच्छीमार , सॉ - मिल कामगार , मीठ कामगार , विणकर , बचत गठ , फळ विक्रेते , लेबर कामगार , सुरक्षा कर्मी , लोहार , हातगाडा कामगार इत्यादी क्षेत्रातील कामगार ई - श्रम पोर्टल वर नोंदणी करु शकतात . या नोंदणीसाठी आधार कार्ड , बँक पासबुक , सक्रिय मोबाईल क्रमांक ( आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ) ही आवश्यक कागदपत्रे लागतात . नांदेड जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत ई श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( सीएससी ) वर जाऊन ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा , असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ . सय्यद यांनी केले आहे .       

चर्चा कोण करतयं, असे म्हणत चव्हाणांकडून चिखलीकरांची खिल्ली..

नांदेड : कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोमवारी त्यांनी (Nanded) नांदेडला प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. चर्चा कोण करतय, या चर्चेला काही महत्व नाही.कॉँग्रेस सोडण्याचा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, अशा शब्दात या सगळ्या अफवा असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार? अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली. त्यापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करताना अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उशीरा पोहचले त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्याचबरोबर कॉँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी देखील उशीरा पोहचलेल्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती.त्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर काही दिवस शांतता होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री चव्हाण हे कॉँग्रेस सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली.नांदेडला आल्यानंतर चव्हाण यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी आपल्याबद्दल होणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. चर्चा कोण करतय ? या चर्चेला काही महत्व नाही, असा टोला त्यांनी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता टोला लगावला.येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्याचबरोबर राज्यात सत्ताबदल झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत असून अनेक नेते इतर पक्षात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची देखील चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यावर अशोक चव्हाण यांनी मोजक्या शब्दात स्पष्टीकरण देत या चर्चांना पुर्णविराम दिला.

26 July 2022

नांदेड दहा नगरपरिषदेच्या आरक्षण व सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 नांदेड दि . 26 : - मा . राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील एकूण दहा नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग , नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम 2022 जाहीर केला आहे . जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडतीचा सुधारित कार्यक्रम गुरुवार 28 जुलै 2022 रोजी नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे . गुरुवार 28 जुलै रोजी देगलूर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा . सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय देगलूर येथे , मुखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा . सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देगलूर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुखेड येथे , बिलोली नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा . उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय बिलोली येथे , कुंडलवाडी नगरपरिषदेची सोडत सकाळी 11 वा . उपजिल्हाधिकारी भूसंपादन लसिका नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कुंडलवाडी येथे , धर्माबाद नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय धर्माबाद येथे , उमरी नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वाजता उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय उमरी येथे , भोकर नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा . उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय भोकर येथे , मुदखेड नगरपरिषदेची सोडत दुपारी 3 वा . उपविभागीय अधिकारी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मुदखेड येथे , हदगाव नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा . उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद कार्यालय हदगाव येथे , कंधार नगरपरिषदेची सोडत सकाळी 10 वा . उपविभागीय अधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय कंधार येथील नवीन प्रशासकीय इमारत येथे आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी या आरक्षण व सोडतीच्या कार्यक्रमास सोडतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी केले आहे .

जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 नांदेड दि . 26 : - मा . राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत सुधारित कार्यक्रमानुसार गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ . शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथील प्रेक्षागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे , असे उपजिल्हाधिकारी ( सामान्य ) नांदेड यांनी कळविले आहे . 61 % तसेच जिल्ह्यातील किनवट , हदगाव , नांदेड , भोकर , धर्माबाद , बिलोली , कंधार व देगलूर या तालुका मुख्यालयी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता व तालुका माहूर , हिमायतनगर , अर्धापूर , मुदखेड , उमरी , नायगांव ( खै ) , लोहा व मुखेड येथे 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांचेकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात पंचायत समिती सदस्य पदांसाठीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे . संबंधितानी याची नोंद घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे .

22 July 2022

आयटीआय येथे 22 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध , विविध ट्रेडसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु

 नांदेड दि . 22 : - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे . विद्यार्थ्यांनी विविध ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत . प्रवेश अर्ज भरुन फॉर्म निश्चिती करणे , प्रवेश फॉर्म त्रुटी सुधारणे , प्रवेश फिस भरणे या बाबी प्रवेश प्रक्रियेत आहेत . आयटीआय येथे 22 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध आहेत . विद्यार्थ्यांनी https // . admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा , असे आवाहन प्राचार्य एम.एस.बिरादार यांनी केले आहे . प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवारांने अर्जातील माहिती दाव्यांचा पृष्ठयर्थ आवश्यक मुळ दस्तावेज , कागदपत्रे , कागदांच्या छायांकित प्रतीचा एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार दाखल करावेत . उमेदवारांनी व पालकांनी ऑनलाईन देण्यात आलेली माहिती , प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करुनच प्रवेश अर्ज सादर करावेत . फिटर / पेंटर जनरल / बेसिक कॉस्मॅटोलॉजी / सुईंग टेक्नॉलॉजी / शिट मेटल / टुल अॅड डायमेकर / टर्नर / वेल्डर / वायरमन / फॉड्रीमॅन / मशिनीस्ट / ट्रॅक् टर मेकॅनिक / ईलेक्ट्रशीयन / ड्राफ्सटमन सिव्हिल इ . ट्रेड आहेत . प्राचार्य एम.एस. बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश समिती प्रमुख सुभाष परघणे , उपप्रमुख रविंद्र वानखेडे , केदार गिरीश , संजीवनी जाधव , मांजरमकर , गरूडकर , प्रकाश बानाटे हे काम पाहत आहेत असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे . 

