नांदेड दि . 2 : - ई - श्रम कार्डच्या नोंदणीसाठी राज्यात 3 व 4 ऑगस्ट रोजी विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे . नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ . सय्यद यांनी केले आहे . नांदेड जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांनी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( सीएससी ) वर जाऊन नोंदणी करावी . नोंदणीस कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नोंदणी विनामूल्य आहे . नांदेड जिल्ह्यासाठी 13 लाख 27 हजार 855 एवढे उद्दीष्ट दिलेले आहे . त्यापैकी 3 लाख 10 हजार 167 असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे . उर्वरित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा . नोंदणी कोण करु शकतो. घरकाम करणाऱ्या महिला , रस्त्यावरिल विक्रते , दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी , ऑटो चालक , मेकॅनिक , शिलाइ मशीन कामगार , न्हावी कामगार , आशा वर्कर / अंगणवाडी सेविका , सुतारकाम करणार व्यक्ती , पेंटर , प्लंबर कामगार , इलेक्ट्रीशियन , ब्युटी पार्लर , वृत्तपत्र विक्रेते , हॉटेल चालक , प्रिंटींग काम करणारी व्यक्ती , भाजी विक्रेते , बिडी कामगार , सेंट्रींग कामगार , बांधकाम कामगार , पशुपालन करणारे , लहान व सिमांत शेतकरी , मच्छीमार , सॉ - मिल कामगार , मीठ कामगार , विणकर , बचत गठ , फळ विक्रेते , लेबर कामगार , सुरक्षा कर्मी , लोहार , हातगाडा कामगार इत्यादी क्षेत्रातील कामगार ई - श्रम पोर्टल वर नोंदणी करु शकतात . या नोंदणीसाठी आधार कार्ड , बँक पासबुक , सक्रिय मोबाईल क्रमांक ( आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ) ही आवश्यक कागदपत्रे लागतात . नांदेड जिल्ह्यातील सर्व असंघटित कामगारांनी विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत ई श्रम कार्डसाठी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ( सीएससी ) वर जाऊन ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा , असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन अ . सय्यद यांनी केले आहे .
02 August 2022
Home »
» असंघटित क्षेत्रातील कामगारांनी ई - श्रम कार्डसाठी नोंदणी करावी







0 comments:
Post a Comment