नांदेड : - केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना , महाविद्यालयीन व विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना , दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येतात . सन 2022-23 साठी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरुन 20 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत . विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत तर महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करण्याचा अंतीम दिनांक 15 नोव्हेंबर 2022 हा आहे . केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना राज्यातील मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , बौध्द , पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर ( पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती योजना राबविली जाते . शिष्यवृत्तीसाठी वर्ग 11 ते पीएचडी व्यावसायिक डी.एड् . , बी.ए. , एम . एड् . , आय . टी . आय . , सर्व डिप्लोमा व अकरावी / बारावी स्तरांवरील एम . सी.व्ही.सी. अभ्यासक्रम ( तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून ) इतर सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी पात्र आहेत . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखापेक्षा अधिक नसावे . महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी / नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 4 लाख 50 हजारापेक्षा अधिक नसावे . महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना वर्ग 11 वी , 12 वी , पोस्ट मॅट्रिक डिप्लोमा / सर्टिफिकेट पदवी , पदव्युत्तर डिग्री / डिप्लोमा तसेच डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते . अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे . सर्व महाविद्यालयांनी त्यांची केवायसी व आधार डेमो ऑथेटिंफीकेशन व स्वत : ची नोंदणी चालू वर्षात करावी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी करावी . शिष्यवृत्ती योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र व इच्छुक विद्यार्थ्यानी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठीचे अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे . नॅशनल स्कॉलरशिप ( एनएसपी ) या मोबाईल अॅपवर अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे . या योजनेबाबत लाभ पात्रता व स्वरुप याबाबतची माहिती संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे . एनएसपी पोर्टलवरील पात्र शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा , असे आवाहन विभागीय सहसंचालक ( उच्च शिक्षण ) नांदेड विभाग , नांदेड कार्यालयाने केले आहे .
21 August 2022
Home »
» केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन







0 comments:
Post a Comment