15 July 2022

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि . 15 : - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी 21 जुलै 2022 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावेत . उशिराने आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे . सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी , बारावी , पदवी , पदव्युत्तर , वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात येत आहेत . ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे . अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला , रेशनकार्ड , आधारकार्ड , शाळा सोडल्याचा दाखला , गुणपत्रक , उत्पनाचा दाखला , छायाचित्र , पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या . डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , ग्यानमाता शाळेसमोर ( दूरध्वनी क्रमांक 02462-220088 ) मो . नं . 9421865146 नांदेड येथे मुदतीत प्रत्यक्ष अर्ज करता येतील , असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे . 

पिक विमा भरल्यानंतर ई - पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आवाहन

  नांदेड  दि .15 : - शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवल्यानंतर / पिक विमा भरल्यानंतर शेतात पेरलेल्या पिकांची ई - पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर . बी . चलवदे यांनी केले आहे . शेतकरी पिक पेरणीबाबत स्वयंघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभागी होतात परंतु प्रत्यक्ष काही शेतात पेरलेले पिक वेगळे असते . शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचाच विमा होणे आवश्यक आहे . विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्यांचा विमा अर्ज बाद केला जाऊन त्याचे भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही . शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्यानंतर घेतलेल्या पिक संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई - पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहित धरण्यात येणार आहे . त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वयंघोषणापत्रात नोंदविलेल्या पिकांचीच नोंद वेळेत ई - पिक पाहणीद्वारे करुन घ्यावी . 

सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो

 नांदेड दि . 15 : - नांदेड जिल्ह्यामध्ये विविध समाजमाध्यमांद्वारे पिक विमा भरतांना सातबाऱ्यावर यावर्षीच्या पिकाची नोंद आवश्यक असल्याबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे . त्याऐवजी अद्ययावत सातबारा व पिक पेरणीबाबत स्वयंघोषणा पत्र आवश्यक आहे . सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी देखील पिक विमा भरता येतो . पिक विमा नोंदणीच्या अंतिम आठवड्यामध्ये पोर्टलवर जास्त दाब येऊन पोर्टल हळू होते परिणामी पिक विमा भरताना अडचणी येतात . त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पिक पेरणीचे ( सात - बारावर पिक नोंदीची आवश्यकता नाही ) स्वयंघोषणापत्र देऊन अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेमध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर . बी . चलवदे यांनी केले आहे . 

24 February 2022

युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातलगांनी तहसिल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी साधावा संपर्क

 नांदेड दि . 24 : - रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे . रशियाने युद्ध घोषित केले असून या परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील कोणाच्या घरचे नातलग , नागरीक युक्रेनमध्ये अडकलेले असल्यास तात्काळ जिल्ह्यातील त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती नाव व इतर माहिती द्यावी , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे . महाराष्ट्रातील जे कोणी नागरीक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुखरूपपणे भारतात परत येता यावे यादृष्टिने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारशी संपर्क साधून मदतीची यंत्रणा तत्पर ठेवली आहे . हे लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील जर कोणाचे नातलग , कुटुंबातील सदस्य , विद्यार्थी युक्रेनमध्ये असतील त्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही समन्वयाची व्यवस्था करण्यात आली आहे . कोणी अडकले असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करता येईल . नातलगांसाठी तहसिल कार्यालयासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन टोल फ्री नंबर 1077 किंवा ( 02462 ) 235077 या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन निवसी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे .अधिक मदतीसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय , नवी दिल्ली येथे नागरिकांच्या माहितीसाठी व मदतीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तेथील हेल्पलाईन नंबर पुढीलप्रमाणे आहेत . १८००११८७ ९ ७ ( टोल फ्री ) , + ९१-११ २३०१२११३ , + ९१-११-२३०१४१०४ , + ९१-११ २३०१७ ९ ०५ आहे व फॅक्स नंबर + ९१-११-२३०८८१२४ हा आहे व तेथील ई - मेल आय डी situationroom@mea.gov.in हा आहे . 

13 February 2022

भारतीय बौद्ध महासभा बिलोलीच्या वतीने उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ


बिलोली (दि.13/02/2022 रोजी बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 10 दिवसीय उपसिका धम्म प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करण्यात आला.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी वारघडे,उद्घाटक पी.एम.वाघमारे,बी.डी.कांबळे,नरसिंग दरबारे,रेखाताई पंडित,नगरसेवक प्रकाश पोवाडे,शिलानंद गायकवाड,अर्जुन जाधव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्रिसरण पंचशील घेण्यात आले.त्यानंतर नरहरे बालाजी,आदरणीय गवलवाड सर,नरसिंग दरबारे, पी.एम.वाघमारे यांनी उपासिका धम्म प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्ष समारोपात आयु.बालाजी वारघडे यांनी असे सांगितले की जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा.नंतर केंद्रीय शिक्षिका रेखाताई पंडित यांनी त्रिशरण पंचशील यावर सविस्तर माहिती सांगून प्रशिक्षणास प्रारंभ केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस नागोराव वाघमारे यांनी केले. या शिबिरास 30 उपासिकांनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेबआंबेडकर नगर येथील व देशमुख नगर येथील शील श्रद्धावान उपासक उपासिका उपस्थित होते.